अर्थ उद्योग

मातीविना शेती करणारी महाराष्ट्राची पहिली महिला शेतकरी

Antwerf Innovations Aruna More..

बँक खाते 'डॉरमन्ट' झाल्यास...

'डॉरमन्ट' म्हणजेच वापरात नसलेली बँक खाती. तेव्हा, अशाप्रकारे आपले खाते डॉरमन्ट होऊ नये म्हणून नेमकी काय काळजी घ्यावी? ते 'डॉरमन्ट' झाल्यास बँकेकडून आपल्या खात्यातील रक्कम कशाप्रकारे परत मिळविता येते, यासंबंधी मार्गदर्शन करणारा आजचा लेख.....

महाराष्ट्रातली पहिली महिला चर्मवाद्य उद्योजिका

बंगळुरू येथील जगातील एक बलाढ्य अशा कंपनीचं, विप्रोचं सभागृह. विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेल्या त्या सभागृहात आपल्या सातार्‍याची कन्या आपल्या उद्योगाविषयी बोलत होती. डिजिटल साक्षरतेविषयी व्याख्यान देत होती. ते सगळे विद्यार्थी उच्चशिक्षित. ही अवघी दहावी झालेली, ते पण जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून. तिचे व्याख्यान संपले आणि एखाद्या अभिनेत्रीची स्वाक्षरी घेण्यासाठी जशी झुंबड उडते तशी झुंबड उडाली. जो तो तिचा ‘ऑटोग्राफ’ घेऊ लागला. तिच्याबरोबर सेल्फी काढू लागला. आपल्या कर्तृत्वाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी ..

बँक ओम्बड्समन तक्रार नाकारू शकतो का?

प्रत्येकाच्या आर्थिक जीवनात बँका महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे प्रत्येक बँक ग्राहकाला त्याचे अधिकार माहीत हवेत. बँक ग्राहकांचे अधिकार जपण्यासाठी ‘बँकिंग ओम्बड्समन’ ही यंत्रणा आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २००६ साली ‘दि बँकिंग ओम्बड्समन योजने’ खाली ही यंत्रणा कार्यरत केली. बँक ग्राहकांच्या तक्रारी निवारणासाठी ही यंत्रणा अस्तित्वात आणण्यात आली. ‘थर्ड पार्टी’ वित्तीय उत्पादने विकणे व अन्य काही तक्रारींच्या निवारणासाठी ही यंत्रणा आहे...

‘इंटिरिअर डिझाईन’चा जादूगार

रमाकांत पन्हाळे विविध बिझनेस नेटवर्कमध्ये कार्यरत आहेत. दांडगा जनसंपर्क, कोणालाही विशेषत: होतकरू उद्योजकास कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न करता शक्य ती मदत करणे, या गुणांमुळेच ते यशस्वी ठरले, असं त्यांना वाटतं. यासाठी ते आपल्या कारखान्यात विविध क्षेत्रातील उद्योजकांना, विद्यार्थ्यांना खास निमंत्रित करतात. मराठी तरुणांनी उद्योजकतेकडे वळावे यासाठी ते प्रयत्न करतात. त्यांची ही मेहनत नक्कीच फळास येईल...

अपेक्षा अर्थसंकल्पाकडून...

सध्या केंद्र सरकारची अतिअलीकडच्या काळात पूर्वी जी प्रचंड लोकप्रियता होती, ती सध्या थोडीशी कमी झालेली आहे. ती पुन्हा मिळविण्यासाठी अर्थमंत्र्यांना लोकप्रिय अर्थसंकल्प सादर करावाच लागेल. दिल्लीसह अन्य काही राज्यांतही निवडणुका होणार आहेत. त्यामुळेही अर्थमंत्र्यांना जनताप्रिय अर्थसंकल्प सादर करावा लागेल, असे दिसते...

इतरांना श्रीमंत बनविणारा उद्योजक

डॉ. संतोष कामेरकर हे उद्योजकीय प्रशिक्षण क्षेत्रात गेली ३१ वर्षे कार्यरत आहेत. प्रशिक्षण देताना अनेकजण तुमचे पुस्तक आहे का, अशी विचारणा करायचे. यातूनच तीन पुस्तके साकारली. मला मोठ्ठे व्हायचे आहे- सात आवृत्त्यांचा खप, मला श्रीमंत व्हायचे आहे- तब्बल १ लाख, २० हजार प्रतींची विक्री, यशाची गुरुकिल्ली- ८० हजार प्रतींची विक्री, उद्योजक व्हा, श्रीमंत व्हा- २ हजार पुस्तकांची विक्री अशा विक्रमी पुस्तकांसह १४ पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत...

मित्रांना किंवा नातलगांना कर्जे देताना...

आपले नातलग किंवा मित्रमंडळींना आर्थिक चणचण असल्यास बरेचदा त्यांना कर्जस्वरुपी मदत केली जाते. पण, अशा जवळच्या लोकांनी नंतर कर्जाच्या रकमेची परतफेड न केल्यास त्याचा परिणाम थेट नातेसंबंधांवर देखील होऊ शकतो. त्यामुळे ही कर्जे अर्थातच असुरक्षित आहेत. म्हणूनच नातलगांना किंवा मित्रमंडळींना कर्जे द्यावयाची की नाहीत, हा प्रश्न अतिशय नाजूक असतो. त्यामुळे अशी कर्ज तुम्ही दिली असतील किंवा भविष्यात देणार असाल, तर नेमकी काय काळजी घ्यायला हवी, यासंबंधी मार्गदर्शन करणारा आजचा लेख.....

रिक्षाचालकाची पोर ते यशस्वी उद्योजिका

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्ससाठी उज्ज्वला गायकवाड यांनी सेवा दिलेल्या आहेत. ५०० हून अधिक जाहिराती मोहिमा त्यांनी राबविलेल्या असून हजारहून अधिक ग्राहकांना त्यांनी सेवा दिलेल्या आहेत. येत्या काही वर्षांत मुद्रणक्षेत्रात स्वत:चं वलय निर्माण करण्याचं उज्ज्वला गायकवाड यांचं स्वप्न आहे...

प्राप्तिकराबाबत अपेक्षित बदल

दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, “प्राप्तिकरात कपात सरकारच्या विचाराधीन आहे व हा प्रकार सहज, सोपा व सुटसुटीत करण्यात येणार आहे,” असे सांगितले. अर्थमंत्र्यांची ही घोषणा फार चांगली असून या घोषणेचे सार्वत्रिक स्वागतच व्हायला हवे...

संघर्षनायिका!

कोणालाही शिशुवर्ग वा डे-केअर सुरू करायचे असल्यास त्यास पूर्ण मार्गदर्शन करण्याची तृप्ती प्रधान-दिघे यांची तयारी आहे. किंबहुना, महिला सक्षमीकरणासाठी 'अच्छे बच्चे प्ले ग्रुप-नर्सरी-डे केअर'च्या शाखा सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे...

फसव्या गुंतवणूक योजनांपासून सावधान!

सोने-चांदी, जडजवाहिर यांच्या पेढ्यांचे मालक गुंतवणूक योजना जाहीर करतात, तसेच काही बांधकाम उद्योजक जनतेकडून ठेवी स्वीकारतात. यात तुम्हाला बँकांपेक्षा किंवा अन्य गुंतवणूक योजनांपेक्षा जास्त व्याज मिळत असेलही; पण या गुंतवणूक योजनांवर कोणाचेही नियंत्रण नाही. जर रिझर्व्ह बँक व सहकार खात्याचे नियंत्रण असूनही पीएमसी बँक अडचणीत आली, तर नियंत्रण नसलेल्या गुंतवणूक योजनांत गुंतवणूक करण्याची जोखीम घेऊ नये, हेच खरे...

अधिकचा प्राप्तीकर आणि ‘रिफंड’चे नियम

आत्तापर्यंत तुम्ही जर प्राप्तीकर जास्त भरला असेल, तर तो परत (रिफंड) मिळायला हवा होता. तुमच्या खात्यात थेट जमा व्हावयास हवा होता. हा ‘रिफंड’ अजूनपर्यंत न मिळवण्याची देखील अनेक कारणे असू शकतात. त्याविषयी आजच्या लेखात सविस्तर माहिती जाणून घेऊया...

कला क्षेत्रातील 'वंडर बी'

मधमाशी तिला लहानपणापासून आकर्षित करायची. तिच्याच प्रेरणेने तिने कंपनीच्या नावाची सुरुवात केली 'वंडर बी.' पण, नावात 'अ‍ॅड एजन्सी' वगैरे असा उल्लेख न करता तिला सर्जनशीलता लोकांना द्यायची होती. या संकल्पनेतून जन्मास आला 'वंडर बी क्रिएटिव्ह सोल्युशन्स' हा डिझायनिंग स्टुडिओ...

बँकांत विनाकारण जास्त खाती नको

प्रत्येक व्यक्तीची बँकांत कमाल दोन ते तीनच खाती असावीत, असा फतवा केंद्र सरकारचे अर्थ खाते काढणार आहे, अशा बातम्या मध्यंतरीच्या काळात माध्यमात येत होत्या. लोकही यावर चर्चा करीत होते. पण, अशा तर्‍हेचा फतवा अजून निघालेला नसला तरी बँकांत विनाकारण जास्ती खाती उघडू नका. असे का, ते आजच्या लेखात जाणून घेऊया.....

गृहकर्ज कोणाकडून घ्यावे?

बँकेकडून कर्ज घ्यायचे की ‘एनबीएफसी’ कडून कर्ज घ्यायचे, हे ठरविताना हे लक्षात घ्यायचे की, कर्जाचा व्याजदर रेपोरेटशी संलग्न करण्याची प्रक्रिया ही रिझर्व्ह बँकेने नवे नियम येईपर्यंत सातत्याने चालू राहणार आहे. रिझर्व्ह बँकेचा नियम येण्यापूर्वीही स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स रेपोरेटशी संलग्न कर्ज दराने कर्जे देत होत्या. रिझर्व्ह बँकेच्या नव्या फतव्यानुसार कर्जाच्या कालावधीत बदल होणार का, याबाबत रिझर्व्ह बँकेने काही भाष्य केलेले नाही...

सहकार क्षेत्रातील बँका रिझर्व्ह बॅँकेच्या रडारवर

कष्टाने कमविलेले पैसे पीएमसी बँकेत अडकल्यामुळे हजारो खातेधारक त्रस्त आहेत. रस्त्यावर उतरुन त्यांनी आंदोलनेही केली. सरकारदरबारीही यासंदर्भात पाठपुरावा सुरुच आहे. तेव्हा, पीएमसी बँक असो वा इतर सहकारी बँका, त्या सध्या रिझर्व्ह बँकेच्या रडारवर नेमक्या का आहेत, ते जाणून घेणे महत्त्वाचे ठरते...

अनावश्यक विमा पॉलिसीज् व नियंत्रण

दरवर्षी ग्राहकास त्याच्या पॉलिसीचा 'स्टेट्स रिपोर्ट' पाठवावा लागेल. या रिपोर्टमध्ये किती प्रीमियम भरले? पॉलिसीवर किती बोनस जमा झाला आहे. या पॉलिसीत अन्य काय फायदे आहेत? पॉलिसीत किती रकमेचा भरणा झाला आहे? हा सर्व तपशील'स्टेट्स रिपोर्ट'मध्ये देणे बंधनकारक केले आहे. 'युनिट लिंकड् इन्शुरन्स पॉलिसी'(युलिप)मध्ये पॉलिसीधारकाच्या खात्यात किती 'युलिप' जमा आहेत, हे 'स्टेट्स रिपोर्ट'मध्ये समाविष्ट हवे. प्रत्येक वर्षी 'युलिप'मध्ये झालेला बदल 'युलिप'ची 'नेट अ‍ॅसेट व्हॅल्यू' हे सर्व समाविष्ट हवे...

मनोरंजन क्षेत्रातला वतनदार शौरिन्द्रनाथ दत्ता

सरकारी नोकरी मिळणे सहजशक्य असतानासुद्धा शौरिन्द्रनाथ मात्र खडतर मार्गाने गेले. आपल्या पाठीवर कोणाचा तरी हात असेल, तेव्हाच यश मिळते ही धारणा चुकीची आहे. काहीतरी करून दाखविण्याची जिद्द, आत्मविश्वास, सातत्य आणि ध्येयस्पष्टता असेल तर कोणतेही कितीही कठीण असलेले ध्येयसुद्धा पूर्ण करता येते. मराठी तरुणांनी या गुणांचा अवलंब केल्यास ते नक्कीच यशस्वी होतील, असे शौरिन्द्रनाथ दत्ता यांचे मत आहे. किंबहुना, याच गुणाच्या जोरावर ते मनोरंजन क्षेत्रातले वतनदार झाले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही...

रुपयाची घसरण आणि जनसामान्यांवर होणारा परिणाम

डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला, रुपया वधारला या बातम्या आपण अधूनमधून वाचत असतो.पण, याचा नेमका आपल्या दैनंदिन जीवनात, आर्थिक नियोजनाच्या निर्णयांवर खरंच फरक पडतो का, याबाबत अनेकांच्या मनात साशंकता असते. तेव्हा, आजच्या लेखात रुपयाची घसरण म्हणजे काय, त्याचा परदेशी शिक्षणापासून ते इंधनाचे दर, महागाई, यावर कसा परिणाम होतो,याचा सर्वंकष आढावा घेऊया...

शेअर मार्केट एक उत्तम व्यवसाय

शेअर बाजार शेअर बाजार म्हणजे नक्की काय ? याला एका शब्दात सांगायचं झाले तर एक व्यवसाय होय अगदी बरोबर शेअर बाजार हा एक व्यवसायच आहे, पण आपण शेअर बाजार शब्द ऐकला की म्हणतो शेअर बाजार म्हणजे जुगार व नुकसान खरच शेअर बाजार जुगार असतो तर या क्षेत्रात लोकांनी येऊन पैसे कमावले नसते किंवा गुंतवणूक देखील केली नसती. आपण शेअर मार्केटकडे कोणत्या दृष्टिकोनातुन बघतो हे यावर सर्व काही अवलंबून असते...

सध्याच्या आर्थिक परिस्थितीत सोन्यात गुंतवणूक करावी का?

जागतिक पातळीवर सोन्याच्या भावात गेल्या एका वर्षात २० टक्के वाढ झाली आहे, तर गेल्या तीन महिन्यांत १४ टक्के वाढ झाली. आपल्या देशात गेल्या एका वर्षात सोन्याचे दर ३३ टक्क्यांनी वधारले, तर गेल्या तीन महिन्यांत सोन्याचे दर १५ टक्क्यांनी वधारले. अशा परिस्थितीत सोन्यामध्ये गुंतवणूक करावी का, असा प्रश्न गुंतवणूकदारांना भेडसावत असतो. तेव्हा, त्याविषयी या लेखातून सविस्तर जाणून घेऊया...

प्रभादेवीची ओळख 'आकार'

'आकार'चे देव्हारे आणि मूर्ती निव्वळ भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहेत. एका विशिष्ट संगमरवरी दगडापासून घडवलेलं मंदिर, देव्हारे आणि मूर्ती ही 'आकार'ची वैशिष्ट्ये. त्याचप्रमाणे लाकडापासूनदेखील मंदिरे तयार केली जातात. या मंदिरावरचे कोरीव काम प्रेक्षणीय असते. 'आकार'चे वरळी, राजस्थान येथे कारखाने आहेत, तर प्रभादेवी येथे शोरूम आहे...

घरीच उपचार घेणार्‍यांसाठी आरोग्य विम्याचे संरक्षण

कित्येक रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांनाही घरीच उपचार घेत असलो तरी आरोग्य विम्याचे संरक्षण उपलब्ध असते, याची फार कमी माहिती असते. त्या अनुषंगाने अशा रुग्णांसाठीही विम्याचे कवच उपलब्ध असून आजच्या लेखातून यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया.....

१७९ रुपये पगार ते ३० कोटींचा व्यवसाय

फक्त प्राण्यांचं औषध मिळणारं हे मुंबईतील एकमेव औषध दुकान. आश्चर्याचा धक्का तेव्हा बसतो, जेव्हा कळतं 'हे' दुकान एका मराठमोळ्या माणसाचं आहे. त्यांचं नाव मच्छिंद्रनाथ पाटील...

मंगळसूत्र गहाण ठेवून आज कोटींची उलाढाल करणारी 'भैरीभवानी इंटरप्रायजेस'

'भैरीभवानी' हे गंगाराम सनगले यांच्या कुलदैवतेचे नाव. देवीचा वरदहस्त आपल्या पाठीशी आहे, अशी श्रद्धा गंगाराम यांची असल्याने त्या कृतज्ञतेपोटी त्यांनी कुलदैवतेच्या नावाने कंपनीचे नामकरण केले. कंपनी छोटी मोठी कामे करू लागली. पुढे मोबाईल कंपन्या टॉवर उभारण्याचं काम खाजगी कंपन्यांना देऊ लागल्या...

जमाना ई-वाहनांचा

देशभरात ई-वाहनांना प्रोत्साहन देणारे धोरण केंद्र सरकारने आखले असून हे शासनाने उचललेले हे एक योग्य पाऊल म्हणावे लागेल. केंद्रीय अर्थमंत्र्यांनीही २०१९-२०२० या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना ई-वाहनांच्या उद्योगांसाठी, खरेदीसाठीच्या काही सवलतीही जाहीर केल्या. तेव्हा, एकूणच ई-वाहनांची उपयोगिता विशद करणारा हा लेख.....

समाज उत्थानाचा शिवगोरक्ष आदेश

राईनपाडा येथे लोकांचा गैरसमज झाला आणि डवरी गोसावी समाजाच्या पाच भिक्षेकरी तरुणांना नाहक जीवाला मुकावे लागले. समाज भिक्षेकरी आहे. पालात राहतो. त्याचे पालातले वास्तव्य संपून त्याच्या हातातील भिक्षेकऱ्यांची झोळी जाऊन ते खऱ्या अर्थाने सुखीसंपन्न, स्वावलंबी बनावे यासाठीचे विचारमंथन समाजातील मान्यवरांनी केले. त्यातूनच मग भटक्या जमाती संघाची स्थापना करण्यात आली...

छोट्या पार्टीतील मोठा आनंद

एकीकडे रुपाली अन तिच्या कुटुंबाला हवी होती तशी बर्थडेपार्टी झाली. दुसरीकडे लक्ष्मी अन तिच्या कुटुंबाला आमच्या गोड कंपनीसोबत खाऊ आणि मच्छरदाणी मिळाली आणि महत्त्वाचे म्हणजे सगळ्यांनाच ‘रिटर्न गिफ्ट’रुपी मिळाली ‘हॅप्पीवाली फिलिंग.’..

जगा आणि जागा

भारताचा विकास साधायचा असेल, तर खेडी विकसित व्हायला हवीत. 'शिक्षण' हा विकासाचा पाया मानला गेला आहे. विकासाच्या सर्व संकल्पना या प्रभावी शिक्षणाभोवती गुंफल्या गेल्या आहेत म्हणूनच खेड्यांचा विकास साधायचा असेल, तर खेड्यात सोयी-सुविधा उपलब्ध करणे व त्या सक्षम करणे गरजेचे आहे. ग्रामविकास हेच ध्येय व उद्दिष्ट समोर ठेवून 'साद माणुसकीची' या संस्थेची स्थापना २०१६ साली करण्यात आली...

एक होता ‘राजा’

दि. १६ जुलै, २०१९ रोजी विचारवंत, साहित्यिक राजा ढाले यांच्या नावापुढे कालकथित लागले. त्यांच्या जाण्याने मानवी शाश्वत मूल्यांच्या चळवळीचे अपरिमित नुकसान झाले आहे. राजा ढाले एक विद्रोही कार्यकर्ता, एक लोकप्रिय नेता, तितक्याच ताकदीचा विचारवंत आणि तितकाच संवेदनशील मनाचा कवी व चित्रकारही. राजा ढालेंचा मृत्यू म्हणजे मानवतेचे गाणे बुद्धिवादातून आणि बुद्धधम्माच्या प्रेरणेतून जगणाऱ्या जातिवंत माणसाचा मृत्यू...

त्यांनी जपला ज्ञानरूपी वसा

मैत्रीचा उपयोग समाज उद्धारासाठी करण्याचा अनोखा पायंडा भांडुपस्थित मित्रांनी पाडला. या शाळकरी मित्रांची २००३ ची शाळेची बॅच सुमारे ८ वर्षांनी २०११ साली भेटली. सिमाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, अशी भावना या मित्रामध्ये निर्माण झाली. त्यातूनच मग आपल्या शिक्षणाचा, बुद्धीचा आणि युवाशक्तीचा या समाजासाठी काहीतरी विधायक उपयोग व्हावा, या हेतूने १ मे २०११ रोजी ‘उमंग द युथ सोशल फोरम’ची स्थापना झाली...

ग्रामविकासाचे सृजन सेवा सहयोग

शिक्षण, आरोग्य, वस्ती विकास, महिला सबलीकरण इत्यादी अनेक आयामांमधून सेवेची पंढरी असलेली सेवा सहयोग संस्था काम करत आहे. ग्रामविकास हादेखील त्यातला महत्त्वाचा पैलू. गावाचा विकास करताना व्यक्ती आणि त्याचबरोबर त्याच्या कुटुंबाचा आणि परिसराचा विकास करणारा सेवा सहयोगचा आणखी एक संवेदनशील आणि अर्थपूर्ण उपक्रम म्हणजे 'सृजन'...

सदैव स्मरणात राहील असे संमेलन...

कल्याण येथे नुकत्याच झालेल्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलना’स उपस्थित राहण्याचा योग आला. या उपक्रमाबद्दल कौतुक करण्यास मला शब्द कमी पडत आहेत. युवकांनी संमेलनासाठी घेतलेले परिश्रम हे त्याचे महत्त्वाचे अंग होते. ‘सभागृह तुडुंब भरणे’ हे त्याचे यश होते. सर्व विषय व त्यासाठी अतिशय योग्य व्याख्याते शोधून त्यांची उपलब्धता आयोजणे हे त्याच्या आयोजकांच्या अभ्यासूवृत्तीचे द्योतकच म्हणावे लागेल. आता एवढे लिहिल्यानंतर प्रत्यक्ष कार्यक्रमाचे विवेचन करणे तसे दुय्यम असले तरी ते अतिशय आवश्यक आहे...

‘सन्मित्र’ हीरक महोत्सवी वर्ष

सन्मित्र मंडळ, गोरेगाव या संस्थेची स्थापना १९५८ साली झाली. १० बाय १० च्या खोलीत पाच-सहा बालकांसह सुरू झालेल्या शाळेचा आज वटवृक्ष झाला आहे. मराठी माध्यमातील पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक असे तीन विभाग आणि १२०० विद्यार्थी पटसंख्या असणारी ‘सन्मित्र मंडळ’ ही पश्चिम उपनगरातील एक अग्रगण्य संस्था आहे...

वारकर्‍यांच्या सेवेसाठी आरोग्य दिंडी - सह्याद्री मानव सेवा मंच

‘सह्याद्री मानव सेवा मंच,’ ठाणे ही संस्था गेली ३५ वर्षे मोफत वैद्यकीय सेवा, विविध प्रकारचे समाज सेवा कार्य, सातत्याने करीत आहे. ही सामाजिक संस्था समाजातील दुर्बल व दुर्लक्षित घटकांसाठी कार्य करते. सेवाभावी कार्य करण्याची तळमळ असलेले डॉक्टर्स व त्यांना साहाय्य करणारे अनेक कार्यकर्ते एकत्रित आले. दु:खी, पीडित, कुपोषित व सामान्य वैद्यकीय सेवांपासून वंचित असलेल्या आपल्या बांधवांना सक्रिय साहाय्य करण्याचा वसा त्यांनी उचलला...

'असीम फाऊंडेशन'च्या माध्यमातून लडाखमध्ये साकारणार सायन्स पार्क-२०

गेली १७ वर्षे भारताच्या सीमावर्ती भागात कार्य करणार्‍या 'असीम फाऊंडेशन'च्या माध्यमातून जम्मू-काश्मीरमधील लडाख येथील सायन्स पार्क उभे राहत आहे. गेले दोन महिने अविरतपणे चालू असलेले हे काम दि. २० जून रोजी प्रत्यक्ष मूर्त रूपात सर्वांसाठी खुले होणार आहे. भारतीय सैन्याच्या १४ कोअरचे प्रमुख या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख अतिथी असणार आहेत. लडाखचा भाग हा उंचीवरील वाळवंट म्हणून ओळखला जातो. 'असीम फाऊंडेशन'ने २०१२ मध्ये प्रथम लडाखमध्ये कामाला सुरुवात केली. यामध्ये स्थानिक ठिकाणे, व्यक्ती आणि अधिकार्‍यांना भेट देऊन ..

ग्रामविकासाचा कल्पवृक्ष

‘देश हमे देता हैं सब कुछ, हम भी तो कुछ देना सिखे’चा मंत्र जगणारी ‘केशवसृष्टी.’ आपल्या विविध उपक्रमांद्वारे ‘सब समाज को साथ लिये’ शब्दातीत समाज उत्थानाचे काम करत आहे. सूर्यप्रकाशाने परिसरातील कणनकण दीप्तिमान करावा, तसे ‘केशवसृष्टी’ने आपल्या कामामुळे समाजाच्या प्रत्येक स्तरामध्ये प्रगतीचे तेज जागवले आहे. त्या सर्व उपक्रमांपैकी एक उपक्रम ‘केशवसृष्टीग्राम विकास योजना.’ २०१७ पासून सुरू झालेल्या या योजनेची प्रत्यक्ष प्रचिती देणारा संस्मरणीय कार्यक्रम नुकताच मुंबईच्या सभागृहामध्ये संपन्न झाला. औचित्य होते, ..

मराठी शाळा टिकवण्यासाठी...

आज मराठी माध्यमाच्या शाळा दुर्दैवाने ओस पडत असताना, ‘चेंबूर एज्युकेशन सोसायटी’च्या प्राथमिक विभागाचे(मराठी माध्यम) प्रवेश ‘फुल्ल’ झाले आहेत...

जिथे गुन्हेगारीला राष्ट्रभक्तीचे विचार संपवतात...!

महाराष्ट्राच्या कारागृहांतील बंदिवानांसाठी स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांच्या राष्ट्रभक्ती विचारांवरील निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई ने यासाठी पुढाकार घेतला त्याविषयी.....

पिल्लांना हक्काचे घर...

दि.२६ मे २०१९ स्थळ : सीवूड सेक्टर ४४. एस. एस. हायस्कूल येथे देशी कुत्र्यांच्या ३४ पिल्लांना दत्तक घेण्याचा कार्यक्रम पार पडला. रस्त्यावर बेवारस फिरणार्‍या आणि अत्यंत धोकादायकरीत्या जगत असलेल्या या पिल्लांना हक्काचे घर आणि माया मिळाली...

‘राणी भवना’ची साठी

‘राणी लक्ष्मी भवन’ नाशिक या संस्थेला यंदा दि.२५ मे रोजी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या दिवशी संस्थेचा ‘हीरक महोत्सव’ साजरा होत आहे. पहिल्या उद्घाटनाची मी साक्षीदार आहे म्हणून हृद्यआठवण...

‘बुद्धांकुर मित्रमंडळ’

आमच्या मित्रमंडळाचे नाव ‘बुद्धांकुर’ का? तर तथागतांनी शांती आणि समतेचा संदेश दिला. तो शांती आणि समतेचा संदेश आज जगभराच्या स्थैर्याचा केंद्रबिंदू आहे...

सतरंगी रे...

‘सतरंगी व्हॉट्सअॅप ग्रुप’च्या माध्यमातून ८५ युवांना समाजाच्या उत्थानासाठी नि:स्वार्थीपणे प्रेरित करणे, त्यांच्याकडून समाजकार्य करून घेणे, त्यातूनच त्या विद्यार्थ्यांच्याही व्यक्तिमत्त्वाचा विकास साधणे, त्यांच्यातील राष्ट्रप्रेम, समाजनिष्ठा जागवणे, हे काम ‘सतरंगी व्हॉट्सअॅप ग्रुप’ करत आहे. या ग्रुपचे सर्वेसर्वा आहेत, प्रा.अमेय महाजन. या ग्रुपचे उद्दिष्ट हेच की, सुट्टीच्या काळात तरुणांना प्रशासनासोबत काम करण्यास व्यासपीठ उपलब्ध करून देणे. प्रशासनालाही मानवी रूप असून भारतीय जनतेच्या आशा-आकांक्षा आणि ..

आंबेडकरी चळवळीचे नवे युवा पर्व : दलित युथ पँथर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शुद्ध भारतीयत्व आणि समाजभिमुखता घेऊन ‘दलित युथ पँथर’ कार्य करीत आहे. डॉ. बाबासाहेबांना जो तरुण अभिप्रेत होता, तो तरुण, ती संघटना या ‘दलित युथ पँथर’च्या माध्यमातून उभी राहते आहे, असा आशावाद बाळगायला हरकत नाही. ..

डॉ. बाबासाहेबांची जयंती साजरी केली हॅप्पीवाली फीलिंग पद्धतीने!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एकंदरीत योगदान आपल्या सगळ्यांना चांगलेच माहीत आहे. बाबासाहेबांना वाचनाची, शिक्षणाची विलक्षण आवड. त्यांनी ज्ञानाच्या भुकेसमोर कधीच पोटाच्या भुकेला महत्त्व दिले नाही. ‘शिका आणि शिकू द्या,’ हा त्यांनी घेतलेला ध्यास तरुणांच्या मनात अजूनही घर करून आहे. तर एकंदरीत अशा अभ्यासू, ज्ञानी महापुरुषाची जयंतीही तितकीच खास आणि हॅप्पीवाली फीलिंग पद्धतीने करायचा निर्धार पक्का झाला...

स्वमग्नतेवर ‘दिव्यम’चे दिव्यत्व

‘दिव्यम : सेंटर फॉर ऑटिझम’ अंतर्गत स्वमग्न मुलांना त्यांच्या गरजेनुसार, स्वमग्न अनुकूल शिक्षण पद्धतीने त्यांना शैक्षणिक मदत आणि वास्तविक जगाशी जुळवून घेण्यासाठी सहकार्य केले जाते. ‘दिव्यम : सेंटर फॉर ऑटिझम’ चे वेगळेपण म्हणजे एकाच ठिकाणी सगळ्या थेरपी, प्रत्येक स्वमग्न मुलाच्या गरजेनुसार वैयक्तिक सर्वांगीण विकास उपक्रम निदान प्रणाली (उपचार पद्धती) आहेत...

आंतरशालेय स्पर्धांचे पारितोषिक वितरण

चेंबूर एज्युकेशन सोसायटी शाळेचा सिंहाचा वाटा..

समाज सक्षमीकरणाचे ‘रिनोव्हेट’

सामाजिक संस्थांचे सक्षमीकरण, त्यांच्याद्वारे परिणामकारक कार्य आणि त्याद्वारे सकारात्मक सामाजिक परिवर्तन करणे हे लक्ष्य आणि उद्दिष्ट असलेली संस्था म्हणजे ‘रिनोव्हेट इंडिया.’ ‘रिनोव्हेट’ म्हणजे पुनर्बांधणी. पण, सामाजिक संस्थांची पुनर्बांधणी आहे, तिचे पुननिर्माण नाही. संस्थांच्या मूळ उद्देशाच्या गाभ्याला किंचितही धक्का न लावता, उलट त्या उद्देशाला परिपूरक बांधणी करत त्या संस्थांचे सर्वांगीण सक्षमीकरण करणारी संस्था म्हणून ‘रिनोव्हेट इंडिया’ आज कार्यरत आहे...

जातिभेदविरहित समाजनिर्मितीसाठी...

‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही, चातुर्वण्य व जातिभेद ही मानवाचीच निर्मिती आहे’ असे रोखठोक बोलणार्‍या क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांची १९२ वी जयंती उद्या दि. ११ एप्रिल रोजी सारा देश साजरी करणार आहे. त्यानिमित्ताने हा लेखप्रपंच...

पर्यावरण रक्षक

केशवसृष्टी प्रकल्प आपल्या अनेक आयामांच्या मदतीने गेल्या ३० वर्षांपेक्षा काळ अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवित आहे. केशवसृष्टीचा पर्यावरण विभाग ‘माय ग्रीन सोसायटी’द्वारे संपूर्ण देशात कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करणे, नदीशुद्धीकरण तसेच ‘माय ग्रीन सोसायटी’द्वारे ‘केशवसृष्टी सिटी फॉरेस्ट’ या प्रकल्पांतर्गत शहरात कमीत कमी जागेत ‘अकिरा मियावाकी’ पद्धतीने ‘सिटी फॉरेस्ट’ उभारून पर्यावरणाचा ढासळता समतोल सुधारणे इ. विषयांच्या माध्यमातून आजच्या पर्यावरणासारख्या गंभीर समस्यांना सोडविण्याचे काम केले जात आहे...

होळीच्या रंगात मिसळला आनंदाचा रंग

‘चला, होळीच्या रंगात थोडा आनंद मिसळूया! यंदाची होळी ‘हॅप्पीवाली’ होळी साजरी करूया!‘ हे ब्रीदवाक्य घेऊन एक उपक्रम मी आणि माझ्या ‘हॅप्पीवाली फीलिंग’च्या टीमने राबवायचा ठरवला...

‘संवाद कर्णबधिर प्रबोधिनी’

‘संवाद’ ही मानवजातीची प्रभावी शक्ती मानली जाते. मात्र, काही कारणांनी अनेक जण या संवादशक्तीपासून दूर राहतात. या शक्तीपासून वंचित असलेल्या कर्णबधिर मुलांना संवादाचे धडे देण्याचा ध्यास डोंबिवलीतील ‘संवाद कर्णबधिर प्रबोधिनी’ या शाळेने घेतला आहे. ..

वणंद गावाचे नंदनवन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाचे तेज आज जग व्यापून राहिले आहे. या तेजाला आंतरिक साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी रमाबाईंचा त्याग आणि कष्ट विसरून चालणारच नाहीत. रमाबाई आंबेडकरांचे दापोली येथील जन्मगाव वणंद हे आ. विजय(भाई) गिरकर यांनी ‘आमदार आदर्श गाव योजनें’तर्गत दत्तक घेतले. त्या वणंद गावाचे नंदनवन होण्याचा हा प्रवास... ..

साधता संवाद मिटे घरगुती वाद

महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांनी ‘चला बोलूया’ हा समुपदेशनाचा एक नवीन उपक्रम चालू केला आहे. याअंतर्गत मुंबई उच्च न्यायालयातील महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयात (पी.डब्लू.डी. बिल्डिंग, फोर्ट) समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. यात घटस्फोटापूर्वी तसेच घटस्फोटानंतर उद्भवणारे विवाद सोडवण्यासाठी समुपदेशन केले जाते. या समुपदेशन केंद्राद्वारे पक्षकारांशी तज्ज्ञांच्या मदतीने शांतपणे संवाद साधून समाधानपूर्वक तोडगा शोधण्यासाठी मदत केली जाते. ..

कर्जतच्या दुर्गम पाड्यांमधील जीवन आशा

हरिभाऊ भडसावळे उर्फ काका भडसावळे यांनी १९४७ मध्ये हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी गोमा पाटील यांच्या स्मरणार्थ कोतवाल वाडी ट्रस्टची स्थापना केली. ..

सर्जनशिलतेचे मानबिंदू

‘अर्पणमस्तु’ म्हणजे समाजाचे ऋणानुबंध जपत समाजाच्या कल्याणासाठी सर्वोत्तम अर्पण करणे. नितीन केळकर यांनी आपली सर्वोत्तम संकल्पना सर्जनशीलतेच्या आविष्कारातून समाजाच्या अर्थकारणासाठी निर्माण केली आहे. त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. ..

रुजवू संस्कृती वाचनाची...

दिग्गज साहित्यिकांची नगरी म्हणून ओळख असलेल्या डोंबिवलीमध्ये वाचनसंस्कृती, वेगाने फोफावली आहे. ही चळवळ व्यापक करण्यामागे डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाचा मोठा वाटा आहे...

अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट, वानवडी पुणे

‘अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट,’ पुणे येथील एक सक्षम ट्रस्ट. जो दिव्यांगांसाठी काम करतो. मूकबधिर व्यक्तींचे दु:ख, त्यांच्या समस्या जाणून, त्यावर शक्य होईल त्या मार्गाने काम करणारी ‘अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट’ ही संस्था आणि तिच्या उपक्रमांची माहिती समजून घ्यायलाच हवी... ..

पूजन संविधानाचे, जागर संविधानाचा... जागर भारतीयत्वाचा...

सर्वप्रथम डॉ. सुरेश हावरे, विठ्ठल कांबळे, अमित हावरे आणि स्वयम महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संविधानाचे पूजन केले. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. डॉ. सुरेश हावरे आणि विठ्ठल कांबळे यांचा स्वयम महिला मंडळाने मानचिन्ह देऊन सत्कार केला...

शौर्याचे स्मरण-संवर्धन - दुर्गवीर प्रतिष्ठानचे उल्लेखनीय कार्य

महाराष्ट्राच्या शूरवीर अस्मितेचे प्रतिक असलेले गडकिल्ले. या गडकिल्ल्यांची अवस्था दुर्दैवीच म्हणावी लागेल. कधीकाळी शौर्याने पवित्र झालेल्या किल्ल्यांना आता अतिक्रमण, अस्वच्छता, गुन्हेगारी यामुळे अतिशय भग्नावस्था प्राप्त झाली आहे. या गडांचे संवर्धन कोण करणार? या शौर्यशाली अस्मितेचे स्मरण कोण करणार? बाहेरून कोणी येणार नाही. हाच विचार करून दुर्गवीर संस्था गडकिल्ले संवर्धन आणि परिसरातील जनतेच्या विकासासाठी कार्य करत आहे..

एक ध्यास शिक्षणाचा

शिक्षण ही गरज माणसाच्या बौद्धिक क्षमतेसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यावरच मनुष्य जातीचे पुढील भविष्य अवलंबून आहे. या मूळ तत्त्वावर कल्याणमधील ‘जय मल्हार सेवा संस्था’ अनेक वर्षे काम करीत आहे. आज बालदिनाच्या निमित्ताने या संस्थेच्या कार्याचा घेतलेला हा आढावा... ..

शहर कचरामुक्त करताना... संगम प्रतिष्ठान, ठाणे

कचरा ही शहराचीच नव्हे, तर देशाची मोठी समस्या आहे. जिथे तिथे कचरा प्रश्न पेटत आहे. कचरा ही समस्या आहेच. पण या कचऱ्यातूनही माणसाच्या जगण्यासाठी काही सकारात्मक निर्माण करणे हे मोठे आव्हान आहे. जगभरात त्यासाठी विविध प्रयोग होत आहेत. त्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. या कचराप्रश्नावर, स्वच्छता अभियानावर सर्वांगिण अभ्यास करून आपल्या स्तरावर कचराप्रश्न मार्गी लावणारी संगम प्रतिष्ठान संस्था. ..

समर्थांची दूरदृष्टी - लेख क्र. २६

चाफळला देऊळ बांधून झाले. मूर्ती मिळाल्या. मूर्तींची प्रतिष्ठापना झाली. राममंदिरासाठी व तेथील रामनवमीच्या उत्सवासाठी चाफळची निवड हे रामदासांच्या दूरदृष्टीचे फलित होते. ..

सांस्कृतिक डोंबिवलीतील सायकल कल्ब

सायकलला भूतकाळ न होऊ देता तिच्या आधुनिकीकरणासह तिला जोपासण्याचे काम करणार्‍या डोंबिवलीतील ‘डोंबिवली सायकल क्लब’च्या कार्याचा घेतलेला हा आढावा.....

चाफळचे राम मंदिर

कृष्णेच्या खोर्‍यात आल्यावर आपला संप्रदाय वाढविण्यासाठी समर्थांनी मसूर हे ठिकाण निवडण्यात मोठे औचित्य दाखवले होते. ..

तरुणांच्या मदतीने तरुणांसाठीचे एक सुरक्षित शहर

एक सुरक्षित शहर असावे, अशी आपणा सर्वांची इच्छा... आपल्या या स्वप्नांसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस बांधवांचा कधीतरी आपण विचार करावा, अशी साधी भावनाही आपल्या मनात येत नाही. मात्र, मनातील या भावनेला सत्यात उतरवत डोंबिवली ‘ईगल ब्रिगेड’ ही संस्था मागील अनेक वर्षे ‘पोलीस मित्र’ बनून शहरात काम करीत आहे...

तरुणाईची ‘इन्सानियत’

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, “भारत हा तरुणांचा देश आहे.” मोदींच्या विचारातील हा भारतीय तरुण ‘इन्सानियत’मध्ये दिसला. पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी जो ‘एकात्म मानवतावाद’ मांडला आहे, तो ‘इन्सानियत’च्या सेवाकार्याचा अंतरात्मा आहे. देशाचा सन्मान तो आपला सन्मान माननणारे आणि जागतिक पातळीवर आपल्या देशाची प्रतिमा उंचवावी, यासाठी खारीचा वाटा उचलू इच्छिणारी ‘इन्सानियत’ संस्था...

चार्ली स्पोर्टस क्‍लब, विक्रोळी

नाव चार्ली स्पोर्टस क्‍लब आहे मात्र खेळासोबतच हे मंडळ विविध उपक्रम राबवत असते. लहान मुलांनी खेळ गट बनवत या मंडळाची स्थापना केली. आज २५ वर्षात त्या खेळगटाचा स्पोर्टस क्‍लब झाला आहे...

महिलासबलीकरणासह ध्यास बाल संगोपनाचा

शिक्षण हा महिलांच्या प्रगतीतील महत्त्वाचा भाग आहे. पण, आपल्या शिक्षणातून सामाजिक भान जपले पाहिजे. या जाणीवेतून ‘इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली पश्चिम’च्या महिला काम करीत आहे. महिला सबलीकरण व गरजू मुलांसाठी उत्तम भविष्य हे मूळ उद्दिष्ट उराशी बाळगून ८ फेब्रुवारी २००८ साली या संस्थेची स्थापना करण्यात आली. या ‘इनरव्हील क्लब’ची मूळ स्थापना लंडनमधील मार्ग्रेट गोल्डी यांनी केली. त्यांच्या मुख्य ध्येयाला आपले ध्येय मानत २००८ साली ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट’या संस्थेची स्थापना झाली...