सावरकर स्मारकात ‘स्वरार्जुन’ला रसिकांची उत्स्फूर्त दाद

    07-Jun-2026   
Total Views |
Cultural Event Mumbai
 
मुंबई : (Cultural Event Mumbai) दादर येथील सावरकर स्मारकात दि. ५ जून रोजी महाभारतसृष्टी प्रस्तुत ‘स्वरार्जुन’ या सांगीतिक आणि निवेदनप्रधान कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारतीय संस्कृती, महाभारताचे तत्त्वज्ञान, मानवी मूल्ये आणि संगीत यांचा अनोखा संगम घडवून आणणाऱ्या या कार्यक्रमाने उपस्थित प्रेक्षकांना चिंतनशील आणि भावस्पर्शी अनुभव दिला.
 
महाभारतातील अर्जुनाच्या जीवनप्रवासावर आधारित या कार्यक्रमात अर्जुनाचे योद्धा, शिष्य, मित्र, पुत्र, पती आणि नेता म्हणून असलेले विविध पैलू संगीत, काव्य आणि प्रभावी निवेदनाच्या माध्यमातून उलगडण्यात आले. नातेसंबंध, नेतृत्व, कर्तव्य, भावना, संघर्ष आणि आत्मशोध यांसारख्या सार्वकालिक विषयांना स्पर्श करणाऱ्या सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली.(Cultural Event Mumbai)
 
या कार्यक्रमास लेखिका आणि सावरकर स्मारकाच्या विश्वस्त मंजिरी मराठे, उद्योजक शरदमणी मराठे, ध्वनिमुद्रण क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ अविनाश ओक, कोकण विकास आघाडीचे मुंबई भाजपा अध्यक्ष सुहास आडीवरेकर, निवृत्त एसीपी इंद्रजीत कार्ले, अभिनेत्री राधिका हर्षे आणि संगीतकार वर्षा भावे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
 
या कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती वैभव केळकर आणि मेघना दलाल यांची असून त्यानी मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाच्या संकल्पनेचे आणि सादरीकरणाचे विशेष कौतुक केले.‘स्वरार्जुन’ हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नसून भारतीय संस्कृतीचा वैचारिक आणि भावनिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.(Cultural Event Mumbai)
 
 




मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.