आरोप-प्रत्यारोपांपेक्षा आत्मपरीक्षण गरजेचे; संजय शिरसाट शिरसाट यांचे राऊतांना प्रत्युत्तर

    17-Jun-2026
Total Views |

Sanjay Shirsat
 
मुंबई : (Sanjay Shirsat) "एखाद्या लोकप्रतिनिधींना शिव्या देणं ही काय मस्ती आहे. ज्यांनी अख्ख आयुष्य घातले ज्यांचे केस काळ्याचे पांढरे झाले त्यांच्याबद्दल असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. आपला म्हणून कार्यकर्त्याशी कधीतरी वागावे. जे काही चांगले संबंध स्थापित करायला हवे होते ते केले नाही त्याचा हा परिणाम आहे.
 
इतरांवर खापर फोडण्यापेक्षा उबाठामधील अंतर्गत वादावर त्यांनी बोलावं." अशी प्रतिक्रिया सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी बुधवार दि.१७ रोजी संजय राऊत यांच्या टीकेवर दिली आहे.
 
 
 
"जे खासदार लोकांमधून निवडून आलेले आहेत. त्यांना शिवी देणे ही संजय राऊत यांची योग्यता आहे का? राऊत यांची योग्यता असती तर ते लोकांमधून निवडून आले असते. ज्या आमदारांनी राऊत यांना निवडून दिले त्यांचे विषयी सुद्धा ते शिव्यांची लाखोली वाहत असतात.
 
राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना संपवण्याची सुपारीच घेतली होती.राऊत यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी ईशान्य मुंबई मधून उभे राहावे आणि निवडून येऊन दाखवावे."असे आवाहन शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांना केले आहे.(Sanjay Shirsat)