पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंडित नेहरूंपेक्षा जास्त काळ देशाचे नेतृत्व केले - नवनाथ बन

    09-Jun-2026
Total Views |

Navnath Ban
 
मुंबई : (Navnath Ban) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित नेहरूंपेक्षा अधिक काळ देशाचे नेतृत्व केल्याचा उल्लेख करत भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली. "मोदींनी देशासाठी ऐतिहासिक कामगिरी केली असताना त्यांना आत्मचिंतनाचा सल्ला देणाऱ्या राऊतांनी आधी स्वतःच्या भूमिकेचा विचार करावा." असा टोला बन यांनी मंगळवार दि.९ रोजी लगावला.
 
संजय राऊत यांच्या पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद घेत नसल्याच्या टीकेला उत्तर देताना बन म्हणाले की,"गेली अनेक वर्षे रोज पत्रकार परिषद घेऊनही राऊतांनी राज्यासाठी किंवा जनतेसाठी कोणते ठोस काम केले, याचे उत्तर द्यावे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुटुंबासाठी नव्हे तर देशासाठी आयुष्य समर्पित केले आहे.मोदींनी सत्तेचा वापर वैयक्तिक संपत्ती किंवा कुटुंबासाठी केला नाही." (Navnath Ban)
 
" शिवसेनेतील फूट ही भाजपमुळे नव्हे तर हिंदुत्वापासून दूर गेल्यामुळे झाली असून बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जिवंत ठेवण्यासाठीच अनेक नेत्यांनी वेगळी भूमिका घेतली ." असेही बन म्हणाले.
 
हेही वाचा :  निसर्ग पर्यटन विकासासाठी ४८.४० हेक्टर शासकीय जमीन वनविभागाकडे हस्तांतरित; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पाठपुराव्याला यश
 
कथित घोटाळ्यांवर बोलताना नवनाथ बन यांनी संजय राऊतांना प्रत्यक्ष आंदोलन करण्याचे आव्हान दिले. "घोटाळे झाले असतील तर रस्त्यावर उतरून लढा द्यावा, फक्त पत्रकार परिषदांमधून आरोप करून उपयोग नाही."असे बन यांनी सुनावले.
 
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर प्रतिक्रिया देताना नवनाथ बन यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. शिख दंगलींमध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्याच्या संदर्भात हे वक्तव्य होते, असे स्पष्ट करत त्यांनी संजय राऊतांच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. (Navnath Ban)