मुंबई (Mumbai Airport Matam Vide Controversy): मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात शिया समाजातील काही सदस्य मातम करताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. बुधवारी सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
संबंधित व्हायरल व्हिडिओमध्ये विमानतळाच्या परिसरात काही लोक एकत्र जमून मातम करताना दिसत आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी धार्मिक अभिव्यक्तीची मर्यादा आणि विमानतळासारख्या अतिसुरक्षित ठिकाणी सुरक्षा नियमांची अंमलबजावणी यावर तीव्र चर्चा सुरू झाली आहे.(Mumbai Airport Matam Video Controversy)
A viral video, allegedly from Mumbai International Airport, has sparked major online outrage. In the video, the Shia community can be seen performing Matam at the International Airport. Now Sakal Hindu Samaj claims they are organizing a massive protest this evening at 5 pm. pic.twitter.com/GSniiIFyjQ
— Nationalist - Proud Bharatiya (@NProudBharatiya) June 18, 2026
मातम ही प्रामुख्याने शिया मुस्लिम समाजात पाळली जाणारी शोक व्यक्त करण्याची धार्मिक परंपरा आहे. पैगंबर मोहम्मद यांचे नातू इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सातव्या शतकातील कर्बला युद्धात दिलेल्या बलिदानाच्या स्मरणार्थ अशा प्रकारे दुःख आणि एकात्मता व्यक्त केली जाते. सोशल मीडियावरील अनेक नेटकऱ्यांनी विमानतळ परिसरात अशा प्रकारच्या जमावाला परवानगी कशी देण्यात आली, असा प्रश्न उपस्थित करत अधिक कठोर सुरक्षा उपाययोजनांची मागणी केली. विमानतळासारख्या संवेदनशील ठिकाणी मोठ्या समूहांच्या हालचालींवर काटेकोर देखरेख ठेवली जावी, असे त्यांचे मत होते.(Mumbai Airport Matam Video Controversy)
हा व्हिडिओ अधिकृतरित्या नेमका कोणत्या विमानतळावरचा आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जर मुंबई विमानतळ परिसरातील असेल तर हा प्रकार नेमका कधी घडला, त्यासाठी अधिकृत परवानगी घेण्यात आली होती का, याबाबत अद्याप विमानतळ प्रशासनाने कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण किंवा निवेदन जारी केलेले नाही.(Mumbai Airport Matam Video Controversy)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक