मुंबई : (Illegal Bangladeshis In Gujarat) गुजरातमध्ये अवैध बांग्लादेशी घुसखोरांविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी ‘ऑपरेशन डेल्टा हंट’ अंतर्गत एका दिवसात तब्बल ५०१ बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासात असे आढळून आले की, हे लोक कोलकात्यातील दलाल आणि मोबाईल अॅप्सच्या माध्यमातून बांगलादेशात पैसे पाठवत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी ६,२०० हून अधिक संशयित व्यक्तींचा डेटाबेस तयार केला आहे. याच माहितीच्या आधारे राज्यव्यापी मोहीम राबवण्यात आली. ताब्यात घेतलेल्या अनेकांनी फसव्या मार्गाने भारतीय ओळखपत्रेही मिळवली होती. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी अहमदाबाद क्राइम ब्रँच आणि पोलिसांच्या ३० पथकांकडून चौकशी सुरू आहे.
राज्याचे गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांनी सांगितले की, प्रत्येक घुसखोराचा शोध घेऊन त्यांना बांगलादेशात परत पाठवले जाईल. राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे देखील सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच घुसखोरांसह त्यांना आश्रय देणारे आणि रोजगार उपलब्ध करून देणाऱ्यांविरुद्धही कठोर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. (Illegal Bangladeshis In Gujarat)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक