सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीवर चर्चा

    03-Jun-2026
Total Views |
Aided School Teachers
 
मुंबई : (Aided School Teachers) खाजगी अनुदानित शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी मुंबई महापालिका मुख्यालयात संयुक्त बैठक पार पडली. सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसह विविध मागण्यांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
 
मुंबई महापालिका मुख्यालयात खासदार मनोज कोटक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर तसेच महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत खाजगी अनुदानित शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एप्रिल २०१६ पासून प्रलंबित असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा प्रश्न, प्रवास भत्ता वाढ तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार पेन्शन लागू करण्याच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. (Aided School Teachers)
 
हेही वाचा :  मंदिरांच्या नावावरील जमिनींचा हक्क हिरावून घेणे कितपत योग्य - सुनिल घनवट
 
यावेळी संबंधित मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर करण्यात आले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढून त्यांना न्याय मिळावा तसेच त्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.
 
बैठकीस अतिरिक्त महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे, अतिरिक्त महापालिका आयुक्त विपिन शर्मा तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. (Aided School Teachers)