मुंबई : (Bangladesh Illegal Migrants) पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी राज्यातील अवैध घुसखोरांबाबत मोठी माहिती दिली आहे. राज्यात उभारलेल्या होल्डिंग सेंटर्समधून आतापर्यंत ४,८०० घुसखोरांना बांगलादेशात परत पाठवण्यात आले असून आणखी ८३६ जणांना लवकरच देशाबाहेर पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
देशाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. सीमाभाग सुरक्षित करणे हे त्यांच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. भारत-बांगलादेश सीमेला कुंपण घालण्यासाठी एकूण ५५६ किलोमीटर जमिनीची आवश्यकता असून त्यापैकी सुमारे १०० किलोमीटर जमीन राज्य सरकारने बीएसएफकडे सुपूर्द केली आहे.(Bangladesh Illegal Migrants)
सरकारचे विशेष लक्ष उत्तर बंगालमधील ‘चिकन नेक’ अर्थात सिलीगुडी कॉरिडॉरवर आहे. हा अरुंद भूभाग संपूर्ण ईशान्य भारताला देशाच्या इतर भागांशी जोडतो. सुरक्षेच्या आणि सामरिक दृष्टिकोनातून हा अत्यंत संवेदनशील भाग मानला जातो. पश्चिम बंगालची बांगलादेशासोबत तब्बल २,२१७ किलोमीटर लांबीची सीमा आहे. शुभेंदू अधिकारी पुढे म्हणाले की, नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) च्या कक्षेत न येणाऱ्या अवैध स्थलांतरितांना थेट देशाबाहेर पाठवले जात आहे. अशा व्यक्तींना ताब्यात घेऊन थेट बीएसएफकडे सोपवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
शुभेंदू अधिकारी यांनी यावेळी मागील तृणमूल काँग्रेस सरकारवरही टीका केली. त्यांच्या मते, पूर्वीच्या सरकारच्या काळात घुसखोर तुरुंगात राहून करदात्यांच्या पैशावर सुखसोयी उपभोगत होते. त्याचबरोबर मागील सरकारने राज्यातील जनगणनेचे काम थांबवून ठेवले होते. भाजप सरकारने ते पुन्हा सुरू केले असून १ ते १५ ऑगस्टदरम्यान घराघरांत जाऊन सर्वेक्षण केले जाईल. पुढील वर्षी फेब्रुवारीअखेर जनगणना पूर्ण होणार असून त्यानंतर त्याच आधारावर मतदारसंघांचे पुनर्रचना (परिसीमन) करण्यात येईल.(Bangladesh Illegal Migrants)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक