केरळमध्ये मान्सूनचे अधिकृत आगमन; मुंबईतही लवकरच दमदार पावसाची शक्यता
04-Jun-2026
Total Views |
मुंबई (Kerala Monsoon and Mumbai Monsoon Update) : देशवासीयांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे नैऋत्य मान्सूनचे गुरुवारी केरळमध्ये अधिकृत आगमन झाले आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार यंदा मान्सून साधारण तीन दिवस उशिराने केरळमध्ये दाखल झाला. दरवर्षी साधारणपणे १ जून रोजी मान्सून केरळमध्ये पोहोचतो आणि त्यानंतर देशभरातील चार महिन्यांच्या पावसाळ्याची सुरुवात होते. (Kerala Monsoon and Mumbai Monsoon Update)
हवामान विभागाने केरळमध्ये पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. केरळनंतर मान्सूनची वाटचाल आता उत्तरेकडे सुरू होणार असून, येत्या काही दिवसांत तो महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागांमध्येही पोहोचण्याची शक्यता आहे. (Kerala Monsoon and Mumbai Monsoon Update)
प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत ७ जूनपर्यंत अंशतः ढगाळ वातावरण राहू शकते. तसेच मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांची शक्यता वर्तविण्यात आली आहे.(Kerala Monsoon and Mumbai Monsoon Update)
दरम्यान, ७ जूनपर्यंत देशातील अनेक राज्यांमध्ये पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आला आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड तसेच ओडिशा, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये व्यापक पावसाचा अंदाज आहे. काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह ताशी ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या या अंदाजामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा सुरू आहे.(Kerala Monsoon and Mumbai Monsoon Update)