मुंबई : (Film Association Election) मागच्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची पंचवार्षिक निवडणूक दि. ७ जून रोजी संपन्न झाली. या निवडणूकीत दि. ७ जूनच्या संध्याकाळपर्यंत एकूण १६९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.राज्यभरामध्ये कोल्हापूर, पुणे, सोलापूर, मुंबई, नाशिक अशा ५ मतदान केंद्रांवर पार पडलेल्या या मतदानामध्ये सर्व केंद्रांना मिळून एकूण ४९.९० टक्के मतदान झाले.
तब्बल नऊ वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीकडे मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि सभासदांचे लक्ष लागले होते. या निवडणूकीचा निकाल आज दि. ८ जून रोजी जाहीर होणार आहे. महामंडळाच्या राज्यभरातील ३,४०३ पात्र सभासदांना मतदानाचा अधिकार मिळाला होता. १४ जागांसाठी एकूण ४४ उमेदवार या निवडणूक रिंगणात होते.(Film Association Election)
समर्थ पॅनेल आणि चित्रकर्मी पॅनेल या दोन प्रमुख गटांनी प्रत्येकी १४ उमेदवार उभे केले आहेत. याशिवाय १६ अपक्ष उमेदवारांनीही निवडणूक लढविल्याने अनेक जागांवर चुरशीची लढत बघायला मिळाली.चित्रपट क्षेत्रातील मान्यवर प्रिया बेर्डे, किशोरी शहाणे, सोनाली खरे, केदार शिंदे,स्वप्निल जोशी, विजय गोखले, संजय जाधव, पुष्कर श्रोत्री, संदिप पाठक,उषा नाईक,शरद पोंक्षे, प्रदीप वेलणकर, आदी मान्यवरांनी मतदानाचा अधिकार बजावला.
अभिनेत्यांनी केलेला राजकीय हस्तक्षेपाचा आरोप, गटबाजीमुळे उफळून येणारे वाद, आदी गोष्टींमुळे ही निवडणूक चांगलीच चर्चेत आली होती. ओटीटी सोबत असलेली चित्रपटसृष्टीची स्पर्धा, निर्मितीचा वाढता खर्च, वितरण व्यवस्थेतील अडचणी, चित्रपटगृहांचे प्रश्न असे अनेक प्रश्न मराठी चित्रपटसृष्टीसमोर उभे असताना येणाऱ्या काळात महामंडळाकडून काय भूमिका घेतली जाईल याकडे सगळ्यांचेच लक्ष्य लागले आहे.(Film Association Election)
मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.