मी कबड्डीचा खेळाडू आहे! मला बुध्दीबळ कळत नाही!, छगन भुजबळ असं का म्हणाले? इशारा कुणाकडे?

    08-Jun-2026
Total Views |
Chhagan Bhujbal Statement
 
मुंबई : (Chhagan Bhujbal Statement) “मी कबड्डीचा खेळाडू आहे मला बुध्दीबळ कळत नाही. आता नाही तर पुढे कधीतरी संधी मिळेल.”असे म्हणत अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेनंतर त्या राज्यसभा जागेवार जाण्यास मंत्री छगन भुजबळ इच्छुक होते पण त्यांनी काही अटी घातल्या होत्या, प्रत्यक्षात मात्र राजेंद्र जैन यांना राष्ट्रवादीची राज्यसभा उमेदवारी निश्चीत करण्यात आली. यानंतर सोमवार दि.८ रोजी प्रसार माध्यमांसमोर मंत्री छगन भुजबळ बोलत होते.
 
“यापूर्वी चार,पाचवेळा राज्यसभेवर लोकसभेवर जायची संधी होती ती हुकली,मग यावेळी जायच का तर जाऊ असा विचार आला.परंतु मकरंद पाटील मंत्री आहेत त्यांचे भाऊ खासदार आहेत.उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि पार्थ पवार खासदार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे खासदार ,खासदार सुनील तटकरे अशी अनेक उदाहरणे देता येतील ज्यात इतरांची मूल, बाळ जशी आमदार,खासदार आहेत आणि इकडे मंत्री आहेत. तोच न्याय मला मिळावा माझ्यासुद्धा पुढच्या पिढीस मंत्रीपद द्या मी राज्यसभेवर जातो अशी माझी मागणी होती.(Chhagan Bhujbal Statement)
 
 
पण ही मागणी पक्ष स्तरावर पोहोचवायला वेळ लागला असेल याची शक्यता नाकारता येत नाही.पण या मागणीस भाजपने नकार दिला या गोष्टीत तथ्य नाही.माझी कोणतीही नाराजी नाही.प्रफुल्ल पटेल यांची आजची भेट देखील साधारण होती.पक्ष स्थापन करण्यापासून शरद पवार यांच्यासोबत मी सुद्धा पुढाकार घेतलेला आहे.मलासुद्धा इतरांसारखच न्याय मिळाला पाहिजे ही माझी मागणी होती.” असेही मंत्री भुजबळ म्हणाले.(Chhagan Bhujbal Statement)