दादर प्लाझा बस अपघात : अनेक वाहनांची धडक, धक्कादायक व्हिडिओ, एक मृत्यू, तीन जखमी
08-Jun-2026
Total Views |
मुंबई (Dadar Plaza bus accident) : नेहमीच वर्दळीचे ठिकाण असलेल्या दादर प्लाझा येथे एका बेस्ट बसचा अपघात झाला. यावेळी दोन दुचाकी आणि दोन टॅक्सीला धडक देण्यात आले. परिणामी, अपघानंतर सायन पनवेल द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. याबद्दल प्रार्थमिक माहितीनुसार, दादर प्लाझा येथे येणाऱ्या बसचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी, एक ईव्ही दुचाकी, टॅक्सी आणि ईव्ही कारला धडक दिली.
या अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. बसची धडक इतकी तीव्र होती की, त्यात इतर वाहनांचे झालेले नुकसान दिसू लागले आहे. यानंतर बाजूला सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी लावलेल्या दुभाजकांना ही बस आदळली. यावेळी बाजूला असलेल्या बुलडोझरचा भाग बसच्या काचेवर आदळल्याने बसचे नुकसान झाले.
Accident at Plaza Cinema, #Dadar towards the Tilak Road bridge turn circle. The incident appears to have been caused by a JCB stationed on the road near the turning point, creating a hazardous situation. Urgent attention needed for safer traffic management. #MumbaiTrafficpic.twitter.com/7a68HiUg2I
या प्रकरणी वाहतूक पोलीसांनी एक्स पोस्ट करत माहिती दिली आहे. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. वीर कोतवाल उद्यान ते शीव पनवेल मार्गावरील वाहतूक यामुळे धीम्यागतीने चालत होती. बसचालक दुखापत झाली असून त्याच्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान यात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी असल्याची माहिती आहे. अपघातानंतर मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात तीन जण जखमी झाले असून एक जणाचा मृत्यू झाला आहे. सर्वांना सायन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आहे.
१) ऋषभ गुप्ता वय (25-30) यांच्या डोक्याला मार लागा असून ते गंभीररित्या जखमी आहेत.
२) सतीश वाघंबरे (वय 48) जे बसचे कण्डक्टरआहेत त्यांच्या छातीला आणि मांडीला मार लागला आहे
3) महेश डोईफोडे यांच (वय 50) असून त्यांच्या खांद्याला मार लागला आहे.
मृत
1) एका अपरिचित पुरुष व्यक्तीचा मृतदेह देखील सायन हॉस्पिटलमध्ये आणण्यात आला. मात्र त्याची ओळख पटू शकलेली नाही. पुरुष व्यक्तीच वय 22 ते 25 म्हटलं जात आहे.