विविध वृक्षांच्या रोपणाने जागतिक पर्यावरण दिन साजरा

    07-Jun-2026   
Total Views |
Tree Plantation Kalyan
 
डोंबिवली : (Tree Plantation Kalyan) रा स्व संघ पर्यावरण गतिविधि आणि रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हर साईड यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दिनांक ५ जून २०२६ रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत १५० विविध रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
 
कल्याण पश्चिम मधील उंबर्डे येथे नानासाहेब धर्माधिकारी उंबर्डे वनीकरण उद्यान आहे. सदर उद्यानात मागील वर्षी याच दिवशी प्रथम वर्धापन दिन म्हणून रा स्व संघ पर्यावरण गतिविधि आणि रोटरी क्लब कल्याण रिव्हर साईड यांच्या प्रयत्नांतून साधारणपणे ८५० रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले होते. त्यातील ६५० झाडांची चांगलीच वाढ झाली आहे. वृक्षारोपण करण्यासाठी अनेक मंडळींचा सहभाग पर्यावरण दिनी मिळतो.
 
पण या झाडांना जगवण्यासाठी पडद्यामागील काही मोजकी मंडळी आहेत, जी सातत्याने वेळ काढून झाडांना पाणी घालणे, स्वच्छता राखणे, रोपाला आधारकाठीची स्थिती मजबूत करणे, रोपाभोवतालची माती हलवणे, अशी विविध कामे वर्षभर वेळ वैयक्तिक काढुन करतात, अशा १० व्यक्तींचा छोटेखानी सत्कार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रा. स्व. संघ जिल्हा कार्यवाह, कल्याण जिल्हा दिनेश पटेल यांच्या हस्ते करण्यात आला.(Tree Plantation Kalyan)
 
 
दिनेश पटेल यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात पाणी वाचवा, झाडे लावा आणि वाढवा, प्लास्टिक या शत्रूचा वापर टाळा, कुटुंब म्हणून मोबाईल, टीव्ही बंद करून एकत्र जेवण करा, एकमेकांची चौकशी करा, अन्य न्याती समाजातील मित्र करून सामाजिक समरसता साधा, अश्या महत्त्वाच्या विषयावर उपस्थितांना मार्मिक शब्दात मार्गदर्शन केले.(Tree Plantation Kalyan)
 
रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हर साईड चे माजी अध्यक्ष योगेश कल्हापूरे यांनी वृक्षारोपण करणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे कारण आपल्याला अजून झाडे लावायची आहेत, पर्यावरण दिवसा व्यतिरिक्त अन्य दिवशी देखील येऊन झाडांना पाणी घालणे, निगा राखणे हे असंख्य कार्यकर्त्यांनी केली पाहिजे असे आवाहन देखील केले.
 
सदर रोपांचा खर्च पिंक अँड ब्लू हेअर अँड ब्युटी सलोन, खडकपाडा, कल्याण च्या श्रीमती स्मृती माने पाटील यांनी केला. निकिता भोईर यांनी त्यांची महिलांची संस्था 'कल्याण मॉम' या सामाजिक संस्थेबद्दल उपस्थितांना माहिती दिली आणि पुढे अशीच आमची मदत वेळवेळी होईल अशी ग्वाही दिली.
 
सदर कार्यक्रमाकरिता उपरोक्त संस्थांमधून साधारणपणे ५५ पुरुष आणि ३५ महिला उपस्थित होत्या. या समाधानकारक अशा पर्यावरण पोषक कार्यक्रमास अजून हातभार लावू असा निर्धार सर्वांनी मिळून केला.(Tree Plantation Kalyan)