मुंबई : (Chief Minister Devendra Fadnavis) ‘भारत टॅक्सी’ला राज्यात हिरवा कंदील मिळाला असून राज्यात ऑनलाइन ॲप आधारित ॲग्रीगेटर सहकारी टॅक्सी सेवेबाबत परिवहन विभागामार्फत तातडीने नियमावली तयार करून या सेवेस परवानगी देण्यात येईल. ॲग्रीगेटर सहकारी टॅक्सीमुळे लाखो चालकांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य, सामाजिक सुरक्षा निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
सहकार टॅक्सी को. ऑपरेटिव्ह लिमिटेडची (भारत टॅक्सी) सेवा सुरु करण्यासंदर्भात मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आ. रवींद्र चव्हाण, आ. प्रसाद लाड, आमदार प्रवीण दरेकर, भारत टॅक्सीचे कर्नल हिमांशू, अदानी एअरपोर्ट चे कार्यकारी संचालक जीत अदानी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. (Chief Minister Devendra Fadnavis)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “ॲग्रीगेटर टॅक्सीमुळे चालकांच्या जीवनात परिवर्तन घडेल आणि नागरिकांना दर्जेदार सेवेचा लाभ मिळेल. या टॅक्सी सेवेच्या माध्यमातून छोट्या शहरापर्यंत सहज पोहचण्यास मदत होईल.”
देशातील सुमारे २ कोटी व्यावसायिक चालकांचे आर्थिक, सामाजिक आणि व्यावसायिक सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या निर्देशानुसार 'सहकार टॅक्सी को. ऑपरेटिव्ह लिमिटेड' (भारत टॅक्सी) ही महत्त्वाकांक्षी संकल्पना प्रत्यक्षात पुढे आली आहे. या उपक्रमामुळे चालकांना केवळ रोजगार नव्हे, तर मालकी हक्क, सामाजिक सुरक्षा आणि न्याय्य उत्पन्नाची संधी उपलब्ध होणार आहे.
‘भारत टॅक्सी’ च्या माध्यमातून चालकांना कुटुंब, आरोग्य व अपघात विमा संरक्षण मिळणार आहे. तसेच प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कमी व्याजदराने सुमारे ९.५ टक्के कर्ज उपलब्ध होणार आहे. मुंबई येथे भारत टॅक्सीची सुरुवात केली जाणार असून या पाठोपाठ पुणे आणि नागपूर येथेदेखील ही सेवा पोहोचवली जाईल. (Chief Minister Devendra Fadnavis)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....