विषारी दारू प्रकरणातील मुख्य आरोपीच्या घरावर बुलडोझर; पिंपरी-चिंचवड महापालिकेची मोठी कारवाई

    04-Jun-2026
Total Views |
Pune Toxic Liquor Crackdown
 
पुणे (Pune Toxic Liquor Crackdown) : पिंपरी-चिंचवडमधील विषारी दारू प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नल सिंह विरक याच्या बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेल्या घरावर आणि दारू विक्रीच्या अड्ड्यावर गुरुवारी बुलडोझर कारवाई करण्यात आली. पिंपरी-चिंचवड महापालिकेने सकाळी ११ वाजल्यापासून बांधकाम पाडण्याची मोहीम सुरू केली. (Pune Toxic Liquor Crackdown)
 
महापालिकेने २ जून रोजी विरक याला नोटीस बजावत संबंधित बांधकाम बेकायदा असल्याचे घोषित केले होते. तसेच २४ तासांच्या आत स्वतःहून ते हटविण्याचे आदेश दिले होते. मात्र, सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत असल्याने त्याच्या वतीने केवळ घरातील साहित्य बाहेर काढण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे महापालिकेने थेट पाडकामाची कारवाई हाती घेतली. (Pune Toxic Liquor Crackdown)
 
या कारवाईदरम्यान प्रशासनासमोर तांत्रिक अडचणीही उभ्या राहिल्या. ज्या ठिकाणी घर आणि कथित दारू अड्डा आहे, तेथे जेसीबी किंवा पोकलेनसारखी अवजड यंत्रे पोहोचणे कठीण असल्याने काही भागातील पाडकाम लहान यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाच्या मदतीने करण्यात आले. (Pune Toxic Liquor Crackdown)
 
दरम्यान, विनय कुमार चौबे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. कारवाई सुरू असलेल्या परिसरात पोलीस आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या बंदोबस्तासह उपस्थित होते.
 
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला असून अवैध दारू निर्मिती व विक्रीच्या संपूर्ण साखळीचा शोध घेण्यासाठी व्यापक कारवाई सुरू आहे. आरोपींविरोधातील कारवाईचा भाग म्हणून आता त्यांच्या अवैध मालमत्तांवरही प्रशासनाचा बुलडोझर चालू लागला आहे. (Pune Toxic Liquor Crackdown)
 
 

नवी मुंबईतील बाप-लेक अटकेत; आतापर्यंत ३३३ आरोपी जेरबंद
 
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये बनावट दारू पिऊन २२ जणांचा मृत्यू झालेल्या भीषण विषबाधा प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) मोठी कारवाई करत नवी मुंबईतील बाप-लेकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांची नावे अरुण जगदंबा चौबे (५९) आणि अभिषेक अरुण चौबे (२४) अशी असून ते वाशी परिसरातील रहिवासी आहेत.
 
सीआयडीच्या तपासात चौबे पिता-पुत्रांनी बनावट दारू तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या धोकादायक रसायनांचा पुरवठा केल्याचे उघड झाले. या रसायनांमुळे तयार झालेली विषारी दारू पिल्याने अनेकांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. पुरवठा साखळीतील त्यांची भूमिका समोर आल्यानंतर विशेष पथकाने त्यांना अटक केली. त्यानंतर पिंपरी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. (Pune Toxic Liquor Crackdown)
 
यापूर्वी या रॅकेटचा कथित सूत्रधार योगेश वानखेडे आणि त्याच्या काही साथीदारांनाही अटक करण्यात आली होती. २२ जणांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र सरकारने या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवला आहे.
 
दरम्यान, या घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्यभर बेकायदा दारूविरोधात व्यापक मोहीम सुरू केली आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रभर ४४०धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईत बेकायदा दारू निर्मिती व विक्रीशी संबंधित ३३३ जणांना अटक करण्यात आली आहे. (Pune Toxic Liquor Crackdown)
 
या मोहिमेत १.६१ लाख लिटर रसायने, ९,६८६ लिटर बनावट दारू आणि पाच वाहने जप्त करण्यात आली असून जप्त मालाची एकूण किंमत सुमारे ८३.२४ लाख रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तपास यंत्रणा आता या संपूर्ण अवैध दारू नेटवर्कचा उलगडा करण्यासाठी पुरवठा साखळीचा शोध घेत आहे. (Pune Toxic Liquor Crackdown)