देश-विदेश

‘तांडव’ आणि ‘अ‍ॅमेझॉन’ला उत्तर प्रदेश सरकारचा तडाखा

नवी दिल्ली : ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’ या ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’वर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘तांडव’ या वेबसीरिजच्या विरोधात उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ सरकारने जोरदार तडाखा दिला आहे. ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’ इंडियाचे प्रमुख, वेबसीरिजचे लेखक, दिग्दर्शक, प्रोड्युसर आणि अन्य साहाय्यकांविरोधात हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे.   नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘तांडव’ या वेबसीरिजमध्ये राजकीय नाट्य दाखविण्यात आले आहे. ..

‘ड्रोनस्वार्मिंग’ : भारतीय लष्कराची नवी ताकद

भारतीय लष्कराने सैन्य दिन संचलनादरम्यान १५ जानेवारी रोजी दिल्ली छावणी परिसरात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरून ७५ देशी बनावटीच्या ‘ड्रोन’चा वापर करून ड्रोन सामूहिक कृती क्षमतेचे थेट प्रात्यक्षिक दाखवले.भविष्यातील सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञानाद्वारे सक्षम असलेल्या दलात स्वतःला रूपांतरित करण्यासाठी भारतीय लष्कर सातत्याने उदयोन्मुख आणि विनाशकारी तंत्रज्ञान आत्मसात करत असल्याचे यातून दिसून येते. या तंत्रज्ञानासाठी भारतीय लष्कराकडून कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वायत्त शस्त्रे प्रणाली, ..

‘कलम ३७०’ संपुष्टात आल्याचा मोठा फायदा! : मनोज नरवणे

जगातील एक सामर्थ्यवान सैन्यदल म्हणजे भारतीय लष्कर. जगातील सर्वात उंच युद्धभूमी सियाचीन ते राजस्थानचे रण आणि जम्मू-काश्मीर ते अरुणाचल प्रदेश, अशा सर्व आघाड्यांवर भारतीय लष्कर अहोरात्र कार्यरत असते. केवळ सीमांचे रक्षण नव्हे, तर नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्तींमध्येही भारतीय लष्कर नेहमीच सज्ज असते. अशा या सामर्थ्यवान भारतीय लष्कराचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्यासोबत ‘दै. मुंबई तरुण भारत’चे विशेष प्रतिनिधी पार्थ कपोले यांनी साधलेला हा विशेष संवाद!..

आता मोदी सरकारपुढे अमेरीकेतील कोरोनाला रोखण्याचं आव्हान

भारतात एकिकडे कोरोना लसीकरण सुरू होणार असल्याने उत्साहाचे वातावरण आहे. मात्र दुसरीकडे कोरोनाच्या न्यू स्ट्रेनच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे आणि त्यामुळे चिंतासुद्धा व्यक्त केली जात आहे. भारतात कोरोनाच्या न्यू स्ट्रेनच्या रुग्णांची संख्या आता वाढू लागली आहे...

नव्या अटींवरून संताप! 'व्हॉट्सअप'ने केली 'ही' मोठी घोषणा

व्हॉट्सअपच्या नव्या पॉलिसीबाबत दिले स्पष्टीकरण..

कोरोना योद्ध्यांसह फ्रंटलाईन वर्कर्सना दिलासा

“शनिवार दि.१६ जानेवारीपासून सुरू होणार्‍या कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, सैन्यदले, पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दले, सफाई कर्मचारी, कोरोना व्यवस्थापनात कार्यरत कर्मचारी आदींना प्राधान्य असणार आहे. या तीन कोटी ‘कोरोना योद्धे’ आणि ‘फ्रंटलाईन वर्कर्स’च्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करणार आहे,” अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवार दि.११ जानेवारी रोजी दिली. देशात दि.१६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणास प्रारंभ होत आहे. ..

चारचाकीमध्ये एकटे असल्यास मास्क घालणे आवश्यक नाही

भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने स्पष्ट केल्या गाइडलाइन्स..

मेट्रो शहरांमध्ये लवकरच '५ जी' सेवा सुरु होणार

अनेक दिवसांपासून ५ जी ची प्रतीक्षा होत आहे. देशात अनेक ५ जी स्मार्टफोन विकले जात आहेत. पण ५ जी नेटवर्क कोठेही उपलब्ध नाही. असं असलं तरी ५ जी इंटरनेट स्पीड २०२१ या वर्षामध्ये देशात येणार आहे. सरकार लवकरच ५ जी नेटवर्कचे स्पेक्ट्रम वाटप आणि लिलाव प्रक्रिया सुरू करणार आहे...

जम्मूमध्ये २ दहशतवाद्यांना अटक

अवंतीपोरामध्ये अटक केलेले दोन्ही दहशतवादी जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे..

व्हॉट्सअपच्या अटी- शर्थींचा सामना!

तुम्हीसुद्धा व्हॉट्सअपने जाहीर केलेली नवीन टर्म्स अँड प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारलीये का? आणि त्यानंतर पसरलेल्या अनेक बातम्यांमुळे तुम्हालासुद्धा धक्का बसलाय का? मग हा व्हीडीओ बघाच.....

भारताच्या ‘सर्जिकल स्ट्राईक’मध्ये ३०० हून अधिक जण ठार

पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या बदल्यात भारताकडून करण्यात आलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’मध्ये (हवाई हल्ला) सुमारे ३००हून अधिक जण ठार झाले, अशी कबुली पाकिस्तानच्या एका माजी राजनैतिक अधिकार्‍याने दिली आहे. पाकचे माजी राजनैतिक अधिकारी आगा हिलाली यांनी एका वृत्तवाहिनीसोबतच्या चर्चेदरम्यान ही कबुली दिली आहे. ..

चर्चमधील ‘पापाचे प्रायश्चित्त’ परंपरेला आव्हान

ख्रिश्चन महिलांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय करणार सुनावणी..

'लव जिहाद' कायद्याला स्थगिती देता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये लागू करण्यात आलेल्या कायद्यांवर स्थगिती देण्यास नकार दिला आहे. मात्र, या प्रकरणी सुनावणी घेण्यास संमती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील पुढील सुनावणी चार आठवड्यानंतर ठेवली आहे. ..

इस्त्रोच्या वैज्ञानिकाच्या हत्येसाठी घरात सोडले जात आहेत साप !

इस्त्रोच्या वरिष्ठ सल्लागार आणि वैज्ञानिक डॉ. तपन मिश्रांनी आपल्याला तीनवेळा विषप्रयोग करून मारण्याचा प्रयत्न गेल्या तीन वर्षात झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. डॉ. मिश्रा ३१ जानेवारी रोजी निवृत्त होणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी ५ जानेवारी रोजी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये हे आरोप केले आहेत. इस्त्रोचे वैज्ञानिक पुढे जावेत, अशी बाहेरच्या लोकांची इच्छा नाही. तसेच कमी खर्चात अत्याधूनिक प्रणाली तयार करते ही सलही अनेकांना बोचते...

१,५३,७७,१९,७५,००० रुपये ! वाचलात ? इतकी आहे वाड्रांची घोषित संपत्ती

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींचे पती व देशातील दिग्गज उद्योगपती रॉबर्ड वाड्रा यांची आयकर विभागातर्फे दोन दिवस चौकशी सुरू आहे. ही चौकशी बेनामी संपत्तीच्या प्रकरणात वाड्रा अडचणीत सापडले आहेत. त्यांची बेनामी संपत्ती किती आहे याचा अद्याप तपास लागलेला नाही...

'हलाल' शब्द हद्दपार करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

केंद्र सरकारतर्फे सरकारच्या कृषि आणि प्रसंस्कृत खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणातर्फे (एपीडा) मांस मॅन्युअलमधून हलाल शब्द हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एपीडातर्फे हलाल शब्द हटवून नवी मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे...

'कोरोनामुक्ती'ची पायाभरणी

'कोव्हिशिल्ड' आणि 'कोव्हॅक्सिन'ला 'डीसीजीआय'ची अखेर मंजुरी..

अंत्यसंस्कारावेळीच काळाचा घाला ; १०हून अधिक ठार

गाझीयाबादमध्ये एका स्मशानभूमीची भिंत कोसळली..

फौजी येणार २६ जानेवारीला ! अक्षय कुमारने केले ट्विट

पब-जीच्या तोडीसतोड गेमिंग अॅप आणणार..

युरोप आणि 'लव्ह जिहाद'!

आपल्याकडे युरोपीय देश आणि आपण अशी तुलना बऱ्याच बाबींवर होत असते. सध्या अर्जेंटिनामध्ये गर्भपाताला दिल्या गेलेल्या मान्यतेवरून चर्चेला उधाण आलं आहे. आणि भारतात अजूनही लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून घमासान सुरूच आहे. या निमित्ताने कोणत्याही देशात स्त्रीला मानवतेने पाहणे अत्यंत आवश्यक आहे, हेच या मुद्द्यावरून समोर येत आहे...

भारतातही 'न्यू स्ट्रेन'?

कोरोनाची दुसरी लाट येण्याची चर्चा रंगात असताना, प्रतिबंधित लस येईल ही आनंदाची बातमी सगळ्यांना समजली. पण त्यानंतर लगेचच आता ब्रिटनमध्ये आढळलेला 'न्यू स्ट्रेन' भारतात आल्याची चर्चा जोर धरतेय. त्याविषयी घेतलेला आढावा.....

आतापर्यंत ९८ लाखांहून अधिक रुग्ण ठणठणीत

  देशभरात १६,४३२ रुग्णांची वाढनवी दिल्ली : देशात १८७ दिवसानंतर गेल्या २४ तासांत राष्ट्रीय संख्येत १६,५०० पेक्षा कमी नवीन रुग्णांची (१६,४३२) भर पडली. २५ जून रोजी १६,९२२ नवीन रुग्ण आढळले होते. भारतातील उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या आज २ लाख, ६८ हजार, ५८१ पर्यंत खाली आली. एकूण बाधित रुग्णांमध्ये उपचार सुरु असलेल्या रुग्णांचे प्रमाण २.६३ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे.  गेल्या २४ तासांत एकूण उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत ८,७२० ने घट झाली आहे. कोरोनामुक्त होणार्‍या रुग्णांची वाढती ..

देशात नव्या ‘कोरोना’ विषाणूचा शिरकाव

नववर्षात लसीकरणाला प्रारंभ झाल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची आशा व्यक्त केली जात असतानाच देशात नव्या कोरोनाचा विषाणू आढळल्याने सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे. ब्रिटनवरून भारतात परतलेल्या सहा प्रवाशांच्या शरीरात कोरोना विषाणूचा नवा प्रकार (स्ट्रेन) आढळला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने त्याविषयी माहिती दिली आहे. भीतीचे कारण नसल्याचेही यावेळी केंद्रीय मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, नवा विषाणू आढळून आल्यानंतर ब्रिटनसह युरोपीय देशांकडून करण्यात आलेले पुन्हा ‘लॉकडाऊन’ आणि अन्य ..

देशात आज २१,४३० रुग्ण ‘कोरोना’मुक्त

भारताने जागतिक महामारीच्या साथीविरुध्दच्या लढ्यात महत्वपूर्ण शिखर गाठले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून दररोज आढळणार्‍या नवीन रुग्णांची संख्या आता १९,००० पेक्षा कमी झाली आहे. गेल्या २४ तासांत रुग्णांची राष्ट्रीय संख्या एकूण १८,७३२ इतकी आढळून आली आहे. दिनांक १जुलै २०२० रोजी नवीन रुग्णांची संख्या १८,६५३ इतकी आढळली होती. ..

उत्तर-पूर्व भारतात तुफान बर्फवृष्टी :पर्यटकांना फटका

हिवाळा सुरू झाल्यापासून उत्तरेकडील तापमानात घट होताना काही दिसत नाही. रविवारी उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. हिमाचलमध्ये दोन दिवस बर्फवृष्टी आणि पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये किन्नौर, लाहौल-स्पीति आणि चंबा घाटी येथे ४८ तासांत बर्फवृष्टी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगडमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ..

'मन की बात'मधून पुन्हा एकदा 'व्होकल फोर लोकल'

पंतप्रधानांनी वर्षाच्या शेवटच्या 'मन की बात'मध्ये व्होकल फोर लोकलच्या नाऱ्यासह अनेक मुद्द्यांवर केले मत व्यक्त..

मध्य प्रदेशात 'लव्ह जिहाद' विधेयकाला मंत्रिमंडळात मंजुरी

बैठकीनंतर गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी ही माहिती दिली..

पादरी-ननला आक्षेपार्ह स्थितीत पाहिले म्हणून केली अभयाची हत्या

केरळमध्ये तिरुअनंतपुरमच्या विशेष सीबीआय न्यायालयाने २८ वर्षे जुन्या 'सिस्टर अभया हत्याकांड' प्रकरणात आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यापूर्वी न्यायालयाने मंगळवारी एक पादरी आणि एका ननवर दोषी असल्याचा ठपका ठेवला होता. न्यायालयाने तिन्ही दोशींवर प्रत्येकी पाच लाखांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणात न्याय मिळण्यासाठी पीडितेला २८ वर्षांचा कालावधी लागला...

सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ३ टक्क्यांपेक्षाही कमी

भारताच्या एकूण सक्रीय रुग्ण संख्येत घट होण्याचा कल सुरुच आहे. देशात आज सक्रीय रुग्ण संख्या २,८९,२४० आहे. एकूण पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत, सक्रीय रुग्णांचे प्रमाण आणखी कमी होत ते २.८६% झाले आहे. २६ राज्ये/ केंद्र शासित प्रदेशात १०,००० पेक्षा कमी सक्रीय रुग्ण आहेत. दैनंदिन बऱ्या होणाऱ्यांची संख्या, दैनंदिन रुग्ण संख्येपेक्षा जास्त असल्याने एकूण सक्रीय रुग्ण संख्येत घट होत आहे...

नवा कोरोना विषाणू भारतात आला का ? : संशोधक काय म्हणतात ?

राष्ट्रीय संशोधन संस्था (NARI) तर्फे ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूबद्दल महत्वाचे वक्तव्य केले आहे. कोरोना विषाणू संदर्भात केलेल्या संशोधनात ब्रिटनमध्ये आलेल्या विषाणूचे नवे म्युटंट आढळेला नाही, असा खुलासा करण्यात आला आहे. NARI इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) शाखा आहे. ..

एका लसीने जोडले गावाखेड्याशी ‘स्नेहसंबंध’

देशभरातील १३ राज्यांमध्ये जगातील सर्वात मोठी धर्नुवात लसीकरण मोहिम राबवण्यात आली आहे. गावाखेड्यांमध्ये कारखान्यातील यंत्रकामगार आणि मजूरांना होणाऱ्या जखमांकडे कामाच्या गडबडीत दुर्लक्ष केले जाते, अशा जखमांमुळे व्याथी बळावून ती जखम दीर्घकाळ राहिल्याने धनुर्वाताची व्याधी होण्याची शक्यता जास्त असते. बऱ्याचदा कामगारांच्या आरोग्य चिकित्सेची काळजी कारखान्यांमध्ये घेतली जात नाही. ..

‘नंदनवना’त भाजपचा दबदबा कायम

काश्मीर खोऱ्यातही ‘कमळ’ फुलले; डॉ. मुखर्जींच्या स्वप्नपूर्तीस यशस्वी प्रारंभ..

पंतप्रधान मोदींना भाऊ म्हणणाऱ्या कार्यकर्तीचा संशयास्पद मृत्यू

पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रातांत बलुच नागरिकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या महिला कार्यकर्त्या करीमा बलोच यांचा कॅनडा येथे संशयास्पद मृत्यू झाला आहे. करीमा बलोच रविवारपासूनच बेपत्ता होत्या; त्यांचा मृतदेह टोरंटोमध्ये आढळला...

अमेरिकेन विद्यापीठात जैन-हिंदू धर्मावर अध्यापन

अमेरिकेच्या एका विद्यापीठाने जैन आणि हिंदू धर्मावर अध्यापन करण्याची घोषणा केली आहे. आणि यासाठी पिठाची स्थापनासुद्धा विद्यापीठातर्फे त्याच्या धार्मिक अभ्यास कार्यक्रमाच्या भागाच्या रूपात करण्यात आली आहे. तसेच अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्य विद्यापीठ, फ्रेस्नो येथे जैन आणि हिंदू धर्म या विषयावरील प्रमुखांची नेमणूक करण्यात आली आहे...

नरेंद्र मोदींचा अमेरिकेच्या सर्वोच्च 'लिजन ऑफ मेरिट' पुरस्काराने गौरव

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाता जाता मोदी यांना 'लिजन ऑफ मेरिट' हा अमेरिकेतील सर्वोच्च सन्मान देऊन गौरवले आहे. अमेरिकेतील भारतीय राजदूत तरणजीत सिंग संधू यांनी या पदकाचा स्वीकार केला. अमेरिकेने मोदींना हा सर्वोच्च पुरस्कार दिल्याने त्यांच्या निर्विवाद नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे...

#covid19UK भारतातील परिस्थिती काय?

ब्रिटनमध्ये सध्या कोरोनाच्या दुसऱ्या विषाणूने थैमान घातलंय. त्यामुळे पुन्हा एकदा जगभरातील देश विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी कडक निर्बंध आखण्याच्या तयारीत आहेत.अनेक देशांनी यूकेमधून येणाऱ्या विमान प्रवासावर बंदी घातली आहे. भारत सरकारने याबाबत घेतलेले निर्णय आणि विषाणूचा धोका याच विषयाची माहिती आपण घेणार आहोत...

नव्या विषाणूला घाबरण्याची गरज नाही : केंद्रीय आरोग्यमंत्री

"कोरोना विषाणूच्या नव्या स्वरूपास देशवासीयांनी घाबरण्याची गरज नाही," असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सोमवार, दि. २१ डिसेंबर रोजी स्पष्ट केले. ते म्हणाले, "बदलत्या परिस्थितीविषयी केंद्र सरकार पूर्णपणे सतर्क आहे. गेल्या वर्षभरापासून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केंद्र सरकार करीत असून यापुढेही करीत राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना भयभीत होण्याची गरज नाही," असे त्यांनी स्पष्ट केले आहे. ..

काय म्हणताय! कोरोना संपला मग ही बातमी वाचा!

एकीकडे कोरोना लसीची सर्वजण वाट पाहत आहेत. कोरोना आकडेवारी कमी होताना दिसत आहे मात्र, महामारीच्या काळ अद्याप संपलेला नाही. ब्रिटनमध्ये लसीकरण सुरू झाल्यानंतरही कोरोना विषाणूत म्यूटेशन (नवा विषाणू ) दिसून आला आहे. यानंतर सौदी अरब सरकारने आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद केली आहे. ..

कोविड योद्ध्यांचे अभिनंदन! देशात ९५ लाखांहून जास्त रुग्ण ठणठणीत

कोरोनाच्या जागतिक महामारी विरोधातल्या लढ्यात भारताने महत्वाचा आणखी एक टप्पा गाठला आहे. भारतात रुग्ण बरे होण्याचा कल जारी राहिला असून कोरोनातून बरे झालेल्यांच्या एकूण संख्येने ९५ लाखाचा (९५,२०,८२७) महत्वाचा टप्पा केला आहे. सक्रीय रुग्ण आणि बरे झालेल्यांच्या संख्येतले अंतर सातत्याने वाढत आहे. सक्रीय रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या ९२ लाखाने (९२,०६,९९६)जास्त आहे. बरे होण्याचा दरही वाढून ९५.४०% झाला आहे. जागतिक स्तरावर हा दर सर्वोच्च असलेल्या देशांपैकी भारत एक आहे. ..

शेतकरी आंदोलनावर काय म्हणाले देशाचे सर्वोच्च न्यायालय ?

नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. गुरुवारी या आंदोलनाचा २२ वा दिवस आहे. शेतकऱ्यांना रस्ते मोकळे करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या खंडपीठासमोर दुसऱ्यांदा सुनावणी झाली. न्यायालयाने शेतकरी या दोघांना सल्ला दिला आहे. कृषी कायद्यांना स्थगिती देण्याचा विचार करावा तसेच शेतकऱ्यांनी विरोध करण्याच्या पद्धतीवरही न्यायालयाने कटाक्ष टाकला. विरोध करण्याची पद्धत बदलावी, असे आवाहन न्यायालयाने शेतकऱ्यांना केले आहे...

भारतीय कोरोनाग्रस्त गरिबांना ४० कोटी डॉलर्सची मदत

कोरोनाचा फटका बसलेल्या गरिबांच्या मदतीसाठी भारताला जागतिक बँकेकडून ४० कोटी डॉलरचं अर्थसाह्य..

कर्नाटकात काँग्रेसची गुंडशाही

विधानपरिषदेत उपसभापतींना थेट खुर्चीवरून खाली खेचण्याचा प्रयत्न..

आसाममध्ये सर्व सरकारी मदरसे बंद !

आसाम सरकारने इस्लाम विषयी शिक्षण पूर्णपणे बंद करून गणित आणि विज्ञान शिकवणार असल्याची घोषणा केली..

युट्यूब, जीमेल्ससह गुगलच्या सेवा का झाल्या बंद ? वाचा सविस्तर

जगभरामध्ये युट्युब, जीमेलसह गुगलचे काही सर्विस झाल्या क्रॅश..

अयोध्येतील राम मंदिर लोकवर्गणीतून उभे राहणार

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे सरचिटणीस चंपतराय यांची माहिती..

"२०१४च्या पराभवाला मनमोहन सिंग, सोनिया गांधी जबाबदार"

कॉंग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांच्या 'द प्रेसिडेंशियल इयर्स' या आत्मचरित्रातील दाव्याने खळबळ..

भारत बंद ! वाचा कुठे काय बंद काय सुरू ?

केंद्र सरकारने अंमलात आणलेल्या कृषी कायद्यांचा विरोध करत विविध शेतकऱ्यांनी आज 'भारत बंद'ची हाक दिली आहे. मात्र, या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याने नागरिकांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे. शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते व राजकीय पक्षांनी दुपारी तीन वाजेपर्यंत चक्का जाम करण्याची घोषणा केली होती. शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यातील बैठका नि:ष्फळ ठरल्याने आज हे बंदचे हत्यार उपसण्यात आले आहे. ..

गोधडी-गादी ते फिल्म पाहण्याची सोय, वाचा! कसे सुरू आहे आंदोलन

दिल्लीच्या सिंघु बॉर्डरवर गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. कडाक्याच्या थंडीतही शेतकरी आपल्या मागण्या आणि आंदोलनाची जागांवर ठाम आहेत. करनाल महामार्गावर जिथवर नजर जाईल तिथवर ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर ट्रॉलींच्या रांगा आहेत. शेतकरी इथे पोहोचून नऊ दिवस पूर्ण झाले आहेत. देशभरातून शेतकरी आंदोलनाला पाठींबा मिळत आहे. दररोज आंदोलन मजबूत होताना आणि दिवसेंदिवस संगठीत होताना दिसत आहे. ..

राजीव गांधी जैवतंत्रज्ञान केंद्राचे नामकरण

राजीव गांधी जैवतंत्रज्ञान केंद्राचे दुसरे संकुल लोकार्पणासाठी सज्ज झाले आहे. आणि या संकुलास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव गोळवळकर यांचे नाव देण्यात येणार आहे. ..

युवराजच्या वडिलांचे हिंदूंबद्दल आक्षेपार्ह्य वक्तव्य

माजी क्रिकेटपटू योगराज सिंग यांना अटक करण्याची मागणी..

या आज्जींना करायची आहे सर्व संपत्ती मोदींच्या नावावर

प्रत्येक राजकीय नेत्याच्या प्रसिद्धीचे दोन पैलू असतात, एक म्हणजे त्याला स्वीकार्यता आणि दुसरी लोकप्रियता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या काही वर्षात या दोन्ही गोष्टींवर पकड घट्ट केली आहे. जागतिक नेतृत्त्वाबद्दल असो किंवा देशांतर्गत नेत्यांमध्ये मोदींची विशिष्ट शैली अनेकांना भावते. असेच एक उदाहरण देणारी घटना नुकतीच उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशच्या ८५ वर्षीय आज्जींनी आपली संपूर्ण संपत्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे करण्याचा निर्धार केला आहे. त्याबद्दलचे कारणही त्यांनी सांगितले आहे...

सुपरस्टार रजनीकांतची राजकारणात उडी ; ३१ डिसेंबरला मोठी घोषणा

सुपरस्टार रजनीकांत करणार नव्या पक्षाची स्थापना..

आरबीआयचा एचडीएफसीला दणका ! नवीन क्रेडीट कार्ड देण्यास मनाई

आरबीआयने एचडीएफसीच्या 'डिजीटल २.०' या अंतर्गत सुरु केलेल्या सर्व डिजीटल अॅक्टिव्हिटी थांबवण्यास सांगितल्या आहेत..

आता चौकशी यंत्रणांवर सीसीटीव्हीची नजर : सर्वोच्च न्यायालय

देशातील चौकशी यंत्रणांवर आणि पोलिसांसाठी तुरुंगात चौकशीच्या ठिकाणी ऑडिओ रेकॉर्डिंगसहीत सीसीटीव्ही लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले..

'कृषी आंदोलन' लक्ष्य करण्याचा पाकचा कट

भारत-चीन तणावाची ठिणगी पडली असतानाच आता पाकिस्तानही नापाक कारवायांद्वारे डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. लक्ष्य करण्यासाठी पंजाबमध्ये सुरू असलेल्या कृषी आंदोलनाचा फायदा घेत आहे. दहशतवादाला पुरस्कृत करणाऱ्या इन्टर सर्विसेस इंटेलिजेंसतर्फे (आयएसआय) कट रचण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंजाबमार्गे चीनच्या ड्रोन्सद्वारे घातक हत्यारे आणि दहशतवादी साहित्य पाठवण्याचा मनसुबा चीनच्या मदतीने पाकने आखला होता. ..

“माझी मुलगी देशविरोधी कारवायांमध्ये सामील”

शेहला रशिदच्या वडिलांनीच तिच्यावर आरोप केला असून जीवाला धोका असल्याची भितीदेखील त्यांनी व्यक्त केली..

मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनला पर्यावरणीय ग्रीन सिग्नल

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.के. यादव यांनी पत्रकार परिषद घेत दिली माहिती..

'बाटा'च्या आंतरराष्ट्रीय सीईओपदी भारतीय संदीप कटारिया

'बाटा'च्या १२६ वर्षांच्या इतिहासात प्रथमच मुख्य कार्यकारी अधिकारीपदी भारतीयाची निवड..

सरनाईकच नव्हे तर, १६ धाडीत ४५० कोटी जप्त

शिवसेनेचे प्रवक्ते आणि ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांच्या कुटुंबीयांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) चौकशी करण्यात आल्याचे प्रकरण चर्चेत असतानाच प्राप्तिकर विभागानेही मुंबईसह देशभरात तब्बल १६ ठिकाणी छापेमारी करत ४५०हून अधिक कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त केल्याची खळबळजनक माहिती उजेडात आली आहे. ..

'पीरियड प्रोडक्ट्स' भारतात मोफत कधी ?

भारतातील मासिक पाळीशी संबंधित उपाययोजनांचा आढावा. 'पीरियड प्रोडक्ट्स' भारतात मोफत कधी ? ..

पुन्हा एकदा सुरक्षादलांवर हल्ला ; २ सैनिक हुतात्मा

शहरातील एचएमटी भागामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक घडली..

WhatsApp अलर्ट : 'कोविड फंड'च्या नावे होतेय फसवणूक

व्हॉट्सअॅपवर गेल्या काही दिवसांत एक बनावट संदेश (Fake Message) व्हायरल होत आहे. ज्यात केंद्र सरकार कोरोना फंड देत असल्याची अफवा पसरवली जात आहे. १८ वर्षावरील व्यक्तींना केंद्रातर्फे दीड लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचा फेक मेसेज व्हायरल केला दात आहे. त्यात व्यक्तीला त्याची माहिती भरून देण्याची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अलर्ट जाहीर केला आहे. अशा कुठल्याही मेसेजच्या लिंक किंवा मेसेज ओपन करू नका, असे आवाहन केंद्रातर्फे करण्यात आले आहे. ..

कोरोना संदर्भात केंद्र सरकारची नवी नियमावली जाहीर

केंद्र सरकारने बुधवारी कोरोनावर नवी मार्गदर्शक सूचना जाहीर केली आहेत. राज्यांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. कंटेन्मेंट झोन आणि सर्वेक्षणाच्या दृष्टीकोनातून कडक पावले उचलण्यास सांगितली आहे. ज्या राज्यांनी अनलॉक प्रक्रीया सुरू केली आहे ती राज्ये स्वतःच्या पद्धतीनुसार, सावधगिरी बाळगू शकतात. स्वतःच्या निर्णयानुसार, निर्बंध लागू करू शकतात. मात्र, लॉकडाऊन लागू केला जाऊ शकतो मात्र, यालाही मर्यादा आहेत...

देशात आणखी ४३ चीनी अ‌ॅपवर बंदी

सुरक्षेच्या कारणास्तव देशामध्ये या अ‌ॅपवर बंदी घालण्यात आल्याचे केंद्र सरकारने सांगितले..

कोल्हापुरातील संग्राम पाटील यांना वीरमरण

भारतीय सैन्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात कोल्हापूरच्या दुसऱ्या पुत्राला आले वीरमरण..

लग्न लावून परताना १४ जणांचा अपघाती मृत्यू

उत्तर प्रदेशमधील प्रतापगढमधील घटना..

पाकवर एअर स्ट्राईकची अफवा ! : नेमकं काय झालं वाचा सविस्तर

पाकव्याप्त काश्मीरवरात भारतीय सैन्याने पिनपॉईंट स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले आहेत. गुरुवारी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान, अचानक पाकिस्तानवर एअर स्ट्राईकचे वृत्त टिव्ही माध्यमांवर झळकू लागले होते. मात्र, त्यानंतर हा पिनपॉइंट स्ट्राईक आहे, ..

२६ / ११चा मास्टरमाइंड हाफिज सईदला १० वर्षांची शिक्षा

पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने सुनावली शिक्षा..

कॉंग्रेसमध्ये ज्येष्ठ नेत्यांना डावलण्यास सुरुवात ?

कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी कपिल सिब्बलांना दिला पक्षातून बाहेर पडण्याचा सल्ला..

जम्मू काश्मीर चकमकीत ४ दहशतवादी ठार

जम्मू काश्मीर मधील टोल प्लाझाजवळ झाली भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक..

'हायपरलूप'ची पहिली मानवी चाचणी यशस्वी ; पुणेकर तनयला संधी

अमेरिकेमध्ये हायपरलूपची पहिली मानवी चाचणी यशस्वी झाली असून पुण्यातील तनय मांजरेकरला प्रवासाठी पहिली संधी मिळाली..

गुजरात हायवे अपघातात ११ ठार !

गुजरातमधील बडोदा दुर्तगती महामार्गावर ट्रक आणि मिनी बस यांच्यात झालेल्या या भीषण अपघातात १७ जण जखमी..

"भारतीय सैनिक आहेत म्हणून देश सुरक्षित"

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जैसलमेरमधील जवानांसोबत दिवाळी केली साजरी..

भारतीय सैन्याच्या प्रत्युत्तरात ८ पेक्षा जास्त पाक सैनिक ठार

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) विविध ठिकाणी शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय सैन्याने जोरदार तडाखा दिला आहे. भारतीय सैन्याच्या प्रत्युत्तरात आठपेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून त्यामध्ये पाकच्या एसएसजीच्या काही कमांडोंचाही समावेश आहे. त्याचवेळी भारतीय सैन्याचे तीन जवानदेखील हुतात्मा झाले आहेत. ..

'ट्विटर'ची फडफड आणि केंद्राचा दणका

लेह-लडाखचा भाग केंद्रशासित दाखवण्याऐवजी जम्मू-काश्मीरचा भाग दाखवल्या प्रकरणी मायक्रोब्लॉगिंग सोशल साईटला केंद्र सरकारने दणका दिला आहे. ..

राहुल गांधी हे चिंताग्रस्त नेते : बराक ओबामा

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी स्वतः लिहिलेल्या पुस्तकात केला उल्लेख..

ब्रेकिंग ! आता डिजिटल बातम्या, ओटीटीवर असणार केंद्राचा अंकुश

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून अधिसूचना केली जारी..

अटकेविरोधात अर्णब गोस्वामीची सर्वोच्च न्यायालयात धाव

रिपब्लिक टीवीचे प्रधान संपादक अर्णब गोस्वामी यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. अर्णब गोस्वामी यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. २०१८ च्या अर्णब नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात जामीन देण्यासाठी नकार दिला होता. ..

मध्य प्रदेशमध्ये ज्योतिर्रादित्य शिंदेंची बाजी ; भाजप आघाडीवर

मध्य प्रदेश पोटनिवडणुकीमध्ये ज्योतिर्रादित्य शिंदेंच्या नेतृत्वामध्ये भाजप २८ पैकी २० जागांवर आघाडीवर आहे..

गुजरातमध्येही भाजपच आघाडीवर !

गुजरातमध्ये आठही जागांवर भाजप आघाडीवर..

"राहुल गांधींसोबत हात मिळवणारे बुडणारच!"

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली कॉंग्रेस आणि राहुल गांधींवर टीका..

बिहार निवडणूक २०२० : बिहारमध्ये भाजपच्या एनडीएची आघाडी

दुपारी १२ पर्यंत भाजपच्या नावावर अंदाजे ७३ जागांवर आघाडी..

कर्नाटकात लव जिहादविरोधी कायदा येणार

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी राज्यात लव जिहादच्या संबंधातील घटना रोखण्यासाठी कायदा करणार असल्याचे स्पष्ट केले..

पाककडून युद्धबंदीचे उल्लंघन ; भारतीय सैन्याकडून चोख उत्तर

जम्मू-काश्मीरच्या पुंछ आणि कठुआ जिल्ह्यांतील एलओसी व आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या गावात पाकिस्तानी सैन्याचा गोळीबार व तोफांचा मारा..

महाराष्ट्र विधानसभा सचिवांना बजावली नोटीस

महाराष्ट्र विधानसभा सचिवांना नोटीस ..

100 KMH स्पीडने Audi चालवत होत्या मुली : धडकेत तरुण ३० फूट वर उडाला

अजमेर एलिव्हेटेड रोडवर शुक्रवारी सकाळी आठ वाजता दोन मुली शंभर किमी प्रतितास वेगाने आउडी कार चालवत होत्या. वेगावर नियंत्रण न राहिल्याने त्यांनी एका तरुणाला धडक दिली. हा तरुण ३० फूट हवेत उडाला. जवळच्या एका घराच्या छतावर जाऊन पडला. त्याचा एक हात आणि पाय तुटून शरीरापासून वेगळा झाला होता. या भयानक घटनेनंतर संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत. ही दुर्घटना नसून हत्याच आहे, असाही संतत्प आवाज अनेकांनी उठवला आहे. वेगाचा थरार अनुभवण्याच्या नादात हा प्रकार घडला..

कोलकात्यात ‘लोकल’ सुपरफास्ट, मुंबईत यार्डातच!

लॉकडाऊनमध्ये दीर्घ ब्रेक घेतल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये लोकल रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार ११ नोव्हेंबरपासून कोलकात्यात लोकल सेवा पुन्हा सुरू होणार आहे. अधिकाऱ्यांनीही या वृत्ताला दुजोरा देत दक्षिण पूर्व रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी मंजूरी देण्यात आल्याचे म्हटले आहे. ..

अभिमानास्पद ! मराठमोळे श्री ठाणेदार मिशिगनचे नवे लोकप्रतिनिधी

तब्बल ९३ टक्के मातांसह त्यांनी विरोधकांना धूळ चारली..

चिंता वाढली! : २४ तासांत ५० हजारांहून अधिक कोरोना रुग्णवाढ

कोरोना विषाणू संक्रमणाचा आकडा दररोज कमी होत असताना आज मात्र, चिंताजनक बाब उघडकीस आली आहे. गेल्या २४ तासांत नव्याने झालेल्या संक्रमितांचा आकडा ५० हजार २०९ इतका झाला आहे. गेल्या काही दिवसांत ५० हजारांवर आकडा पहिल्यांदाच गेला आहे. कोरोनामुळे काल दिवसभरात ७०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य कुटूंब कल्याण मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे...

फ्रान्सचा ‘एअर स्ट्राईक’! अल-कायदाच्या ५० दहशतवाद्यांना कंठस्नान

फ्रान्सने दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर एअरस्ट्राईक केल्याचा दावा केला आहे. यात अल-कायदाचे ५० दहशतवादी ठार केल्याचे सांगण्यात येत आहे. फ्रान्स सैन्याचे प्रवक्ते कर्नल फ्रेडरिक बार्बरी यांनी चार दहशतवादी पकडल्याची माहिती दिली आहे. तसेच फिदायीन जॅकेट जप्त करण्यात आले आहे. या संघटनेने सैन्याच्या ठिकाणांवर हल्ला करण्याची तयारी केली होती. बुर्कीना फासो आणि नाइझरच्या सीमेवर फ्रान्सच्या ड्रोनला दुचाक्यांचा ताफा दिसून आला. ..

निकिताच्या मैत्रीणीने दिली साक्ष, धाडस पाहून SIT चकित

निकिता तोमर हत्याकांडातील साक्षीदार असलेल्या तिच्या मैत्रीणीने सोमवारी न्यायाधीशांसमोर जबाब नोंदवला. तिचे धाडस पाहून एसआयटीही थक्क झाली आहे. जराही न घाबरता तिने न्यायाधीशांसमोर आपले सविस्तर म्हणणे मांडले. निकिताची मैत्रीण या संपूर्ण हत्याकांडाची साक्षीदार आहे. त्यामुळे तिच्या जबाबावर सुनावणी निर्णायक ठरू शकते. ..

इस्लामिक दहशतवादाने भळभळता युरोप

युरोपात वाढत्या दहशदवादी हल्ल्यांच्या घटनांमुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. गेल्या काही वर्षांत फ्रान्समध्ये सर्वाधिक दहशतवादी हल्ले झाले. गेल्या चार महिन्यांत हे प्रमाण सर्वाधिक वाढले आहे. मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रीयाची राजधानी वियाना येथेही हल्लेखोरांनी गोळीबार केला. जगभरातून या अशा घटनांची निंदा केली जात आहे. काही घटनांमध्ये तर केवळ एकच दहशतवादी होता. कोरोना विषाणू महामारीशी लढत असताना दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. ..

धक्कादायक ! पाकमध्ये गणपती मूर्तीची विटंबना

पाकिस्तानमध्ये प्राचीन मंदिराची तोडफोड करून सर्व देवी-देवतांच्या मूर्ती मंदिराबाहेर काढल्या..

मंदिरात नमाज पठण : चार जणांवर गुन्हा

मशिदीत आरती कराल का ? सेक्युलर बनण्याचे ढोंग करणाऱ्यांना विहीपचा सवाल..

प्रसिद्ध शायर मुनव्वर राणांविरोधात तक्रार दाखल

फ्रान्समधील झालेल्या हल्ल्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी एफआयआर दाखल..

स्कॅम 2020 :‘बाबा का ढाबा’च्या मालकाची युट्यूबर विरोधात तक्रार

आपल्या व्हायरल व्हीडिओमुळे चर्चेत आलेल्या ‘बाबा का ढाबा’चा आता एक वाद उभा राहिला आहे. या ढाब्याचे मालक कांता प्रसाद यांनी मालवीय नगर पोलीस ठाण्यात युट्यूबर गौरव वासन विरोधात तक्रार केली आहे. पत्नीच्या व माझ्या मदतीसाठी लोकांनी दिलेली लाखो रुपयांच्या देणगीत अफरातफर झाल्याची माहिती त्यांनी या तक्रारीत दिली आहे. मात्र, गौरव याने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. ..

निकीताला न्याय द्या ! : फरीदाबादमध्ये चक्का जाम

निकीता तोमर हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणी गावात एक महापंचायत बोलवण्यात आली आहे. त्यात निकीताला न्याय मिळावा, असा ठराव मांडण्यात आला आहे. यानंतर जमाव तीव्र झाला. फरीदाबाद-वल्लभगड हायवेवर चक्काजाम करण्यात आले आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांना लाठीचार्ज करण्यात आला आहे...

कमलनाथांना निवडणूक आयोगाचा झटका !

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पुन्हा एकदा केले आचार संहितेचे उल्लंघन..

मुंगेर घटनेची सीबीआय चौकशी करा ! : मृताच्या कुटूंबियांची मागणी

बिहारच्या मुंगेरमध्ये दुर्गा पूजेनंतर मुर्ती विसर्जन करत असताना पोलीस आणि स्थानिकांमध्ये झालेल्या झटापटीत एका युवकाचा मृत्यू झाला आहे. मृताच्या कुटूंबियांनी सीबीआय चौकशीची मागणी करत मुंगेरच्या माजी एसपी लिपी सिंह यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे...

फ्रान्समध्ये चाकू हल्ला ; ३ जण ठार तर अनेकजण जखमी

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या व्यंगचित्रावरील वादानंतर आता फ्रान्समध्ये हैदोस..