वाढवण बंदरात लघु उद्योगात स्थानिकांना प्राधान्य द्या;आमदार विलास तरे यांची मागणी

जेएनपीए अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक गौरव दयाल यांची घेतली प्रत्यक्ष भेट

Total Views |
INFRASTRUCTURE DEVELOPEMENT
 
नवी मुंबई : (Infrastructure Development) प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पातील लघु व सहाय्यक कामांमध्ये स्थानिक भूमिपुत्र, आदिवासी व प्रकल्पग्रस्त नागरिकांना प्राधान्य द्या अशी मागणी बोईसर विधानसभा आमदार विलास तरे यांनी जेएनपीए अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक गौरव दयाल यांची प्रत्यक्ष भेट भेट घेऊन मागणी करत लेखी निवेदन दिले आहे.
 
यावेळी आमदार तरे म्हणाले की, पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदर हा देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी व विकासात्मक प्रकल्प असून या प्रकल्पाचा मोठा भाग माझ्या बोईसर विधानसभा मतदारसंघाच्या कार्य क्षेत्राशी निगडित आहे. वाढवण बंदर प्रकल्पाच्या उभारणी दरम्यान तसेच भविष्यात प्रकल्पाशी संबंधित विविध लघु, सहाय्यक व पूरक कामे मोठ्या प्रमाणावर निर्माण होणार आहेत.
 
त्यामुळे वाढवण बंदराशी संबंधित सर्व विभाग, कंत्राटदार संस्था व एजन्सींना आवश्यक निर्देश देऊन लघु व सहाय्यक कामांमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्याबाबत स्पष्ट धोरण अवलंबण्यात यावे, अशी मागणी आमदार विलास तरे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
 
हेही वाचा :  एअर इंडिया इमारतीच्या दुरुस्तीला गती; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रत्यक्ष पाहणी
 
दरम्यान जेएनपीए अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक गौरव दयाल म्हणाले की, स्थानिकांना प्राधान्याच्या अनुषंगाने आवश्यक ते सर्व उपाययोजना करण्यात येतील. तसेच, स्थानिक युवकांना कौशल्य विकास, प्रशिक्षण व रोजगारक्षम बनविण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत असून यामुळे प्रकल्पाविषयी स्थानिकांमध्ये विश्वास निर्माण होण्यास मदत होईल तसेच प्रकल्प आणि स्थानिक समाज यांच्यात समन्वय व सहकार्याची भावना अधिक दृढ करण्याचा आमचा मानस आहे.(Infrastructure Development)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.