‘मी दुसऱ्या धर्माची, तुमचे देव चालत नाहीत!’; हिंदू देवतांची विटंबना करणाऱ्या नर्सवर गुन्हा दाखल!

आरोपीला तात्काळ अटक करा, हिंदू जनजागृती समितीची मागणी

    09-Jun-2026
Total Views |
 
Hindu Janajagruti Samiti
 
नवी मुंबई : (Hindu Janajagruti Samiti) नेरूळ येथे एका इतर धर्मातील नर्सने हिंदू देवतांच्या मूर्तींची आणि देवघराची जाणीवपूर्वक विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. इतकेच नाही तर हिंदू देवतांना चपलांच्या स्टँडजवळ टाकून दिल्याची संतापजनक घटनाही घडली समोर आली आहे. या धार्मिक द्वेषातून घडलेल्या प्रकारानंतर या नर्स महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तक्रारदार हिंदू महिलेचे बंधू हर्षद पाटील यांनी हा प्रकार घडल्यानंतर हिंदू जनजागृती समितीशी संपर्क साधला. समितीने तात्काळ नेरूळ पोलीस ठाण्यात आरोपी नर्सविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २९८ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला. त्यानुसार गुन्हा दाखल झाला असून, आरोपी नर्सला तात्काळ अटक करण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.
 
हॉस्टेलच्या खोलीत राहणाऱ्या हर्षला पाटील या देवघरात गणेशाची आणि राधाकृष्ण यांच्या मूर्तींची नियमित पूजा करत असत. मे महिन्याच्या अखेरीस तिथे राहायला आलेल्या एका इतर धर्मातील नर्सने देवघराबाबत सातत्याने आक्षेप घेत वाद घालण्यास सुरुवात केली. ५ जून २०२६ रोजी हर्षला कामावरून परतल्या असता, त्यांना देवघर थेट चपला काढण्याच्या ठिकाणी ठेवलेले दिसले, तसेच देवघरातील मूर्तीही बाहेर पाडलेल्या दिसल्या. याबाबत जाब विचारला असता त्या नर्सने, 'माझ्या समोर मला देव नको, मी तुमच्या देवाला मानत नाही’, असे म्हणत उद्धटपणे धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केले.(Hindu Janajagruti Samiti)
 
हा प्रकार रुग्णालय व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी ६ जून २०२६ रोजी संबंधित नर्सला नोकरीवरून निलंबित केले. या कारवाईचा राग मनात धरून त्याच दिवशी संध्याकाळी तिने सामान घेण्याच्या बहाण्याने पुन्हा रूममध्ये प्रवेश केला आणि सूडबुद्धीने पुन्हा एकदा देवघर चप्पल काढण्याच्या ठिकाणी ठेवून मूर्ती पाडल्या. अशा प्रकारे तक्रारदाराच्या अनुपस्थितीत तिने तब्बल तीन वेळा दैवतांची विटंबना करण्यात आली. इतकेच नाही तर जाताना थेट गुंडगिरीची धमकीही दिली.
या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच हिंदू जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ते डॉ. उदय धुरी, रणरागिणी शाखेच्या मुंबई जिल्हा समन्वयक प्रवीणा पाटील, निशांत चौधरी, दत्तात्रेय सावंत व अन्य धर्मप्रेमींनी नेरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांची भेट घेऊन तात्काळ कारवाईची मागणी केली.
 
पोलिसांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत गुन्हा नोंदवला आहे.(Hindu Janajagruti Samiti)
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर होणारे असले आघात आणि हिंदू देवतांची विटंबना करणारे असे प्रकार यापुढे कदापि खपवून घेतले जाणार नाहीत. या प्रकरणात पोलिसांची तत्परता स्वागतार्ह आहे; मात्र कायद्याचा धाक बसण्यासाठी आरोपीला तात्काळ अटक होणे आवश्यक आहे. अटक होईपर्यंत रणरागिणी शाखा आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत राहतील.
 
प्रवीणा पाटील, मुंबई जिल्हा समन्वयक, रणरागिणी शाखा