नवी मुंबई-चिपी विमानसेवा स्वातंत्र्यदिनापूर्वी सुरू होण्यासाठी सकारात्मक पावले; मंत्री नितेश राणे यांची Fly91 कंपनीसोबत महत्त्वपूर्ण चर्चा

गणेशोत्सवात कोकणवासीयांची गैरसोय टळणार; नवी मुंबई–चिपी मार्गावर वाढीव उड्डाणांची तयारी

Total Views |
Air Connectivity Maharashtra
 
मुंबई : (Air Connectivity Maharashtra) कोकणातील हवाई संपर्क अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई-चिपी विमानसेवा स्वातंत्र्यदिनापूर्वी सुरू करण्याबाबत तसेच आगामी गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त उड्डाणांची व्यवस्था करण्यासंदर्भात मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
 
यावेळी Fly91 कंपनीचे सीईओ मनोज चाको यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नवी मुंबई–चिपी विमानसेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक बाबींचा आढावा घेण्यात आला. या सेवेच्या प्रारंभासाठी राज्य शासनाच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य आणि पाठबळ दिले जाईल, असे आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिले.
 
तसेच, गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने अतिरिक्त उड्डाणांची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. यामुळे कोकणवासीयांसह पर्यटकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
 
नवी मुंबई–चिपी विमानसेवा सुरू झाल्यानंतर सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणाचा देशातील प्रमुख शहरांशी हवाई संपर्क अधिक मजबूत होईल. याचा पर्यटन, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार असून कोकणाच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. (Air Connectivity Maharashtra)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.