दिल्ली दिनांक

सर्वोच्च न्यायालयाची मोलाची सूचना!

पक्षांतराच्या प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाने सुचविलेल्या माजी न्यायाधीशांंच्या समितीकडे अशी प्रकरणे न सोपविता, संबंधित सभागृहाच्या माजी सेक्रटरी जनरलांच्या समितीने याचा निवाडा करावा, असा हा तोडगा आहे. यातही समितीची निवड ‘पीक अँड चूज’ म्हणजे समितीचे सदस्य निवडण्याचा अधिकार कुणालाही असता कामा नये, तर मागील तीन सेवानिवृत सेक्रेटरी जनरल यांची समिती याचा निवाडा करील...

काश्मीर पुन्हा तापविण्याचा प्रयत्न!

काश्मीरला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उपस्थित करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात आहे. चीनने पुन्हा काश्मीरबाबत चर्चा करण्याची मागणी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडे केली आहे. ज्या नियमांतर्गत मतविभाजन होत नाही, त्याखाली ही मागणी करण्यात आली आहे. कलम 370 अंतर्गत जम्मू-काश्मीरला देण्यात आलेला विशेष दर्जा काढून घेण्यात आल्यानंतर, चीनने सुरक्षा परिषदेत काश्मीरमधील स्थितीबाबत चर्चा घडविली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या पररराष्ट्र मंत्र्यांनी 12 डिसेंबर रोजी संयुक्त राष्ट्राला पाठविलेल्या ..

महाराष्ट्रातील सत्तांतराचे चक्र

राजकीय घटनाक्रम फार विचित्र असतो. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी- आपल्यासमोर महाराष्ट्रात व केंद्रात सहकार्य करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, तो आपण स्वीकारला नाही, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच केला. 22 नोव्हेंबर रोजी शरद पवार यांनी संसद भवनात पंतप्रधान मोदी यांच्याशी महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या प्रश्नावर चर्चा केली व चर्चा आटोपून बाहेर पडत असताना मोदी यांनी आपल्यासमोर महाराष्ट्रात व केंद्रात सहकार्य ..

जम्मू-काश्मीर आता दिल्ली शासित

दरबार जम्मूत असताना, काश्मीर खोरे शांत असते असा अनुभव आहे. शिवाय थंडीचा कडाका सुरू झाल्यावर काश्मीरी लोक फार काही करण्याच्या मन:स्थितीत नसतात आणि बर्फ पडल्यामुळे पाकिस्तानी घुसखोरांचे भारतात शिरण्याचे रस्तेही बंद झालेले असतात. त्यामुळे थंडीत काश्मीर खोर्‍यात फार हिंसासाचार होत नाही असा अनुभव आहे...

सुप्रीम कोर्टाची अनावश्यक टिप्पणी!

सुप्रीम कोर्टाने काश्मीर खोर्यातील स्थितीबाबत एक अनावश्यक टिप्पणी केली. अजाणता केली. काश्मीर खोर्यातील स्थिती लवकरात लवकर सामान्य करा, अशी सूचना केंद्र सरकारला केल्यानंतर काही आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी याचा पुरेपूर फायदा उठवीत केंद्र सरकारवर टीका केली...

माध्यान्हीचा सूर्यास्त!

जेटली यांच्या व्यक्तिमत्वाचे तीन प्रमुख पैलू होते. एक- राजकीय नेता, दुसरा- एक क्रिकेटप्रेमी आणि तिसरा एक नामवंत वकील. क्रिकेट हे माझे पहिले प्रेम आहे, वकिली हे दुसरे आणि राजकारण तिसर्या क्रमाकांवर असे ते अनेकदा बोलून दाखवित...

एक देश, एक निवडणूक

खाडी भागात युद्ध झाल्यास त्याचा तेलाच्या किमतीवर तातडीने परिणाम होईल व याची किंमत जगातील प्रत्येक नागरिकाला मोजावी लागेल, असे सौदी अरेबियाने म्हटले आहे. इराणने अमेरिकेचे ड्रोन पाडल्यावर लगेच तेलाच्या किमती पाच टक्के वाढल्या आहेत. युद्ध भडकल्यास ही वाढ 10 ते 15 टक्के असेल, असा एक अंदाज वर्तविला जात आहे...

नव्या लोकसभेचे आजपासून पहिले अधिवेशन

उपसभापतिपद आंध्रप्रदेशातील वायएसआर कॉंग्रेसला देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असल्याचे समजते. मात्र, जगन रेड्डी यांची मुख्य मागणी आंध्रप्रदेशाला विशेष दर्जा देण्याबाबतची आहे. ती मान्य करणे केंद्र सरकारला शक्य नाही. कारण एका राज्याला असा दर्जा दिला गेल्यास, अन्य राज्यांतही विशेष दर्जाची मागणी सुरू होईल. यात बिहार आघाडीवर असेल...

आर्थिक आघाडीवर चिंतेचा संकेत!

अमेरिका-चीन यांच्यातील आर्थिक युद्धाच्या झळा भारतापर्यंत येऊ लागल्या आहेत. राष्ट्रपती ट्रम्प यांनी चीनसोबतच भारतालाही टार्गेट करणे सुरू केले आहे. भारताच्या आर्थिक हिताला धक्का बसेल असे काही निर्णय त्यांनी घेतले आहेत. याचा भारतावर किती परिणाम होतो, हे दिसण्यासाठी काही वेळ जाऊ द्यावा लागेल...

अमेरिका-चीन व्यापारयुद्ध भडकले!

‘रेअर अर्थ’ या धातूचा वापर साध्या बल्बपासून, प्रक्षेपणास्त्रांमध्ये होत असतो. या धातूच्या जागतिक व्यापारात एकट्या चीनजवळ 95 टक्के हिस्सा आहे. चीनने त्याच्या निर्यातीवर कर लावलेला नाही. चीनने याची निर्यात थांबविल्यास अमेरिकेतील वाहन कारखाने, कॉम्प्युटर, विमान कारखाने यातील उत्पादन ठप्प होईल, असे चीनला वाटते...

मोदी सरकारला मोठा जनादेश!

निवडणूक आयोगाजवळ पुरेशी व्हीव्हीपॅट यंत्रे नव्हती, या कारणाने या यंत्राचा पुरेसा वापर करता आला नाही. यापुढे होणार्या प्रत्येक निवडणुकीत 50 टक्के मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर केला गेल्यास, इव्हीएमवर उपस्थित केल्या जाणार्या प्रश्नांना कायमचा पूर्णविराम लागेल!..

आता 23 मेची प्रतीक्षा!

उत्तरप्रदेशात होणारे नुकसान भाजपाने या दोन राज्यांत भरून काढल्यास भाजपा स्वबळावर चांगल्या स्थितीत जाऊन पोहोचेल आणि शिवसेना, जनता दल यु, रामविलास पास्वान, अण्णा द्रमुक, अकाली दल, आगम या पक्षांच्या आधारे तिला केंद्रात सरकार स्थापन करण्यात अडचण येणार नाही...

निवडणूक आयोगाचा योग्य निर्णय!

संसदीय लोकशाही अधिक बळकट करून, भ्रष्टाचाराला वेसण घालण्यासाठी, राष्ट्रीय निवडणूक म्हणजे लोकसभा निवडणूक फक्त राष्ट्रीय पक्षांना लढविता येईल, असा नियम करण्याबाबतही आयोगाने विचार करावा, अशी स्थिती तयार होत आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला आयोगाची मान्यता मिळवावी लागते. त्यात राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी काही टक्के मते आवश्यक असतात. प्रादेशिक पक्षांसाठी वेगळे निकष आहेत...

नाकेबंदी इराणची, तेलबंदी भारताची!

जगाचे राजकारण पुन्हा एकदा दोन महाशक्तींभोवती फिरत आहे. याचा ताजा दाखला म्हणजे इराणवर अमेरिकेने घातलेले आर्थिक निर्बंध! या प्रकरणात चीन कोणती भूमिका घेतो, यावरून जागतिक समीकरणाचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. अमेरिकेच्या विरोधात चीन-रशिया एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्या प्रक्रियेला अधिक वेग येईल, असाच या घटनाक्रमाचा संकेत आहे...

राफेल सौदा गंगाजलापेक्षाही शुद्ध!

राफेल विमान सौदा पुन्हा एकदा चर्चेत आहे. राफेल विमान खरेदी सौद्याचे दस्तावेज चोरीस गेल्याचे केंद्र सरकारतर्फे अॅटर्नी जनरलांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितल्यानंतर पुन्हा आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यात आता खुलासा करण्यात आला आहे. जे दस्तावेज प्रसिद्ध झाले आहेत ते चोरी गेलेले आहेत, असे सांगण्यात आले आहे. या प्रकरणातील एक बाब मात्र स्पष्ट की, राफेल सौदा गंगाजलापेक्षाही शुद्ध असल्याचे सांगितले जात आहे. यात एका पैशाचीही दलाली नाही, एका रुपयाचाही गैरव्यवहार नाही, असे अनेक माजी वायुदलप्रमुख, उपप्रमुखांनीही ..

संघर्ष संपला, समस्या कायम!

भारत-पाक यांच्यातील तणाव निवळला असला, तरी दहशतवादाची समस्या कायम आहे आणि याच्या मुळाशी आहे काश्मीर! जोपर्यंत या समस्येवर तोडगा शोधला जात नाही, भारतीय जवानांचे रक्त सांडणे बंद होणार नाही...

काश्मीर पुन्हा होरपळले!

पुलवामाची घटना आयएसआयचे नवे प्रमुख लेफ्ट. जनरल मुनीर यांनी घडविली, असे म्हटले जात आहे. हे खरे असेल तर मुनीर यांना ठार करण्यात आले पाहिजे आणि जेव्हा हे वारंवार केले जाईल- पाकिस्तानच्या मनात दहशत तयार होऊन, तो काश्मीरमधील हस्तक्षेप बंद करील...

अयोध्या प्रकरणाचे प्रश्नचिन्ह!

अयोध्येतील एकूण जवळपास 70 एकर जागा केंद्र सरकारच्या ताब्यात आहे. त्यातील वादग्रस्त जागा फक्त 2.77 एकर आहे. उर्वरित जागा वादग्रस्त नाही. ती 1994 मध्ये केंद्र सरकारने आपल्या ताब्यात घेतली. तेव्हापासून त्या जमिनीचा ताबा केंद्र सरकारकडे आहे. ही जागा त्यांच्या त्यांच्या मालकांकडे सोपविण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे...

प्रियांकाचे आगमन- संधी आणि आव्हान...

सपा-बसपा आपल्यासाठी 12-14 जागा सोडतील असे पक्षाला वाटत होते, पण सपा-बसपा-लोकदल यांच्यात युती होऊन, फक्त अमेठी-रायबरेलीच्या दोन जागा कॉंग्रेससाठी सोडण्यात आल्यानंतर कॉंग्रेसची फार मोठी कोंडी झाली होती. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत 21 जागा जिंकणार्या कॉंग्रेससाठी एवढा मोठा अपमान पचविणे जड होते...

उत्तरप्रदेशातील जातीय समीकरण

मायावती-अखिलेश युतीचा, दलित, मुस्लिम, यादव यांची मते मिळविण्याचा प्रयत्न असेल. पण, ही सर्व मते शंभर टक्केच असतील, हे मात्र ठामपणे सांगता येत नाही. मात्र, याच्या विरोधात प्रतिक्रिया म्हणून ब्राह्मण, बनिया, जाट मते भाजपाकडे जातील. त्या स्थितीत भाजपाला ठाकूर, ओबीसी, काही दलित, बनिया, मुस्लिम महिला यांच्या मतांवर समाधान मानावे लागेल आणि भाजपाचे राज्यात 74 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान असेल...

अयोध्या पुन्हा लांबणीवर!

कॉंग्रेसनेही स्वबळावर सर्व 80 जागांवर निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे आता लढत तिरंगी होईल. याचा फायदा भाजपाला मिळू शकतो. मायावती-अखिलेश यादव यांनी पत्रपरिषदेत गठबंधन जाहीर करताना, कॉंग्रेसला आम्ही सोबत घेतलेले नाही असे सांगतानाच कॉंग्रेसवरही टीका केली. ही टीका कॉंग्रेसला डिवचण्यासारखी ठरली आहे...

लोकसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन!

ख्रिश्चियन मिशेलने, ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारात गांधी कुटुंबाचे नाव घेतल्याचे म्हटले जाते. एका स्थानिक न्यायालयात सादर करण्यात आलेल्या दस्तावेजात ही माहिती असल्याचे म्हटले जाते. याला स्वाभाविकच कॉंग्रेसकडून आव्हान दिले जात आहे. याचा अर्थ, लोकसभा निवडणुकीत राफेल विरुद्ध हेलिकॉप्टर घोटाळा, असाही एक सामना होण्याची शक्यता आहे...

फिर सुबह होगी!

मोदी सरकारविरुद्ध टोकाची भूमिका घेतल्यानंतर, सेनेने आता भाजपासोबत जागावाटप केले, तर यात सेनेचे हसे होणार आणि त्रिकोणी लढत झाल्यास शिवसेनेचे अधिक नुकसान होणार. ही स्थिती टाळली जाणे आवश्यक आहे. उत्तरप्रदेश, बिहार, महाराष्ट्र या तीन राज्यांतील एकूण 168 जागांपैकी 148 जागा भाजपा व मित्रपक्षांजवळ होत्या. फक्त20 जागा विरोधी पक्षांना मिळाल्या होत्या. यातील किती जागा भाजपा व मित्रपक्ष कायम राखतात, यावर नव्या लोकसभेचे चित्र अवलंबून राहणार आहे...

उत्तरप्रदेश, बिहारचे नवे समीकरण!

भाजपा-जनता दल यु 17-17 तर रामविलास पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष 6 असे राज्यातील जागा वाटप होण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये दोन्ही आघाड्या तुल्यबळ ठरत असून त्यांच्यात 40 जागांसाठी अटीतटीची लढत होण्याची चिन्हे आहेत. 2014 मध्ये भाजपा आघाडीला राज्यातील 40 पैकी 32 म्हणजे 80 टक्के जागांवर विजय मिळविला होता. त्याची पुनरावृत्ती 2019 मध्ये करण्याचा विश्वास भाजपाला वाटत आहे...

तीन राज्यांतील पराभवानंतर...

विधानसभा निवडणुकीचे मुद्दे वेगळे असतात, लोकसभा निवडणुकीचे मुद्दे वेगळे असतील. विधानसभा निवडणुकीत राज्याचे सरकार निवडण्यासाठी मतदान केले जाते, लोकसभा निवडणुकीत देशाचे सरकार निवडले जाते. मागील काही वर्षात मतदारांची एक परिपक्व मानसिकता तयार झाली आहे. मतदार एकाच पक्षाला बहुमताने निवडून देत असतात...

प्रतीक्षा- तीन निवाड्यांची!

हेलिकॉप्टर सौद्यातील एक दलाल ख्रिश्चन मिशेल याला भारतात आणण्यात आल्यानंतर तो या सौद्यावर काय बोलतो, यावर वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. मिशेल हा ब्रिटिश नागरिक असून, त्याला सध्या पाच दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठविण्यात आले आहे. 1200 कोटी रुपयांच्या या सौद्यात त्याला 250 कोटी रुपयांची दलाली देण्यात आली, असा आरोप आहे...

पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर...

पंतप्रधान मोदी यांचे, बर्लिनची भिंत कोसळू शकते तर भारत-पाकिस्तान यांच्यातील भिंतही कोसळू शकते, हे विधान फार मार्मिक आहे. बर्लिनची भिंत कोसळली ती काही एखादा करार करून नाही, तर दोन्ही देशांतील जनभावनांच्या रेट्याने कोसळली. भारत-पाक संबंधात तो रेटा नाही...

भारत-पाक संबधात नवा अध्याय...

शीख भाविकांना पाकिस्तानातील कर्तारपूर साहिब गुरुद्वाराला भेट देणे सुलभ व्हावे यासाठी कर्तारपूर कॉरिडॉर बांधण्याचा निर्णय भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांनी घेतला. हा एक महत्त्वाचा निर्णय मानला जातो. दोन्ही देशांच्या संबंधात एक नवा अध्याय सुरू करण्याच्या दिशेने टाकण्यात आलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे...

एका लढाऊ नेत्याचा अकाली मृत्यू!

केंद्रात शहरी विकास, ग्रामीण विकास, संस्कृती, रसायने व खते, संसदीय कामकाज अशी वेगवेगळी मंत्रालये सांभाळणार्या अनंतकुमार यांनी प्रत्येक मंत्रालयावर आपली छाप सोडली. विषयाची समज, नोकरशाहीला वरचढ होऊ न देण्याची त्यांची खास शैली, नियमांची माहिती आणि सोबत संघटनेत काम करण्याची मानसिकता, या गुणांमुळे त्यांनी आपले एक स्थान निमार्ंण केले होते...

बिहारमधील जागावाटपाने भाजपाला दिलासा!

बिहारमधील जागावाटपाने भाजपाला दिलासा!..

सर्वोच्च न्यायालयाचा संतुलित आदेश

संचालकांवरील आरोपांची चौकशी 14 दिवसांत पूर्ण करण्याचा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे आणि या चौकशीचे निष्कर्ष आल्यावर, सर्वोच्च न्यायालय पुढील सुनावणी करील. सर्वोच्च न्यायालय प्रसिद्धिमाध्यमांच्या वृत्तांची दखल तर घेऊ शकते, पण त्याआधारे निवाडा देऊ शकत नाही. त्यामुळे पहिल्या सुनावणीत यापेक्षा फार काही होईल असे अपेक्षित नव्हते...

शबरीमला ते अयोध्या...

अयोध्येतील रामजन्मभूमीवरील मंदिराचा प्रश्नही आस्था विरुद्ध न्यायालयीन लढाई, असा झाला आहे. प्रभू रामचंद्र म्हणजे अयोध्या आणि भगवान कृष्ण म्हणजे द्वारका, हे समीकरण समजावून सांगावे लागत नाही, एवढे ते नैसर्गिक आहे. अयोध्येत रामजन्मभूमीवर राममंदिर ही हिंदूंची आस्था आहे आणि प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. न्यायालयाचा निवाडा हिंदू व मुस्लिम दोन्ही समाजाचे एकाच वेळी समाधान करू शकणार नाही...

पाच राज्यांतील ‘सेमीफायनल!’

पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शाह या दोघांच्या शिदोरीवर या राज्यांमध्ये भाजपाला पूर्वीपेक्षाही अधिक मोठा, भव्य विजय मिळेल, असा दावा पक्षात केला जात आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड या दोन राज्यांमध्ये भाजपाचा विजय फार मोठा असेल, तर राजस्थानात तो जरा लहान असेल, असे पक्षाला वाटत आहे. या तिन्ही राज्यांत भाजपा सरकारांनी फार चांगले काम केले आहे. शिवाय तिन्ही राज्यांत भाजपाजवळ लोकप्रिय नेतृत्व आहे. त्याचा फायदा पक्षाला मिळेल, असे पक्षनेत्यांना वाटते. काही नेत्यांना तर तेलंगानामध्येही भाजपाच्या ..

तामिळनाडूत आता नवी समीकरणे!

तामिळनाडूत अण्णाद्रमुकचे सरकार असले, तरी त्या पक्षाजवळ आता नेता नाही. राज्य सरकार भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या चिखलात अडकलेले आहे. संपूर्ण पक्ष व सरकार दोन गटात विभागले गेले आहे. अशा स्थितीत 2019 मध्ये कोणाच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जायचे, हा एक मोठा प्रश्न अण्णाद्रमुकसमोर राहणार आहे...

सर्वोच्च न्यायालयात ‘संघर्षविराम!’

सर्वोच्च न्यायालयात अखेर संघर्षविराम झाला. उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. जोसेफ यांना सर्वोच्च न्यायालयात बढती देण्याच्या मुद्यावर सरकार व सर्वोच्च न्यायालयात गतिरोध तयार झाला होता. त्यातून संघर्षाची स्थिती तयार होत होती. न्या. जोसेफ यांच्या नावाला मंजुरी देत सरकारने ती टाळली...

पाकिस्तान लष्कराचा ‘इम्रान मुखौटा!’

पाकिस्तानात इम्रान खान नियाझीला विजयी करून, पाकिस्तान लष्कराने आपली ‘ताकद’ पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. पाकिस्तानात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत, इम्रानच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्यानंतर, त्याचा सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे...

लोकसभा जिंकली, आता निवडणुका!

अविश्वास प्रस्तावच्या निमित्ताने लोकसभेत मोदी विरुद्ध राहुल अशी खडाजंगी झडेल, असे म्हटले जात होते. ते झाले. इतर नेत्यांची भाषणे यात वाहून गेली. राहुल गांधींच्या प्रत्येक मुद्याला मोदी यांनी आक्रमक व नेमके उत्तर दिले. राहुल गांधींच्या प्रत्येक आरोपाला त्यांनी खोडून काढले. अविश्वास प्रस्ताव हे एक सांसदीय हत्यार असते आणि विरोधी पक्षांना हे हत्यार वापरण्याचा अधिकार असतो. विरोधकांनी आपला अधिकार वापरला आणि सरकारने पूर्ण शक्तिनिशी त्याचा मुकाबला केला...

लोकसभा निवडणुका मार्च महिन्यात

संसदेेचे पावसाळी अधिवेशन 18 तारखेपासून सुरू होत असून, सरकार व विरोधक यांच्यातील संबंधाची कल्पना या काळात येईल. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अविश्वास प्रस्तावाच्या वादात वाहून गेले होते. तेलगू देसमने मोदी सरकारच्या विरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर सभागृहातील गोंधळामुळे चर्चा होऊ शकली नव्हती. संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही फारसे कामकाज होऊ शकले नव्हते...

दिल्लीत आता दंगल-2 ची चिन्हे!

सर्वोच्च न्यायालयाने, दिल्ली सरकार चालविण्याचा मुख्यमंत्र्यांचा अधिकार मान्य केला आहे. एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने उपराज्यपाल व मुख्यमंत्री दोघांनाही फटकारले आहे. राजधानीत अराजक नको असे म्हणत केजरीवाल यांना समज दिली, तर सरकारच्या कामात बाधा नको असे म्हणत उपराज्यपालांना समज दिली आहे. पोलिस, भूसंपादन-आवंटन, कायदा- सुव्यवस्था या तीन बाबी वगळता अन्य सर्व विषयांवर कायदे करण्याचा, निर्णय घेण्याचा दिल्ली सरकारला अधिकार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या बहुमताच्या निवाड्यात म्हटले आहे...

लोकसभा निवडणुकीचा ‘मुहूर्त’!

300 चा आकडा गाठण्यासाठी इतर राज्यात भाजपाला 2014 मधील आपल्या यशाचे आकडे कायम ठेवावे लागतील. त्यात उत्तरप्रदेश 80 पैकी 71, राजस्थान 25 पैकी 25, गुजरात 26 पैकी 26, मध्यप्रदेश 29 पैकी 27, दिल्ली 7 पैकी 7, हरयाणा 10 पैकी 9 ही कामगिरी करणे एव्हरेस्ट शिखर काबीज करण्यासारखी असेल, जी पुन्हा पादाक्रांत करण्यासाठी भाजपाला अपार परिश्रम करावे लागतील आणि ही क्षमता मोदी-शाह यांच्या नेतृत्वात आहे...

पुन्हा एकदा काश्मीर!

राज्यपाल राजवटीत अधिक हिंसाचार व्हावा असे हुरियत नेत्यांना वाटते. अधिक हिंसाचार म्हणजे अधिक असंतोष. अधिक असंतोष म्हणजे पुन्हा अधिक हिंसाचार! काश्मीर खोर्‍यातील हिंसाचाराचे हे चक्र तोडण्यात आले पाहिजे. राज्यपाल राजवटीत असा प्रयत्न झाल्यास, ती राज्यपाल राजवटीची फार मोठी उपलब्धी मानली जाईल...

राजधानीतील ‘दंगल’!

राजधानीत पुन्हा एकदा नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात दंगल सुरू आहे. राजधानी दिल्लीला स्वत:चे असे काहीच नाही. हिमालयात बर्फ पडला की येथे थंडीची लाट येऊन धडकते, हरयाणात पाऊस पडला की दिल्लीला पुराचा धोका तयार होतो आणि राजस्थानातील लू येऊन पोहोचली की दिल्ली धुळीने माखली जाते. जे सध्या सुरू आहे...

दिल्लीतली दंगल

केजरीवाल हे दिल्लीच्या जनतेचे प्रतिनिधी आहेत आणि या संघर्षात बळी जात आहे तो सामान्य जनतेचा...

महाराष्ट्रात महागठबंधन की महायुती?

लोकसभेच्या निवडणुका 2018 मध्ये होतील की 2019 ला, असा एक प्रश्न विचारला जात आहे. मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगढ या तीन राज्यांमध्ये डिसेंबर महिन्यात निवडणुका आहेत. या निवडणुका भाजपासाठी कठीण असल्याचे मानले जाते. समजा, या राज्यांत कॉंग्रेसला यश मिळाल्यास ते कॉंग्रेसचे मनौधैर्य उंचावणारे असेल. त्यानंतर मे महिन्यात लोकसभेची निवडणूक झाल्यास, विधानसभेतील यशाचा फायदा कॉंग्रेसला मिळू शकतो...

कैरानाचा कौल!

मोदी सरकारने काही चांगली कामे केली आहेत. महिलांसाठी गॅस कनेक्शन हे त्यातील एक प्रमुख आहे. युरियाचा काळाबाजार थांबला. आणखीही काही कामांची यादी सांगता येईल. पण, ही कामे जनतेपर्यंत पोहोचली नाहीत असे दिसते. सरकारी कर्मचारी वा जाहिराती हे जनतेपर्यंत जाण्याचे माध्यम असू शकत नाही...

कर्नाटकात नवे सरकार, नवे समीकरण!

नैतिक आणि कायदेशीर! जेव्हा जेव्हा यात द्वंद्व वा संघर्ष होतो, नैतिकतेची निवड करण्यात आली पाहिजे. कारण, जे कायदेशीर असते, ते नैतिक असतेच असे नाही. याउलट जे नैतिक असते ते कधीच बेकायदेशीर असू शकत नाही. कर्नाटकात याबाबतीत भाजपाची गल्लत झाली...

सर्वोच्च न्यायालय ज्वालामुखीच्या मुखावर!

सर्वोच्च न्यायालय ज्वालामुखीच्या उंबरठ्यावर उभे आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला संघर्ष संपुष्टात यावा असे देशातील जनतेला वाटत असले, तरी सर्वोच्च न्यायालयातील वाटचाल एका ज्वालामुखीच्या उद्रेकाकडे जात असल्याचे दिवसेंदिवस स्पष्ट होत आहे...

भारत-चीन संबंधाचा नवा अध्याय!

चीनचे राष्ट्रपती शी जिनिंपग व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-चीन संबंधाचा नवा अध्याय सुरू केला. मोदी यांच्या दोन दिवसांच्या चीन दौर्‍याबाबत कोणतेही प्रसिद्धिपत्रक वा निवेदन जारी करण्यात आले नसले तरी, डोकलाम प्रकरणी दोन्ही देशात 73 दिवस चाललेले शीतयुद्ध आता इतिहासात जमा झाले असे मानण्यास हरकत नाही...

संकट टळले, संकट अटळ!

सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा यांच्यावर महाभियोग चालविण्याचा सात विरोधी पक्षांचा प्रस्ताव राज्यसभा अध्यक्ष व उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील एक संकट टळले आहे तर न्या. जोसेफ यांना सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळल्याने एक नवे संकट अटळ असल्याची स्पष्ट चिन्हे आहेत...

सर्वोच्च न्यायालयातील सर्वोच्च संकट!

गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने, न्या. लोया यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची गरज नसल्याचा आदेश दिला. त्या आदेशानंतर 24 तासांच्या आत काही विरोधी पक्षांनी सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोगाची नोटीस दिली. विरोधी पक्षांनी ही नोटीस तयार ठेवली होती. न्या. लोया प्रकरणात सर्वोच्च न्यायालय कोणती भूमिका घेते, हे समजल्यावर महाभियोगाबाबत निर्णय करावा, असे विरोधी पक्षांनी ठरविले होते असे समजते...

‘उत्तर’ प्रदेश आता ‘प्रश्न’ प्रदेश!

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत कसे मिळणार, असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्याचे उत्तर ‘उत्तर’ प्रदेशाने दिले होते. 2019 मध्ये पुन्हा असाच प्रश्न विचारला जाणार आहे आणि 2014 मध्ये या प्रश्नाचे उत्तर देणारा प्रदेश आता सत्ताधारी भाजपासाठी ‘प्रश्न’प्रदेश ठरत आहे...

‘‘लोकसभा हा जनभावनांचा ‘सेफ्टी व्हाल्व’

संसदेत सुरू असलेला गतिरोध कायम राहणार असल्याचे संकेत आहेत. 2019 च्या निवडणुकीपर्यंत तरी हा गतिरोध संपुष्टात येईल असे वाटत नाही. एक गंभीर गतिरोध संसदेच्या कामकाजात निर्माण झाला आणि तो कमी होण्याऐवजी वाढण्याचे संकेत आहेत. आता तर हा गतिरोध 2019 पर्यंत चालण्याची स्पष्ट चिन्हे आहेत...

2019 मध्ये सार्‍या देशात ‘एकास - एक’!

उत्तरप्रदेशात- फुलपूर व गोरखपूरमध्ये एकास एक लढत दिल्यानंतर आता सार्‍या देशात भाजपा विरुद्ध एकच उमेदवार अशी तयारी विरोधी पक्षांनी सुरू केली आहे. या तयारीचा परिणाम काय होतो हे 2019 ची मतमोजणी झाल्यावर दिसेल...

गतिरोधात अडकलेला अविश्वास प्रस्ताव

लोकसभेत मोदी सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मांडण्याच्या स्पर्धेतून तेलगू देसमने मोदी सरकारचा पाठिंबा काढून तर घेतला. पण, अद्याप असा प्रस्ताव सादर झालेला नाही...

फुलपूर, गोरखपूरचे संकट!

राजकारणात कायम मित्र नसतात आणि कायम शत्रूही नसतात. फुलपूर-गोरखपूरच्या निकालानंतर 48 तासांच्या आत आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी भाजपा आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि आपले कट्टर शत्रू वायएसआर कॉंग्रेसच्या अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देण्याची घोषणा केली...

त्रिपुरातील विजयाला ‘चंद्रग्रहण’!

त्रिपुरात भाजपाला मिळालेल्या नेत्रदीपक विजयाला ‘चंद्रग्रहणा’ने ग्रासले. त्रिपुरात विजयाचा जल्लोष सुरू असतानाच, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केंद्रातील मोदी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला व पंतप्रधान मोदी यांच्या समजावणीनंतरही आपल्या निर्णयाची अंलबजावणी केली. नायडू यांनी केंद्र सरकारकडे आंध्रप्रदेशासाठी विशेष दर्जा मागितला आहे, जो देणे सरकारला शक्य नाही. विशेष दर्जा आणि विशेष पॅकेज यात अंतर आहे. विशेष पॅकेज देण्याची, त्यावर चर्चा करण्याची केंद्र सरकारची तयारी होती, पण नायडू ..

संसद अधिवेशनावर घोटाळ्याचे सावट!

काँग्रेसनेते अहमद पटेल यांच्या राज्यसभा निवडणुकीपासून, भाजपासाठी अप्रिय घटनांची सुरू झालेली मालिका, पूर्वोत्तर राज्यातील निकालांनी संपली. मागील काही महिन्यांपासून घडणाऱ्या घटना भाजपाच्या विरोधात जात होत्या. पूर्वोत्तर राज्यांतून मात्र भाजपासाठी चांगली बातमी मिळाली. गुजरात राज्यसभा निवडणुकीत अहमद पटेल यांचा निसटता विजय झाला. हा विजय काँग्रेसचे मनौधैर्य उंचावणारा ठरला. त्यानंतर गुरुदासपूर लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाला. मध्यप्रदेशातील चित्रकुट विधानसभा जागा काँग्रेसला मिळाली. डिसेंबर महिन्यात ..

राजधानीतील ‘ब्रेकडाऊन!’

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे खरोखरीच लढाऊ नेते आहेत. प्रथम त्यांनी भाजपाशी संघर्ष केला. नंतर त्यांनी अण्णा हजारेंशी संघर्ष केला. मग, कुमार विश्वास, योगेंद्र यादव, प्रशांत भूषण या आपल्या सहकाऱ्याशी संघर्ष केला. नंतर उपराज्यपाल नजीब जंग यांच्याशी संघर्ष केला आणि आता त्यांनी आपल्या मुख्य सचिवांशी संघर्ष केला. दिल्ली सरकारचे मुख्य सचिव अंशू प्रकाश यांना त्यांच्यासमक्ष आपच्या दोघा आमदारांनी मारहाण केली. अरविंद केजरवाल म्हणजे अराजक असे जे म्हटले जात होते, ती स्थिती केजरीवाल यांनी दिल्लीत तयार ..

भारत-पाकमधील मीडिया वॉर!

काश्मीर खोऱ्यात हिंसाराचाने पुन्हा थैमान घातले असून, सुरक्षा दळांचे आणखी जवान शहीद होत आहेत. भारत-पाकिस्तान सीमेवरही पाकिस्तानी लष्कराच्या कारवाया वाढल्या असून, पाकिस्तानने युद्धबंदी उल्लंघनाचा जणू निर्णयच घेतला असल्याचे दिसत आहे. भारतीय लष्कराने पाक चौक्यांविरुद्ध जबर कारवाई केल्यानंतर पाकिस्तानने त्यास उत्तर देत भारतीय चौक्यांवर उखळी तोफांचा मारा केला. आजवर पाकिस्तानने ही मजल गाठली नव्हती. पाकिस्तान काश्मिरी अतिरेक्यांना हाताशी धरून आपल्या कारवाया चालवीत होता. मागील काही महिन्यांत भारतीय लष्कराने ..

श्रीराम जन्मभूमी खटल्याला नवे वळण!

‘प्लिज ट्रीट धीस इज ए लॅण्ड इश्यू’! सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या या एका विधानाने रामजन्मभूमी-बाबरी खटल्याने गुरुवारी नवे वळण घेतले. चित्रपट निर्माता श्याम बेनेगल यांच्यासह आणखी काही व्यक्तींनी या खटल्यात आपल्यालाही पक्षकार करण्यात यावे व आपल्याला भूमिका मांडण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ती फेटाळताना सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी ही टिप्पणी केली...

सरन्यायाधीशांवर महाभियोगाची तलवार?

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत असून, १ फेब्रुवारीला सादर होणारा अर्थसंकल्प व सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याची विरोधी पक्षांची खेळी, या दोन बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत...

सर्वोच्च न्यायालयातील ‘सर्वोच्च’ संकट

प्रत्येक न्यायाधीश आपल्या कार्यकाळात अनेक निवाडे करीत असतो. मात्र, त्या न्यायाधीशाचा निवाडा इतिहास करीत असतो. हे मार्मिक भाष्य आहे मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश न्या. मोहम्मद करीम छागला यांचे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयात आज जे काही सुरू आहे ते पाहताना न्या. छागला यांच्या या विधानाचे स्मरण होते. ..

सर्वोच्च न्यायालयातील उठाव!

शुक्रवारी अचानक सर्वोच्च न्यायालयाच्या चार वरिष्ठ न्यायमूर्तींनी एक पत्रकार परिषद घेत सरन्यायाधीशांवर काही गंभीर आरोप लावीत एक प्रकारे त्यांच्या विरोधात उठाव केला. देशाच्या इतिहासात हे प्रथमच झाले...

गुजरातचा धडा!

गुजरातचे निकाल भाजपा व काँग्रेस दोन्ही पक्षांना दिलासा देणारे ठरले..

गुजरात-हिमाचलचे निकाल!

गुजरात-हिमाचलचे निकाल! ..

गुजरातमध्ये तुल्यबळ!

गुजरातमध्ये तुल्यबळ!..

गुजरातमध्ये तुल्यबळ !

क ताज्या जनमत चाचणीने गुजरातमध्ये भाजपा-काँग्रेस यांच्यातील लढत आता तुल्यबळ झाली असल्याचा निष्कर्ष काढला आहे. भाजपा व काँग्रेस दोन्ही पक्षांना प्रत्येकी ४३- ४३ टक्के मते मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जागा मात्र भाजपाला जादा मिळतील असे सांगण्यात आले आहे. अन्य एका जनमत चाचणीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे, तर दुसर्‍या दोन जनमत चाचण्यांनी भाजपाला बहुमत मिळण्याचा अंदाज सांगितला आहे...

राहुलयात्रा-केदारनाथ ते सोमनाथ!

राहुलयात्रा-केदारनाथ ते सोमनाथ!..

भाईयुग संपले, भैयायुग सुरू!

३ वर्षांपासून काँग्रेस पक्षात सुरू असलेले ‘भाईयुग‘ समाप्त होत आहे, तर ‘भैयायुग’ सुरू होत आहे. गुजरात निवडणुकांचा पक्षासाठी हा पहिला संकेत आहे. ..

पनामानंतर पॅराडाईज पेपर्स!

पनामा पेपर्स या नावाने काही दस्तावेज यापूर्वीच समोर आले आहेत. त्यातही काही भारतीयांची नावे होती. आता पॅराडाईज पेपर्समध्येही काही भारतीयांची नावे आढळून आली आहेत. या दोन्ही दस्तावेजांमध्ये चित्रपट अभिनेता अमिताभ बच्चनचे नाव आहे. त्याने याचा इन्कार केला आहे. या सार्‍या दस्तावेजांचे वैशिष्ट्य म्हणजे हे सारे व्यवहार एवढे गुंतागुंतीचे असतात की, त्या गोपनीय खात्यांचा खरा मालक शोधून काढणे केवळ अवघडच नाही तर अशक्य असते. ..