प्रभाग क्रमांक ४७ मध्ये अत्याधुनिक “२४ तास मान्सून डिजास्टर कंट्रोल रूम” सुरू; “मदद का ठिकाणा - तेजिंदर सिंग तिवाना” अभियानांतर्गत अभिनव उपक्रम
07-Jun-2026
Total Views |
मुंबई : (Monsoon Disaster Control Room) मुंबईतील मान्सून काळात होणारे पाणी साचणे, वाहतूक कोंडी, झाडे कोसळणे तसेच इतर आपत्कालीन परिस्थितींमध्ये नागरिकांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रभाग क्रमांक ४७ चे नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांच्या अत्याधुनिक २४x७ मान्सून डिजास्टर कंट्रोल रूमचे उद्घाटन रविवार दि.७ रोजी महाराणा प्रताप गार्डनजवळ, मलाड लिंक रोड मेट्रो स्थानकाखाली, मलाड (पश्चिम), मुंबई येथे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराचे कोषाध्यक्ष तथा भाजप मुंबईचे महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी आणि माजी नगरसेविका जया सतनाम सिंग तिवाना यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.
यावेळी तेजिंदर तिवाना म्हणाले, “आजच्या काळात केवळ पारंपरिक पद्धतींनी समस्यांचे निराकरण करणे पुरेसे नाही. आधुनिक तंत्रज्ञान, रिअल-टाइम मॉनिटरिंग आणि अधिक चांगल्या समन्वयाच्या माध्यमातून नागरिकांना जलद आणि प्रभावी मदत पुरवणे ही काळाची गरज आहे. समस्या कळण्यापासून ते त्यावर कारवाई होईपर्यंतचा कालावधी कमीत कमी ठेवणे हे आमचे उद्दिष्ट आहे.” (Monsoon Disaster Control Room)
तिवाना यांनी सांगितले की, "या विशेष कंट्रोल रूमअंतर्गत प्रभाग क्रमांक ४७ मधील पाणी साचण्याच्या दृष्टीने संवेदनशील अशा ६ ठिकाणी वाय-फाय आधारित आधुनिक कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संबंधित परिसरावर थेट नजर ठेवली जाणार असून, पाणी साचणे, वाहतूक कोंडी, झाडे पडणे किंवा इतर आपत्कालीन घटनांवर तात्काळ कारवाई सुनिश्चित केली जाईल." (Monsoon Disaster Control Room)
या कंट्रोल रूममध्ये प्रशिक्षित आपत्कालीन कर्मचारी, आवश्यक यंत्रसामग्री आणि उपकरणांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका, अग्निशमन दल, पोलीस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग, वीज पुरवठा विभाग आणि आरोग्य विभाग यांच्याशी थेट समन्वय साधण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामुळे नागरिकांना त्वरित मदत मिळू शकेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या विकासात नवीन विचारसरणी, युवा नेतृत्व आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराला चालना देण्यासाठी महापालिका निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर युवकांना संधी दिली आहे. त्यांच्या या दूरदर्शी विचारातून प्रेरणा घेत प्रशासन अधिक गतिमान, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि नागरिककेंद्रित करण्याच्या उद्देशाने हा विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. (Monsoon Disaster Control Room)