मुंबई : आठवड्याच्या सुरुवातीलाच गुंतवणूकदारांची विक्रीचा सपाटा लावल्याने ६५० अंकांनी सेन्सेक्स घसरला, निफ्टी २३,१५० अंकांवर पोहोचला. पश्चिम आशियातील युद्धजन्य स्थितीमुळे परकीय गुंतवणूकदारांनी बाजारातून काढता पाय घेतला आणि विक्रीचा सपाटा लावला. शेअर बाजार गडगडण्याची पाच प्रमुख कारणे कोणती ती पाहूयात...
१. जागतिक शेअर बाजारांत घसरण – आशियाई आणि अमेरिकन बाजारांतील जोरदार विक्री झाली. द.कोरिया, जपान, चीनच्या शेअर बाजारांतही घसरण पहायला मिळाली. अमेरिकन बाजारांतील कमजोरीचा प्रभाव आता दिसू लागला आहे.
२. फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरांची चिंता – अमेरिका रोजगारांच्या समाधानी आकडेवारींनंतर आता दरांमध्ये कुठलाही बदल करणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. व्याजदर वृद्धी दीर्घकाळ बाजारात असल्याने गुंतवणूकदारांवर दबाव पडला
आहे.
३. परकीय गुंतवणूकादारांचा विक्रीचा सपाटा – विदेशी गुंतवणूदार भारतातून पैसे काढण्याच्या मागावर आहेत. सातत्याने होणाऱ्या विक्रीने गुंतवूकीवर परिणाम जाणवत आहे.
४. पश्चिम आशियातील तणाव आणि तेलाच्या किंमतीत वाढ – पश्चिम आशियातील युद्धाच्या स्थितीमुळे तणावात्मक स्थिती कायम आहे. कच्च्या तेलाचे वाढलेले दर ही बाजारापुढे चिंतेचा विषय आहे. अशातच इराणने इस्त्रायलच्या ठिकाणांवर हल्ला केला. परिणामी इस्त्रायलने इराणच्या लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. ट्रम्प यांनी इस्त्रायलला शांततेचे आवाहन केले आहे.
५. रुपयाची डॉलरच्या तुलनेत घसरण – रुपयाची आंतरराष्ट्रीय बाजारात सुरू असलेल्या घसरणीने शेअर बाजारात त्याचे पडसाद दिसू लागले आहेत. बॉण्ड यील्डच्या वाढत्या किंमतींनीही सुरक्षित गुंतवणूकीवर भर दिला जात आहे.