हातात कबाब घेऊन शाकाहारावर व्याख्यान देण्यासारखा राऊत यांचा प्रयत्न - नवनाथ बन
18-Jun-2026
Total Views |
मुंबई (Navnath Ban Criticis Sanjay Raut): "काँग्रेसच्या मांडीवर बसून वंदनीय हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार समजावून सांगण्याचा तुमचा प्रयत्न म्हणजे हातात कबाब घेऊन शाकाहारावर व्याख्यान देण्यासारखं आहे! महाराष्ट्राचा ‘गोलपीठा’ कोणी केला याची चिंता तुम्ही करू नका. जनतेला एवढं मात्र नक्की दिसतं की, विचारांचा बाजार भरला तेव्हा सर्वात जास्त बोली कोणी लावली होती."अशी खरमरीत टीका भाजप प्रदेश प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली आहे. उबाठा खासदार संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना नवनाथ बन यांनी आपल्या एक्स हँडलवरून गुरुवार दि.१९ रोजी ही टीका केली आहे.
"बाळासाहेब म्हणाले होते की प्रामाणिकपणा महत्त्वाचा. म्हणूनच आज जनता विचारते रोज भूमिका बदलणारे, सकाळी एक आणि संध्याकाळी दुसरे बोलणारे प्रामाणिकपणाचं प्रमाणपत्र नेमकं कोणाला देत आहेत?इतिहास भाजपला माफ करेल की नाही याची चिंता तुम्ही करू नका पण इतिहास तुम्हाला ‘काँग्रेसचा प्रवक्ता’ म्हणूनच नोंद घेईल हे विसरू नका." असेही बन म्हणाले आहेत.(Navnath Ban Criticis Sanjay Raut)
उबाठा गटातील पक्षफुटीसाठी भाजप जबाबदार नसून नेतृत्वाचे अपयश कारणीभूत असल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केला. "कार्यकर्ते, आमदार आणि खासदारांना भेटायचे नाही, संवाद साधायचा नाही आणि पक्ष फुटला म्हणून इतरांना दोष द्यायचा, हा प्रकार चालणार नाही. शिवीगाळ करण्यापलीकडे संजय राऊत यांच्याकडे कोणताही राजकीय कार्यक्रम उरलेला नाही." अशी टीका बन यांनी गुरुवार दि.१८ रोजीच्या पत्रकार परिषदेत केली.(Navnath Ban Criticis Sanjay Raut)
संजय राऊत यांनी वापरलेल्या आक्रमक भाषेचा समाचार घेताना नवनाथ बन म्हणाले की, "महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. कुणीही कायदा हातात घेतला तर त्याच्यावर कठोर कारवाई होईल. २०१९ पासून धमक्या आणि तोडफोडीची भाषा करणाऱ्यांनी लोकशाहीची भाषा शिकावी."
"बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेससोबत जाण्यापेक्षा पक्ष बंद करणे पसंत करेन असे स्पष्ट सांगितले होते. मात्र आज त्यांच्याच नावाचा वापर करणारे नेते काँग्रेससोबत सत्तेचा उपभोग घेत आहेत. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार सोयीप्रमाणे वापरणे थांबवावे आणि त्यांचे हिंदुत्व स्वीकारावे."असे आव्हान नवनाथ बन यांनी दिले.(Navnath Ban Criticis Sanjay Raut)
"उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला सांगावे की बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी बेईमानी नेमकी कोणी केली. हिंदुत्वाचा विचार सोडून काँग्रेससोबत जाणाऱ्यांनी बेईमानीवर बोलू नये. महाराष्ट्राने मतदानातून आपला कौल दिला आहे."असे बन म्हणाले. "काँग्रेससोबत जाताना कोणत्या अटींवर तडजोड झाली याचे उत्तर महाराष्ट्राला द्यावे.पैसा नव्हे तर विचार, माणुसकी आणि संवाद यावर पक्ष टिकतो." असेही बन म्हणाले. (Navnath Ban Criticis Sanjay Raut)
"शरद पवार या वयातही राज्यभर फिरतात, मात्र उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जनतेत जात नाहीत." असा आरोप नवनाथ बन यांनी केला. राऊतांच्या राजकीय मर्यादांवरही त्यांनी उपरोधिक टीका केली.
"विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील.विरोधी पक्षांमधील अंतर्गत संघर्षामुळे त्यांची मते फुटतील." असा दावा बन यांनी केला.(Navnath Ban Criticis Sanjay Raut)