आमदार सत्यजीत तांबे यांनी मंत्री अशोक उईके यांची भेट घेऊन प्रलंबित मुद्द्यांवर केली चर्चा

    17-Jun-2026
Total Views |
Satyajit Tambe
 
मुंबई : (Satyajit Tambe) आमदार सत्यजीत तांबे यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागाशी संबंधित प्रलंबित विषयांवर तातडीने बैठक आयोजित करण्यात यावी, यासाठी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची मंगळवार दि.१६ रोजी भेट घेतली.
 
या भेटीदरम्यान आदिवासी विकास विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न, अडचणी आणि त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. अधिवेशन कालावधीत यासंदर्भात बैठक घेऊन प्रलंबित विषय मार्गी लावावेत, अशी विनंती यावेळी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली.
 
यावर मंत्री अशोक उईके यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विषयांवर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.(Satyajit Tambe)