मुंबईतील आरे कॉलनीत अनधिकृत दर्ग्यावर कारवाई; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
02-Jun-2026
Total Views |
मुंबई : (Aarey Colony) मुंबईतील आरे कॉलनी परिसरात उभारण्यात आलेल्या कथित अनधिकृत दर्ग्याविरोधात बुधवारी राज्य सरकारच्या दुग्ध विकास विभागाने कारवाई केली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दर्गा सरकारी मालकीच्या जमिनीवर अनधिकृतपणे उभारण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. याबाबत प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जमीन आणि बांधकामाची कागदपत्रे तपासण्यात आली. त्यानंतर राज्याच्या दुग्ध विकास विभागाने कारवाईची प्रक्रिया सुरू केली.
#WATCH महाराष्ट्र: प्रशासन द्वारा मुंबई के गोरेगांव स्थित आरे कॉलोनी में एक अनाधिकृत दरगाह के खिलाफ ध्वस्तीकरण अभियान चलाया जा रहा है। pic.twitter.com/hZ0ua9ZImQ
कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) जवानांचीही तैनाती करण्यात आली होती. परिसरातील काही रस्त्यांवर वाहतुकीचे निर्बंध लागू करण्यात आले होते. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
या कारवाईमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत कारवाई शांततेत पूर्ण केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. संबंधित जागेवरील अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया नियमानुसार राबविण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
Mumbai, Maharashtra: Action is being taken against an alleged illegal dargah in Mumbai’s Aarey Colony over encroachment on government land. BMC and police initiated proceedings after notices were ignored and no valid documents were submitted. Authorities say a trust had… pic.twitter.com/M3gmt9e1xP
दरम्यान, या कारवाईवर विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असून, प्रशासनाने कायद्याच्या चौकटीत राहूनच पुढील निर्णय घेतले जातील, असे स्पष्ट केले आहे. सध्या परिसरात पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला असून परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे. (Aarey Colony)