मुंबई : (Dada Bhuse) "यंदाचे शैक्षणिक वर्ष सध्याच्या धोरणाप्रमाणेच सुरू राहील. त्रिभाषा धोरणाबाबतचा नरेंद्र जाधव समितीचा अहवाल उपलब्ध असला तरी याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल." असे संकेत शालेयशिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.याचा अर्थ त्रिभाषा सूत्र यंदा शाळांमध्ये लागू होणार नाही अशी स्पष्टता शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.
त्रिभाषा सूत्र धोरण राज्यात लागू करण्यात येणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते तसेच गेल्या वर्षी इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्ती आदेश सुद्धा दिला गेला होता पण यास विरोध झाल्यानंतर मात्र धोरण बदलले गेले आणि तिसरी भाषा म्हणून कोणत्याही भारतीय भाषेचा समावेश केला गेला.
त्रिभाषा सूत्राचा अभ्यास करण्यासाठी अर्थतज्ञ व शिक्षण तज्ञ नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यांची समिती सुद्धा तयार केली गेली होती. त्या समितीचा अहवाल फेब्रुवारी महिन्यात सादर केला गेला. पण १५ जून पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना त्रिभाषा सूत्र निर्णय तूर्तास तरी लागू नाही आहे. (Dada Bhuse)