क्रांतिपर्व अण्णा भाऊ साठे

परिसंवाद : अण्णा भाऊंचा ‘फकिरा’ माझ्या आयुष्याचे प्रेरणास्थान

अण्णा भाऊ साठे समाजाचे मानबिंदू आहेत. आज समाजाला उत्कर्षाच्या मार्गावर आणण्यासाठी त्यांचे विचार प्रेरणादायी आहेत. अण्णा भाऊंच्या साहित्याने मला काय दिले? हा विचार केला तर उत्तर येते, माणसासाठी माणूस म्हणून जगण्याचे बळ दिले. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर न्यायप्रिय राहण्याची सद्बुद्धी दिली, अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची ताकद दिली...

परिसंवाद : अण्णा भाऊंच्या विचारांनी समरस विचारांची प्रेरणा दिली

अण्णा भाऊंच्या साहित्याने, विचारांनी मला काय दिले? हा विचार करताना आयुष्यातल्या अनेक घटना आठवतात. त्या घटनांमधून मार्ग काढताना अण्णा भाऊंच्या साहित्यातली जाणिवा माझे प्रेरणास्थान होत्या. त्यांच्या कादंबरीतले नायक कायमच माझे प्रेरणास्थान राहिले आहेत. प्रशासकीय सेवेत आणि वैयक्तिक आयुष्यातही समरस आणि नैतिक आयुष्याची संवेदनशील अनुभूती मला अण्णा भाऊंच्या विचारांनीच दिली...

अण्णा भाऊ साठेंच्या साहित्यातील नायिका

अण्णा भाऊंच्या कादंबऱ्यांमधील स्त्रीनायिका वाचल्यानंतर त्यांचे महत्त्व, अस्मिता व स्वातंत्र्यासाठी झिजणाऱ्या त्या मन भारावून टाकतात. या अनोख्या नायिकांचे जीवन, विचार आणि कृती मनाला थक्क करतात. मंगला, वैजयंता, आवडी, चित्रा, रत्ना, चंदना या नायिकांचे जगणे मनाला चटका लावून जाते. पण त्याचवेळी मनाला एक हुरूप देऊन जाते. स्त्री म्हणजे नाजूक, लाडे लाडे बोलणारी, पुरुषांवरच विसंबणारी परावलंबी सजीव, यासारख्या व्याख्येमधून अण्णा भाऊंच्या नायिका स्त्रीची सुटका करतात...

अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील नायक

शब्दाला आपलं करून शब्दाला वाचा देणारं, शब्दांची खाण, शब्दांची जाण आणि बहुजन समाजातील संघर्षाची धगधगती आग आणि वास्तव जीवनातील सत्य घटनांवर आधारित अण्णा भाऊ साठे यांनी कथा आणि कादंबऱ्यांचे लेखन केले. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील नायकाला लढा मान्य होता रडगाणे नाही. त्यांच्या साहित्यातील नायक हा दलित, शोषित, वंचित समाजाचा आहे. परंतु, स्वाभिमानाने जगणारा आहे. इतरांसाठी लढणारा आहे, त्यागी समर्पित भावना ठेवून वेळ पडली तर जीवसुद्धा देणारा आहे...

अण्णा भाऊंच्या साहित्यातील मानवतावाद

प्रत्येक मानवाला स्वातंत्र्य, समता व बंधुताही हवी असते. यात प्राणिमात्रांवरील दया, निसर्गावरील प्रेमही अंतर्भूत आहे. यासच ‘मानवतावाद’ असे म्हटले आहे. आपल्या भारत देशात अनेक राष्ट्र पुरूष होऊन गेले. एक सुसंस्कृत देश म्हणून संपूर्ण जगाचे लक्ष आपण वेधून घेतले आहे. अनेक ऋषी, तत्त्वज्ञानी, महापुरुषांची परंपरा आपणास लाभली आहे. ..

अण्णा भाऊ साठेंचे साहित्य : एक संघर्ष गाथा...

महाराष्ट्राची शाहिरी परंपरा प्रदीर्घ व समृद्ध आहे. अण्णा भाऊंनी ती परंपरा अधिक उन्नत, परिणत व संपन्न केली. अण्णा भाऊंचा जो हात डफावर पडला, त्याच हाताने त्यांनी पोवाडे लिहिले. साहित्याचे विविध प्रकार हाताळले. आपल्या प्रज्ञा-प्रतिभेने त्यांनी काळाच्या छातीवर मानवी शाश्वत मूल्यांच्या अस्मितेची लेणी कोरली. त्यांची शाहिरी ही त्यांच्या हातातली तळपती तलवार होती. कामगार चळवळीत त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे. मराठी भाषेचा त्यांना सार्थ अभिमान होता. मराठी संस्कृतीवर त्यांनी आपला जीव ओवाळून टाकला होता. त्यांचे ..

माझी मैना गावावर राहिली

अण्णा भाऊ साठे म्हणजे एक थोर व्यक्तिमत्त्व होते. समाजव्यवस्थेमुळे त्यांना कुठलीही ज्ञानाची, शिक्षणाची परंपरा लाभली नाही. त्यामुळे त्यांना घराण्याचा वैचारिक वारसा मिळालेला नव्हता. त्याकाळी ‘महार- मांगांची कला’ म्हणून ढोलकी- तुणतुणे आणि तमाशा हेच गणित होते.अण्णा भाऊंना जेमतेम वाचता येत होते. तरीही त्यांनी दलितांच्या,वंचितांच्या उद्धारासाठी आपली लेखणी झिजवली...

लोकशाहीर अण्णा भाऊ यांच्या विचाराने कार्यरत सामाजिक संस्था

तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णा भाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ’, ‘गोवामुक्ती संग्राम’ या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेलं योगदान महत्त्वाचे आहे. माणूस जगला पाहिजे, माणुसकी जीवंत राहिली पाहिजे, न्याय जिंकला पाहिजे, अशी अण्णा भाऊंच्या विचारांची बैठक होती. त्या विचारांवर आज समाजात ..

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आणि सामाजिक चळवळ

ब्रिटिश भारतातून जात असताना ‘कोहिनूर’ हिरा आपल्यासोबत घेऊन गेले. पण, भारतमातेच्या कुशीत असे अनेक हिरे आणि नररत्न जन्मले, ज्यांनी आपल्या कार्याने, प्रतिभेने फक्त भारतवर्षच नाही, तर संपूर्ण जग तेजोमय केले. त्यापैकीच एक नररत्न म्हणजे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे होय. जसे हिऱ्याला अनेक पैलू असतात, त्याचप्रमाणे अण्णा भाऊंच्या श्रीमंत व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत...