अर्थवृत्तांत

'उत्सवी' नानासाहेब...

नानासाहेब शेंडकर शंभरच्या वर कर्मचार्‍यांना थेट रोजगार, सुशिक्षित तरुणांसाठी उद्योजगतेच्या संधी तर देत आहेतच; पण सोबत सामाजिक भान जपत पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची चळवळदेखील उभारत आहेत. त्यांचे कर्तृत्व पुढच्या पिढीसाठी वरदान आहे...

'प्लास्टिक वॉरिअर'

महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी असली तरी प्लास्टिकमुक्ती मात्र झालेली नाही. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी प्लास्टिकमुक्तीचा विडा उचलणार्‍या मुलुंडच्या अस्मिता गोखले यांच्या कार्याविषयी जाणून घेऊया.....

कंपन्यांच्या कर्जरोख्यांत गुंतवणूक करणे कितपत फायदेशीर?

गुंतवणुकीच्या बर्‍याचशा उपलब्ध पर्यायांपैकी फार मर्यादित पर्यायांची आपल्याला माहिती असते. त्यातही आपण गुंतवणूक सल्लागारांवर अवलंबून असतोच. अशावेळी पारंपरिक गुंतवणुकीच्या पर्यायांबरोबरच कंपन्यांच्या कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक करावी किंवा नाही, याबाबत अर्थवर्तुळातही मतमतांतरे दिसतात. तेव्हा, नेमके कंपनीचे कर्जरोखे म्हणजे काय? त्यामध्ये कशी आणि किती गुंतवणूक करावी? यांसारख्या विविध प्रश्नांची उकल करणारा हा लेख.....

आहे म्युच्युअल फंड तरी...

गेल्या आठवड्यात बाजाराने अजिबात उसंत न घेता रोजच आपटी खाल्ली. आपल्याकडे श्रावण 'पाळण्या'ची संस्कारी शिकवण आहे. बाजार श्रावणात निर्देशांकांची हिरवळ दाखवेल की श्रावणसरी बाजाराची स्वच्छता करतील येत्या काळात हे अनुभवायला मिळेलच...

बँकांच्या राष्ट्रीयीकरणाची ५० वर्षे

यंदाच्या जुलै महिन्यात बँकांच्या राष्ट्रीयीकरणाला ५० वर्षं पूर्ण झाली. परंतु, आजच्या पिढीला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतलेल्या या निर्णयाविषयी फारशी माहिती नाही. त्यामुळे नेमके बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले, म्हणजे काय झाले, हे समजून घेणे आजही तितकेच महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर या राष्ट्रीयीकरणानंतर भारतीय बँकिंग क्षेत्राचे बदलेले स्वरुप व त्याचा रोजगारासह एकूणच अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम यांचाही ऊहापोह करणे क्रमप्राप्त ठरेल...

नोकरी नाकारून उद्योजिका झालेली फॅशन डिझायनर...

ती फॅशन डिझायनर म्हणजे ‘नेहा चव्हाण डिझाईन स्टुडिओ’ या ब्राईडल वेअर ब्रॅण्डची संस्थापिका आणि सर्वेसर्वा नेहा चव्हाण...

'एमएसएमई'चे अर्थव्यवस्थेतील स्थान

'एमएसएमई' म्हणजे मायक्रो, स्मॉल, मीडियम इंडस्ट्रीज म्हणजे अतिसूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे अर्थव्यवस्थेतील स्थान फार महत्त्वाचे आहे. 'एमएसएमई'मुळे कमी भांडवली खर्चात जास्त रोजगार उपलब्ध होतात. भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास, शेतकी उद्योगानंतर 'एमएसएमई'चा विचार करावा लागतो...

काळ्यापैशांचे स्त्रोत मोदी सरकारच्या रडारवर

आयकर भरताना द्यावी लागणार कंपन्यांच्या समभागांची संपूर्ण माहीती ..

नवभारताचा अर्थसंकल्प

नरेंद्र मोदी सरकारच्या आजवरच्या धोरणांचा, योजनांचा परिपाक म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेला अर्थसंकल्प. या अर्थसंकल्पाने मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातील यशस्वी कृतिशील धोरणांची उजळणी तर करून दिलीच, पण अजून खूप मोठा पल्ला सरकारला गाठायचा असून त्यासाठी जनसहकार्याचीही अपेक्षा व्यक्त केली. निवडणुकीच्या जाहीरनाम्यातील विकासाची ‘ब्लूप्रिंट’ प्रत्यक्षात आणण्यासाठी मोदी सरकारने या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून उचललेले प्रत्येक पाऊल हे कौतुकास्पद असून ‘सबका साथ, सबका विकास ..

सुनीता मसुरकरांचे हॉटेल ग्रीन चॅनेल

एक स्त्री उद्योजिका झाली तर संपूर्ण कुटुंब उद्योजक म्हणून घडतं. प्रामाणिकपणा, प्रचंड कष्ट आणि नैतिक मूल्य यांचं सिंचन सुनीता मसुरकरांनी केल्याने ‘ग्रीन चॅनेल’ खर्‍या अर्थाने फुलले, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही...

घर भाड्याने देताना....

रिअल इस्टेट क्षेत्रातील दीर्घकालीन गुंतवणूक ही निश्चितच फायदेशीर ठरते. म्हणूनच, अनेक गुंतवणुकदारांचा कल हा घर खरेदी करुन, ते भाड्याने देण्याकडेही असतो. त्यामुळे घर भाड्याने देण्याच्या विचारात असाल, तर नेमकी काय काळजी घेतली पाहिजे, यासंबंधी माहिती देणारा हा लेख.......

अपेक्षित 'नमोनॉमिक्स'

'नमोनॉमिक्स' म्हणजे 'नरेंद्र मोदींचे इकॉनॉमिक्स.' मोदी सरकार दणक्यात स्थानापन्न झालेले आहे. मोदी सरकारपुढे सध्या विरोधी पक्षांचे आव्हान नाही, तर लोकांच्या अपेक्षापूर्तींचे आव्हान आहे. त्याविषयी.....

पालक-विद्यार्थ्यांना घडविणारा अवलिया - संदीप मोरे

आज संदीप मोरे यांच्या क्लासेसच्या परिवारात २४ शिक्षक कार्यरत आहेत. शेकडो विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य अविरत सुरू आहे. आजही मुले इंजिनिअर, डॉक्टर, वकील, उद्योजक, इंटिरिअर डिझाईनर म्हणून आपापल्या क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत...

केंद्र सरकारचे डिजिटल व्यवहारांना प्राधान्य

केंद्र सरकारने भ्रष्टाचार कमी व्हावा,काळ्या पैशांच्या निर्मितीस आळा बसावा, याउद्देशाने नोटाबंदी जाहीर केली होती. पण, त्याला मर्यादित यश मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भ्रष्टाचाराविषयी प्रचंड तिरस्कार आहे. भ्रष्टाचार कमी व्हावा, काळ्या पैशाची निर्मिती कमी व्हावी, अकाऊंटिंग बरोबर असावे; परिणामी, योग्य कर भरले जावेत म्हणून केंद्र सरकारने आल्या आल्या डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली...

पैठणीमधील यशस्वी ब्रॅण्ड‘राणेज पैठणी’

‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा...’ असं जेव्हा केव्हा गाणं सुरू होतं, तेव्हा पैठणीचा मोर नजरेसमोर फेर धरून नाचायला लागतो. पैठणीचं स्वत:चं एक वलय आहे. हे वलय आपोआप त्या व्यक्तीलासुद्धा प्राप्त होतं, जो या पैठणीच्या सान्निध्यात येतो. या पैठणीने त्याचं आयुष्य अगदीच बदलून टाकलं. एक सर्वसामान्य मुलगा आज काही कोटींची उलाढाल करतोय हे स्वप्नातीत आहे. मात्र, हे स्वप्न त्याने साकारलंय. हा स्वप्न साकारणारा तरुण म्हणजे ‘राणेज पैठणी’चे निनाद राणे...

विश्वासार्हता जपणारे पेंडुरकर ज्वेलर्स

पूर्वीच्या काळी पिढ्यान्पिढ्या एखाद्या सराफाकडून दागिने खरेदी करणे, हा एकप्रकारे अलिखित नियमच होता. अशाच सराफांपैकी ते सुद्धा एक. अगदी सहा पिढ्यांपासून सुरू झालेला सोन्या-चांदीचा व्यवसाय म्हणजे जणू त्यांच्यावरच्या विश्वासार्हतेचं प्रमाणपत्रच जणू. आजीच्या लग्नासाठी सोन्या-चांदीची खरेदी याच दुकानात झाली आणि नातीच्या लग्नासाठी दागिने खरेदी करायलासुद्धा इथेच येतात. हे नातं जपलंय मुरलीधर वासुदेव पेंडुरकर अर्थात एम. व्ही. पेंडुरकर ज्वेलर्सने. या परंपरेची वाटचाल उलगडत आहेत मुरलीधरांचे नातू अभिषेक पेंडुरकर...

गंभीर स्वरूपाच्या आजारांसाठी विम्याच्या खास योजना

आरोग्य विम्याच्या मेडिक्लेमच्या ज्या पारंपरिक पॉलिसी आहेत, त्यात सर्व प्रकारचे आजार समाविष्ट असतात. पण, कर्करोग, मधुमेह, हृदयविकार असे जे गंभीर स्वरूपाचे आजार आहेत, अशा आजारांसाठी खास पॉलिसीज उपलब्ध आहेत. मधुमेहींना संरक्षण देणार्‍या पॉलिसीजची जी कमतरता होती, ती आता भरून निघाली आहे. गंभीर स्वरूपाचे आजार असणार्‍यांनी त्यांच्या आजारासाठी असलेली खास पॉलिसी घ्यावीच, पण त्याशिवाय पारंपरिक पॉलिसीही घ्यावी...

४ हजार रुपयांची नोकरी ते ४० कोटींपर्यंतचा एक अतुलनीय प्रवास

सध्या कंपनीचे महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ या राज्यांत वितरणाचे मजबूत जाळे आहे. टेलिकॉम तसेच एखाद्या कार्यालयासाठी लागणारी ‘इलेक्ट्रॉनिक सिस्टिम’ अर्थात ‘ऑफिस ऑटोमेशन’ ही आधुनिक प्रणाली ‘लेझर सिस्टिम्स’ पुरविते. ..

आर्थिक वर्ष २०१८-१९च्या प्राप्तीकर रिटर्न फॉर्म्समध्ये केलेले बदल

यंदा आपला प्राप्तीकर रिटर्न फाईल करताना करदात्यांना काही बदललेल्या नियमांची दखल घ्यावी लागणार आहे. तेव्हा, या नेमक्या बदललेल्या नियमांचा या लेखात घेतलेला हा सविस्तर आढावा...

ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी बँकिंग ओम्बड्समन

‘बँकिंग ओम्बड्समन’ ही ‘लोकपाल’ सारखी यंत्रणा उपलब्ध आहे. त्यामुळे या यंत्रणेकडे कधी तक्रार दाखल करता येते? त्यामुळे खरंच काही फरक पडतो का? यांसारख्या शंकाकुशंकांचे निरसन करणारा हा लेख.....

पैठणीचा विश्वसनीय ब्रॅण्ड‘साजिरी’

पैठणीने अनेकांना ओळख मिळवून दिली आहे. अनेकांना उद्योजक म्हणून घडवलं आहे. त्यातलंच एक अग्रणी नाव म्हणजे दीपा लेले- चेऊलकर यांचे ‘साजिरी सारीज अ‍ॅण्ड बियॉण्ड.’..

विमाउद्योगात भारी, संजय तारी

गेल्या दोन दशकांत संजय तारी यांनी ‘एसेन्श्युअर फायनान्शियल सोल्युशन्स प्रा. लि.’ च्या माध्यमातून ४० हून अधिक स्वयंरोजगार करणारे तरुण घडवले आहेत. किंबहुना, ४० हून अधिक तरुणांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगार दिला. साडेतीन हजारांहून अधिक ग्राहक आज तारींशी जोडले गेले आहेत. ‘मिलियन डॉलर राऊंड टेबल’ हा आर्थिक उद्योगातील एक मानाचा समजला जाणारा बहुमान संजय तारी यांना सातवेळा प्राप्त झाला आहे. सध्या कंपनीची उलाढाल पाच कोटी रुपये एवढी आहे. भविष्यात एक हजारांहून अधिक विमा एजंट घडविणे, हे संजय तारी यांचे ध्येय ..

अनियंत्रित ठेवींवरील बंदी आणि सरकारचा वटहुकूम

बरेच बांधकाम व्यावसायिक व सोने-चांदीचे व्यवहार करणार्‍या पेढ्यांचे मालक गेली कित्येक वर्षे जनतेकडून ठेवी स्वीकारीत व त्यांच्याकडे गुंतवूणक करणार्‍यांना जास्त दराने व्याज देत. या व्यवहारावर कोणताही नियंत्रक नसल्यामुळे व गुंतवूणकदारांच्या दृष्टीने ही गुंतवणूक अतिशय जोखमीची असल्यामुळे शासनाने यावर नुकतीच बंदी घातली. ..

मुंबई शेअर बाजाराची चाळिशी

दि. १ एप्रिल, २०१९ रोजी मुंबई शेअर बाजाराला ४० वर्षे पूर्ण झाली. शेअर बाजार अस्तित्वात आल्यानंतरच्या काळात झालेला चांगला पाऊस व कंपन्यांची चांगली कामगिरी यामुळे शेअर निर्देशांक अकरा वर्षांनंतर एक हजार अंशांचा टप्पा पार करु शकला. हर्षद मेहता घोटाळ्यामुळे शेअर बाजारात जो बुडबुडा निर्माण झाला होता, त्यामुळे एप्रिल १९९२ मध्ये निर्देशांकाने चार हजार अंशांचा पल्ला गाठला...

ट्रक वाहतूक क्षेत्रातील सम्राट : अशोक शाह

१९६९ साली कुंवरजी शहाचे ज्येष्ठ चिरंजीव अशोक शहा यांनी व्यवसायात पदार्पण केले. लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्याकडची मुलं मामाच्या गावाला जात. अशोक मात्र ट्रकमधून माल पोहोचविण्यासाठी गुजरात पालथा घालत असे. अनेकवेळा ट्रकमधल्या मालासोबतच तो ट्रकमध्ये झोपी जाई. ट्रक चालविण्यापासून, ट्रक दुरुस्त करण्यापर्यंत अगदी ऑफिसमधल्या अकाऊंटपर्यंत सर्व काही अशोकने शिकून घेतले. अशोक बोर्डिंगमध्ये शिकल्यामुळे स्वावलंबी होता. दहावीपर्यंत त्याने पहिला क्रमांक कधीच सोडला नाही. बारावीनंतर एचआर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ..

‘इक्विटी’ संलग्न बचत योजना

१ एप्रिल, २०१९ पासून २०१९-२०२० हे आर्थिक वर्ष सुरू झाले. वर्षाच्या सुरुवातीलाच गुंतवणुकीचे नियोजन करणे नेहमी चांगले असते. वर्षाच्या सुरुवातीलाच ‘इक्विटी लिन्कड सेव्हिंगज स्कीम’ (ईएलएसएस) म्हणजेच ‘इक्विटी संलग्न बचत योजनां’त गुंतवणूक करणे चांगले. ‘इक्विटी’ म्हणजे कंपनीचे शेअर भागभांडवल यांच्याशी ही गुंतवणूक योजना संलग्न आहे. ही गुंतवणूक म्युच्युअल फंड प्रकारात मोडते. प्राप्तीकर वाचविण्यासाठी यामध्ये तरतूद आहे. ..

विदर्भातल्या पहिल्या पैठणीच्या कारखानदार - माधुरी गिरी

मराठी माणसांनी कधी कारखाना काढलाय का? त्यातल्या त्यात तुमच्यासारख्या बाईमाणसाने तर यात पडूच नये. तुम्ही शहरात एखादं चांगलं शोरूम काढा अन् तिथं थंडगार ठिकाणी साड्या विका. नको त्या भानगडीत कशाला पडता.” एका सरकारी अधिकार्‍याचे हे उद्गार ऐकून एखादी स्त्री सोडा, पण कोणताही पुरुषसुद्धा अगदी हतबल झाला असता. मात्र, ‘तिने’ तेच शब्द उराशी बाळगले आणि आपण आता कारखानदार म्हणून उभं राहायचंच, असा मनाशी चंग बांधला. अवघ्या सहा महिन्यांत विदर्भातला पहिला पैठणीचा कारखाना अकोला एमआयडीसीमध्ये तिने सुरू केला. प्रवाहाच्या ..

गुंतवणुकीसाठी नव्हे, सुरक्षेसाठी हवा

जीवन विमाजानेवारी ते मार्च २०१९ या कालावधीत जीवन विमा पॉलिसी विक्रीत फार मोठ्या प्रमाणावर वाढ झाली, याचे कारण भारतीय नागरिक आयकरात सवलत मिळण्यासाठी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांत विमा पॉलिसी विकत घेतात. ..

मुलांचं भावविश्व जपणारे ‘लव्हली टॉईज’

खेळण्यांविषयी लहान मुलांना एक वेगळंच आकर्षण असतं. अलीकडे मात्र या खेळण्यांची जागा डिजिटल खेळण्यांनी घेतलेली दिसते. ही खेळणी म्हणजे या लहान मुलांची निरागसता होती, जी काळाच्या ओघात लोप पावते की काय अशी भीती वाटते. मात्र, ‘लव्हली टॉईज’ने मुलांमधलं हे बालपण जपलं. ती निरागसता जपली आहे आणि ते सुद्धा तब्बल तीन दशके. कारण, निव्वळ व्यावसायिक नफ्यासाठी खेळणी बनविणे, हा या कंपनीचा उद्देश नाही तर मुलांनी त्यांच्या निरागस बालपणाला जपावं, हाच उदात्त हेतू यामागे आहे. हे तत्त्व जपणार्‍या आणि या तत्त्वालाच आपल्या ..

अपरिवर्तनीय कर्जरोख्यांत गुंतवणूक करावी का?

कंपन्या भागभांडवल शेअरच्या रूपाने जसे विक्रीस काढतात, तसेच कंपन्या, वित्तीय संस्था किंवा अन्य आस्थापने त्यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी जनतेसाठी कर्जरोखे सार्वजनिक विक्रीस काढतात. कर्जरोख्याचे विक्रीमूल्य निश्चित असते. गुंतवणुकीचा कालावधी निश्चित असतो. या गुंतवणुकीवर देण्यात येणारे व्याजाचे दर निश्चित असतात. गुंतविलेल्या रकमेवर वेळोवेळी व्याज दिले जाते, त्यांना ‘परिवर्तनीय कर्जरोखे’ म्हटले जाते व ज्या कर्जरोख्यांची गुंतविलेली पूर्ण रक्कम गुंतवणूकदारांना मूदतपूर्तीच्या वेळी परत केली जाते, अशा कर्जरोख्यां..

नवे तंत्रज्ञान, नवे प्रश्न...

शेती, उद्योग आणि दळणवळणाच्या क्षेत्रात अनेक प्रकारे या चलाख वस्तूंचे उपयोजन होईल. शेतातील पंप जमिनीतील ओल कमी झाली की सुरू होईल. आवश्यक त्या प्रमाणात जमिनीत पाणी उपलब्ध झाले की, तो बंद होईल. खते आणि कीटकनाशकांची मात्रा हव्या त्या प्रमाणात हव्या त्या वेळी देण्याची योजना करता येईल. उत्पादनक्षेत्रात ही उपकरणे लहान यंत्रमानवाप्रमाणे काम करतील...

मेडिक्लेम पॉलिसी आणि पोर्टेबिलिटीची प्रक्रिया

मेडिक्लेम किंवा आरोग्य विमा पॉलिसीज सार्वजनिक उद्योगातील विमा कंपन्यांकडून किंवा खाजगी विमा कंपन्यांकडून ग्राहक विकत घेतात. पॉलिसी घेतल्यानंतर त्या कंपनीची सेवा न आवडल्यामुळे किंवा अन्य कारणांनी तीच पॉलिसी दुसऱ्या कंपनीत जशीच्या तशी बदलून घेण्याची सोय आहे. याला पॉलिसी ‘पोर्ट’ करणे म्हणतात. ही प्रक्रिया नेमकी कशी करावी, त्या संदर्भात माहिती देणारा हा लेख.... ..

विवेक उद्योगस्वामिनी : महिलांनी महिलांसाठी महिलांकडून चालवलेलं उद्योगपीठ

आज दि. ८ मार्च... दरवर्षी हा दिवस ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा केला जात असला तरी, त्याचं औचित्य साधून संपूर्ण मार्च महिनाच महिलांसाठीच्या काही ना काही कार्यक्रमांनी भरलेला असतो. यावर्षी महिला दिनाचं औचित्य साधून ‘विवेक समूह’ महिला उद्योजकांसाठी ‘विवेक उद्योगस्वमिनी’ हा एक अभिनव उपक्रम घेऊन आला आहे. शनिवार दि. १६ मार्च रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, मुंबई येथे दुपारी ३ ते ६ या वेळात या उपक्रमाचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार आणि ‘बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज’चे ..

शैक्षणिक कर्ज घेणे आवश्यक असल्यास...

सध्याच्या पालकांकडे विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणासाठी तरतूद करणार्‍या बर्‍याच गुंतवणूक योजना आहेत. कन्यांसाठी ‘सुकन्या समृद्धी’ योजना आहे. म्युच्युअल फंडाच्या ‘एसआयपी’ योजना आहेत. आज नोकरदारांकडे अतिरिक्त पैसाही आहे की, ज्यातून ते गुंतवणूक करू शकतात पण पालकांपुढे उच्च शिक्षणासाठी लागणारा पैसा उभा करण्याची क्षमता नसते. अशा पालकांना मुलांसाठी शैक्षणिक कर्ज घेण्याशिवाय पर्याय नसतो. काही पालक शिक्षणासाठी येणार्‍या खर्चापैकी काही रक्कम जमा करू शकतात तर उरलेल्या रकमेसाठी शैक्षणिक कर्ज घ्यावे लागते...

योगाक्वीन श्वेता वर्पे

महानगरपालिकेच्या शाळेतील मराठी माध्यमातून शिकलेली श्वेता वर्पे... कुंभारवाडा या मराठी मध्यमवर्गीय चाळीतील ती मुलगी आज जगाच्या एका मोठ्या मंचावर उभी होती. निमित्त होतं, एका सौंदर्यस्पर्धेचं. जमैका देशातील किंग्जस्टन येथे भरली होती ती स्पर्धा. ती स्पर्धाही काही साधीसुधी नाही, तर संयुक्त राष्ट्र संघटनेने आयोजित केलेली ती भव्य स्पर्धा होती...

स्वानुभवातून घडलेला उद्योजक विनोद कांबळे

टर्म इन्शुरन्स, मेडिक्लेम, म्युच्युअल फंड, आर्थिक आपत्ती व्यवस्थापन, पाल्यांसाठी शैक्षणिक नियोजन या विविध मार्गाद्वारे ते सिद्धी असोसिएट्सच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करतात. गेली १६ वर्षे त्यांचं हे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. आतापर्यंत २७०० लोकांना अशाप्रकारे आर्थिकदृष्ट्या त्यांनी सुरक्षित केलेले आहे. इन्शुरन्समधला ‘एमडीआरटी’ हा मानाचा किताब त्यांना आतापर्यंत तीन वेळा मिळाला आहे. प्रणाली, श्रद्धा, रोहित, विकास या आपल्या सहकार्‍यांमुळेच हे शक्य झाले, असे ते मान्य करतात. २०२२ ..

८०-सी शिवाय करसवलत आणि आयकर कायद्याची अन्य कलमे

आयकर सवलतीचा विचार करताना प्रामुख्याने आयकर कायदा १९६१च्या कलम ८०-सी अन्वये उपलब्ध असलेले करसवलतीचे फायदे विचारात घेतले जातात. ८०-सी नुसार दीड लाख रुपयांपर्यंतची करसवलत आहे, पण याशिवाय कराचे ओझे कमी करू शकणारी बरीच अन्य कलमे आहेत. आजच्या लेखात त्यांची सविस्तर माहिती करुन घेऊया...

असंघटित कामगारांना मासिक पेन्शन देणारी‘प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना’ आहे तरी काय?

‘अटल पेन्शन योजने’तही दर महिन्याला ठराविक रक्कम भरावी लागते व ६१ वर्षांपासून उर्वरित आयुष्य एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळते. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेतही ६१ वर्षांपासून उर्वरित आयुष्य (मृत्यूपर्यंत) पेन्शन मिळणार. ‘अटल पेन्शन योजने’त सहभागी होण्यासाठी वयोमर्यादा १८ ते ४० वर्षे आहे. नव्या योजनेत ६१ व्या वर्षापासून महिन्याला तीन हजार रुपये मिळणार म्हणजे १८ व्या वर्षी योजनेत सहभागी झालेली व्यक्ती पेन्शन मिळण्यास ४२ वर्षांनतर पात्र होणार आहे. ..

नागरिकांचा आर्थिक स्तर आणि आयकरबाबतचे नवे प्रस्ताव

आर्थिक वर्ष २०१९-२० पासून आयकर कायद्यातील प्रस्तावित व कार्यरत सर्व सवलतींचा फायदा घेतल्यास ज्याचे वार्षिक उत्पन्न १० लाख, ३५ हजार रुपये आहे, अशी व्यक्तीलादेखील शून्य आयकर भरावा लागू शकतो. कसा, ते या लेखातून जाणून घेऊया... ..

उद्या सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प कसा असावा? कसा असेल?

उद्या सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प कसा असेल? याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. ..

कष्टाने व्यवसायाला सुगंधित करणाऱ्या उद्योजकाची गोष्ट

आपल्या आईची स्मृती आपल्यासोबत कायम राहावी म्हणून संजयने अगरबत्तीचा आपला पहिला ब्रॅण्ड तयार केला. त्यास आपल्या आईचं, ‘साऊ’ हे नाव दिलं...

कॉर्पोरेट गिफ्टिंगचा ‘राज’

दोन वर्षांपूर्वी राज वसईकर ‘कॉर्पोरेट गिफ्टिंग’ या क्षेत्रात उतरले. यासाठी त्यांनी बाबांच्या मित्राच्या गिफ्टिंग दुकानात एक वर्ष पार्टटाईम काम केलं. लेदर, एथनिक, इलेक्ट्रॉनिक्स, म्युरल्स, पेंटिंग्ज अशा वर्गवारीतील सगळ्या भेटवस्तू त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. विमानोड्डाण क्षेत्रातील कंपन्या, माध्यम क्षेत्रातील काही कंपन्या, औषधी कंपन्या आदी त्यांचे मान्यवर ग्राहक आहेत. निव्वळ दोन वर्षांत त्यांनी २१ कंपन्यांसोबत सहकार्य करार केला आहे. काही कोटी रुपयांची उलाढाल कंपनी आज करत आहे. ..

लघु वित्त बँकांच्या मुदत ठेवीत गुंतवणूक करावी का?

मोठ्या बँकांपेक्षा मुदत ठेवींवर जास्त व्याजदर मिळतो, म्हणून लघु वित्त बँकांमध्ये मुदत ठेवीत गुंतवणूक करावी का? करावी तर नेमकी किती प्रमाणात करावी, यांसारख्या गुंतवणुकदारांच्या मनात निर्माण होणाऱ्या शंकांचे निरसन करणारा हा लेख... ..

पर्यटन उद्योगाच्या विकासासाठी क्रूझ सेवा

क्रूझ प्रवासात ३ ते ४ प्रवाशांमागे एक कर्मचारी लागतो.जर १० लाख प्रवासी वर्षाला क्रूझने भारतात आले तर अडीच लाख नोकर्‍यांच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. २०१७ मध्ये भारत वर्षाला १५८ क्रूझ जहाजे हाताळू शकत होता, तर आज ७०० जहाजे हाताळण्याची भारताची क्षमता आहे. या क्षमतेचा पुरेपूर उपयोग करून घ्यावयास हवा...

बँकांचे विलीनीकरण आणि ग्राहकांवर होणारा परिणाम

२०१८-२०१९ या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी बँक ऑफ बडोदा, विजया बँक व देना बँक यांचे एकत्रिकरण करून या तिघांची एकच बँक करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती व त्याला आता केंद्रीत्र मंत्रिमंडळाने मंजुरीही दिली आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना याचा बँकेच्या ग्राहकांवर काय परिणाम होणार, याचा ऊहापोह करणारा हा लेख... ..

घर भाड्याने देण्यापूर्वी घ्यावयाची काळजी

घर भाड्याने देताना नेमकी कोणती काळजी घ्यावी? रजिस्ट्रेशन, पोलिसांकडे नोंदणी वगैरे फॉरमॅलिटिझ नेमक्या कशा पूर्ण कराव्यात, यासंबंधीचे मार्गदर्शन करणारा हा लेख.....

कागी चार्ट्स

मागील लेखात नमूद केल्याप्रमाणे या चार्ट प्रकारांमध्ये लाइन चार्ट, बार चार्ट, कॅन्डलस्टिक चार्ट, पॉईंट-अॅण्ड फिगर चार्ट, हेकिनअसी, रेन्को चार्टस, इचिमुकू क्लाउड, कागी चार्ट्स इत्यादी चार्ट समाविष्ट आहेत. पैकी आपण लाइन चार्ट, बार चार्ट, कॅन्डलस्टिक चार्ट, पॉईंट-अॅण्ड-फिगर चार्ट आणि हेकिनअसी याबद्दल माहिती घेतली. आता आज कागी चार्ट्सची माहिती घेऊया. ..

वस्त्रप्रावरणांच्या नभांगणातील चमकता ‘उज्ज्वल तारा’

‘आर्ट एक्स्पो’सारखी संस्था आणि ‘उज्ज्वल तारा’ सारखा हातमागामधला मराठमोळा ब्रॅण्ड. हातमाग संस्कृतीला विणकरांच्या माध्यमातून घराघरांत पोहोचविणारी ही उद्योजिका आहे, उज्ज्वल सामंत...

मनोरुग्णांसाठीच्या आरोग्य विमा योजना आणि तरतुदी

मनोरुग्णांसाठी आरोग्य विमा (मेडिक्लेम) पॉलिसीतून आतापर्यंत संरक्षण मिळत नसे. पण १६ ऑगस्ट, २०१८ रोजी विमा कंपन्यांची नियंत्रक यंत्रणा असलेल्या इन्शुरन्स रेग्युलेटरी अॅक्ट डेव्हलपमेंट ऑथोरिटी ऑफ इंडिया (आयआरडीएआय) ने एक पत्रक काढून मनोरुग्णांसाठी विमा संरक्षण द्यावे, अशा सूचना सर्व सर्वसाधारण विमा कंपन्यांना दिल्या आहेत. ..

सोन्यात गुंतवणूकीचे पर्याय

सोन्याच्या खरेदीच्या प्रत्येक प्रकारात काही फायदे आहेत तर काही तोटे आहेत, पण वित्तीय नियोजकांच्या मते देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीत सॉव्हरीन गोल्ड बॉण्डस् हा चांगला पर्याय आहे. ..

वाहन विम्यासाठी मोजावे लागणार जास्त पैसे

आतापर्यंत वैयक्तिक अपघात विम्यासाठी दुचाकीधारकाला १ लाख रुपयांपर्यंतच्या विमा संरक्षणासाठी ५० रुपये प्रीमियम भरावा लागत होता, तर खाजगी चारचाकी किंवा व्यवसायासाठी वापरली जाणारी चारचाकी यांना २ लाख रुपयांचा वैयक्तिक अपघात विमा संरक्षणासाठी १०० रुपये प्रीमियम आकारला जात होता. आता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी १५ लाख रुपयांचे वैयक्तिक अपघात विमा संरक्षण सक्तीचे करण्यात आले असून, यासाठी ७५० रुपये प्रीमियम अधिक कर आकारले जाणार आहेत...

समभागातून समृद्धीकडे : हिकिन-अशी चार्ट्स

मागील लेखात नमूद केल्याप्रमाणे या चार्ट प्रकारांमध्ये लाईन चार्ट, बार चार्ट, कॅन्डलस्टिक चार्ट , पॉईंट-अॅण्ड-फिगर चार्ट, हिकिन-अशी, रेन्को चार्टस, इचिमुकू क्लाऊड, कागी चार्ट्स इत्यादी चार्ट समाविष्ट आहेत. पैकी आपण लाईन चार्ट, बार चार्ट, कॅन्डलस्टिक चार्ट, पॉईंट-अॅण्ड-फिगर चार्ट याबद्दल माहिती घेतली. आज हिकिन-अशी या खूप विशेष, खूप लोकप्रिय आणि योग्य निर्णय घेतल्यास भरपूर नफा मिळवून देणार्‍या प्रकाराचा आपण जरा विस्तृत विचार करूया.....

घराला स्वप्नवत आकार देणारा इंटिरिअर डिझायनर

आपलं घर स्वप्नातलं असावं, प्रत्येक पाहुण्याला त्याचं अप्रूप वाटावं, मात्र त्याचवेळी ते आपल्या आवाक्यातदेखील असावं. या सगळ्या स्वप्नांना साकार करणारं एकच नाव म्हणजे सुनील देशपांडे...

रोखीतल्या व्यवहारांवरील नियंत्रण फसले

केंद्र सरकारला काळ्या पैशातील व्यवहारांवर चाप बसावा म्हणून रोखीतल्या व्यवहारांवर नियंत्रण हवे आहे. यासाठी ’पेपरलेस सोसायटी’ ही संकल्पना पुढे आणली गेली. पण यात हवी तशी प्रगती साधता आलेली नाही. भारतीयांच्या रोखीत व्यवहार करण्याच्या मनोवृत्तीत अजून बदल झालेला नाही. नोटाबंदीमुळे रोखीतले व्यवहार कमी व्हायला पाहिजे होते. पण ते तसे झाले नाहीत...

मराठी खाद्य संस्कृती जपणारा उद्योग

उद्योग कोणताही असो, त्याची सुरुवात होते ती म्हणजे एका वेगळ्या कल्पनेपासूनच... ठाण्यातील यशस्वी उद्योजिका भारती वैद्य यांची कहाणीही अशीच सुरू झाली. एका छोट्याशा खोलीत सुरू झालेला धनश्री गृहउद्योगाचा ग्राहकवर्ग आज सातासमुद्रापार विस्तारला आहे. घरात कुणी नसताना पाच मिनिटात तयार होतील, असे मराठमोळे पदार्थ ‘रेडी टू कूक’ या रूपात ग्राहकांना करून देता येतील का? असा विचार भारती वैद्य यांच्या मनात आला. रुचकर, खमंग आणि चविष्ट मराठमोळे पारंपरिक पदार्थ नव्या रूपात ग्राहकांना मिळू लागल्याने देश-परदेशातून मागणी ..

समभगातून समृद्धीकडे : टेक्निकल चार्ट

अनेक शेअर ट्रेडर्सकडून आपण ‘टेक्निकल चार्ट’ हा शब्द कायम ऐकत असतो. तसा हा शब्द जडशीलच वाटतो आणि हे प्रकरण खूप काहीतरी कठीण आहे, असा विचार करून आपण त्याच्या वाटेस जात नाही. म्हणून आजपासून आपण त्याबद्दलच थोडी माहिती घेऊया...

घरकाम करून उद्योजक घडवणाऱ्या आईची कथा

गोदावरी. कोल्हापूरच्या मातीतली एक रांगडी, मर्दानी मराठी मुलगी. पुरुषांसोबत कुस्त्या खेळणारी मुलगी म्हणून सांगवड्यामध्ये तिची एक वेगळीच ओळख होती...

कथा इंदू वडापावची - २५ पैसे ते कोट्यवधींची उलाढाल

जळगावमधलं मेहुण गाव. गाव कसलं खेडेगाव म्हणावं असंच त्याचं स्वरूप होतं ऐंशीच्या दशकात. “इथे आपल्या कुटुंबाला काहीच भविष्य नाही. त्यापेक्षा आपण मुंबईत जाऊ,” असं मेहुण गावातल्या साहेबराव आणि इंदुबाई या दाम्पत्याने ठरवलं...

बँकांच्या विलीनीकरणाचे अर्थकारण

बँकांच्या विलीनीकरणाचे अर्थकारण..

वीजबिलाचे पैसे वाचवणार्‍या उद्योजकाची कथा...

ग्राहकांना समाधानी ठेवण्याच्या लहानपणी गवसलेल्या याच कौशल्यामुळे जयवंत गोसावी यांनी ऊर्जा क्षेत्रातील ‘ऊर्जय इलेक्ट्रिकल्स प्रा. लि’ नावाची कंपनी स्थापन केली...

आरबीआयच्या नियमांना गुगलची सहमती

गुगलकडून भारतीय रिझर्व्ह बँकेने घातलेल्या नियमांना सहमती दर्शविली आहे. ..

बुडीत कर्जांसाठी काँग्रेस सरकार जबाबदार : राजन

रघुराम राजन यांनी संसदीय समितीला दिलेल्‍या उत्‍तरात म्‍हटले की, ‘‘घोटाळ्यांच्या चौकशीत होणारा विलंब व तत्‍कालीन सरकारने निर्णय घ्‍यायला वेळ केल्‍यामुळेच बुडीत कर्ज वाढली आहेत.’’..

सेवानिवृत्तीनंतरच्या आर्थिक स्थैर्यासाठी

या योजनेत 8.30 टक्के दराने व्याज मिळत असून व्याजाची रक्कम 50 हजार रुपयांहून जास्त झाल्यास आयकरपात्र होणार. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांत ज्येष्ठ नागरिकत्व प्राप्त होण्यापूर्वी, सेवानिवृत्तीनंतरची आर्थिक तरतूद म्हणून गुंतवणूक करता येते...

शेअर मार्केट आणि स्टॉक विश्लेषण

मागील लेखात आपण 'Technical Analysis' बद्दल ढोबळ माहिती घेतली, आता थोडे पुढे जाताना 'Stock Analysis' बद्दल माहिती घेऊया...

युथफूल भारत

मराठी समाजात तर आता तरुण मुले प्राधान्याने व्यवसायक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर येत आहेत. अशाच काही होतकरू तरुण मुलामुलींची ही उद्योजकीय वाटचाल...

का नाराज आहे सामान्य माणूस?

पेट्रोलच्या दरावर सरकारद्वारा जो कर वसूल केला जातो, त्यातून फार मोठा महसूल मिळत असतो...

अडचणीच्या काळातील 'सोनेरी' सोबती!

एखाद्या अडचणीच्या किंवा अत्यावश्यक काळामध्ये जेव्हा पैशांची अत्यंत निकड भासते त्यावेळेस सोनं आपला चांगला मित्र म्हणून काम करू शकते. ..

नरेंद्र मोदी सरकारच्या कल्याणकारी योजना

दि. २६ मे रोजी नरेंद्र मोदी सरकारला केंद्र सरकारमध्ये चार वर्षं पूर्ण होतील. या चार वर्षांत मोदी सरकारने विविध स्तरावर लोकोपयोगी योजनांचा धडाका लावला. अगदी ग्राम सडक योजनेपासून ‘डिजिटल इंडिया’सारख्या ग्रामीण भागापासून शहरी भागाच्या ‘स्मार्ट’ विकासासाठी मोदी सरकारने जलद गतीने पावले उचलली. पण, या योजनांमध्ये विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल तो प्रधानमंत्री जन-धन योजनाचा. तेव्हा, मोदी सरकारच्या या विविध योजनांचा घेतलेला हा आढावा.....

अडखळता ‘रेरा’ कधी स्थिरावणार?

त्येक राज्याने एका वर्षात आपली वेबसाईट तयार करणे आवश्यक होते. या वेबसाईटवर बांधकाम सुरु असलेल्या प्रकल्पांची नावे बिल्डर व प्रवर्तकांची नावे, मिळालेल्या मान्यता, बांधण्यात येणार्‍या इमारतींची संख्या, सदनिकांचा आकार, ताबा देण्याची तारीख या प्रकल्पासाठीचे नोंदणीकृत एजंट वगैरे माहिती उपलब्ध असावयास हवी. ..

आयकराबाबत वेतनधारकांनी पाळावयाची पथ्ये

नोकरदारांना ‘मेल’ ही आला असेल व त्यात आयकर वाचविण्यासाठी काय गुंतवणूक करणार? याची विचारणा करण्यात आली असेल. तुम्ही या ‘मेल’ कडे दुर्लक्ष करून जर तो ‘बिन’मध्ये जाऊ दिलात तर तुम्हाला हे महागात पडू शकते...

भाजपप्रणीत सरकारचे कामगार धोरण

कामगार हा विषय भारतीय घटनेने राज्ये व केंद्रशासन असा दोघांच्याही अख्त्यारीत आणला आहे. हे सरकार गेली चार वर्षे सत्तेत आहे, पण सरकारने खास असे कामगार धोरण अजून तरी जाहीर केलेले नाही. ..

शैक्षणिक कर्ज घेताना...

शैक्षणिक कर्ज म्हटलं की आपल्याकडे अजूनही काही पालकांना घाम फुटतो. हे शैक्षणिक कर्ज घ्यायचे कसे? त्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते? शैक्षणिक कर्जावरील व्याजदर किती? त्याची परतफेड कधी व कशी करावी लागते? यांसारखे अनेक प्रश्न पालकांच्या चिंतेत भर घालतात. ..

नीरव मोदी आणि ‘पीएनबी’ बँक घोटाळा

पीएनबी घोटाळ्यात एवढी मोठी रक्कम वसूल होईलच, असे सांगणे फार कठीण आहे. या घोटाळ्यात प्रमुख जबाबदारी बँकेच्या व्यवस्थापनाची आहे. प्रत्येक बँकेत कर्जात घोटाळे होऊ नयेत म्हणून ‘रिस्क मॅनेजमेंट’ विभाग असतो. या बँकेचा हा विभाग पूर्णपणे अपयशी ठरला आहे. ..