लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार; पालघरच्या बोईसर येथे लव्ह जिहाद; रियाज शेखविरुद्ध गुन्हा दाखल

    08-Jun-2026   
Total Views |
 Maharashtra Crime News
 
मुंबई : (Maharashtra Crime News) लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका कॉलेज तरुणीला तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना पालघरमधील बोईसर येथे उघडकीस आली. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून बोईसर पोलीस ठाण्यात आरोपी रियाज शेख याच्याविरोधात 'भारतीय न्याय संहिता' आणि 'पॉक्सो' अंतर्गत गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
 
मिळालेल्या एफआयआर कॉपीनुसार, मार्च महिन्यामध्ये पीडित तरुणीला तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रियाज शेख नावाच्या तरुणाची फॉलो रिक्वेस्ट आली होती. ती रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये इन्स्टाग्रामवर मेसेजद्वारे बोलणे सुरू झाले. हळूहळू या संभाषणाचे रूपांतर मैत्रीत झाले आणि त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर केले. त्यानंतर ते नियमित चॅटिंग करू लागले. काही दिवसांनी रियाजने पीडितेला भेटण्याचा आग्रह धरला. पीडित तरुणी तयार झाल्यानंतर तो तिला पालघर येथील दांडेकर कॉलेज परिसरात भेटायला आला. (Maharashtra Crime News)
 
पहिल्याच भेटीत रियाजने 'तू मला खूप आवडतेस, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे' असे सांगून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. यानंतर दोघांची दांडेकर कॉलेज परिसरात दोन-तीन वेळा भेट झाली. प्रत्येक वेळी रियाज तिला 'मी तुझ्याशीच लग्न करणार आणि तुझ्यासोबतच राहणार' असे सांगून तिचा विश्वास संपादन करत होता.
 
एप्रिल महिन्यामध्ये रियाजने पीडितेला आपल्या मित्राच्या व्हिलावर फिरायला जाऊ म्हणून आमिष दाखवले. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे पीडित तरुणी दुपारी १२:०० वाजता कॉलेजला गेली असता, दुपारी १२:३० वाजता रियाज तिथे स्वतःची गाडी घेऊन आला. तो तरुणीला गाडीत बसवून दांडेकर कॉलेजवरून बोईसर पेट्रोल पंपाच्या दिशेने आणि तिथून ब्रिजवरून बेटेगाव येथील मित्राच्या व्हिलावर घेऊन गेला.
 
व्हिलामध्ये गप्पा मारत असताना रियाजने पीडितेच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला. तरुणीची इच्छा नसतानाही त्याने तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. हा गैरप्रकार केल्यानंतर आरोपी रियाज शेख याने पीडित तरुणीशी बोलणे पूर्णपणे बंद केले. तिची फसवणूक करून तो तिला पुन्हा कधीही भेटला नाही. आपली फसवणूक आणि छळ झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
 
पीडितेने दिलेल्या सविस्तर जबाबावरून बोईसर पोलिसांनी आरोपी रियाज शेख याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये कलम ६४(१) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पाक्सो) २०१२ अन्वये कलम ४, ६, ८ आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पालघर आणि बोईसर परिसरात खळबळ उडाली असून, बोईसर पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत. (Maharashtra Crime News)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक