गोरेगाव येथे रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या ४३ बांधकामांचे निष्कासन
महानगरपालिकेच्या पी दक्षिण विभागाकडून कारवाई
17-Jun-2026
Total Views |
मुंबई : (Goregaon West) गोरेगाव (पश्चिम ) स्थानकाबाहेरील बंडू गोरे मार्गाच्या रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या ४३ बांधकामांचे महानगरपालिकेच्या पी दक्षिण विभागाकडून आज दि१७ जून रोजी निष्कासन करण्यात आले.
उपआयुक्त (परिमंडळ ४) डॉ. भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक आयुक्त (पी दक्षिण विभाग) अनिरुद्ध कुलकर्णी यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
गोरेगाव पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेरील अत्यंत गजबजलेल्या परिसरातील बंडू गोरे मार्गाचे रुंदीकरण प्रस्तावित आहे. रस्त्याची रुंदी पूर्वी अंदाजे ३० फूट इतकी होती. या महत्त्वपूर्ण कारवाईअंतर्गत एकूण ४३ अनिवासी बांधकामांचे पुनर्वसन करून ती निष्कासित करण्यात आली. त्यामुळे मार्गाची रुंदी ४४ फूटांपर्यंत वाढली आहे. या रुंदीकरणामुळे गोरेगाव पश्चिम रेल्वे स्थानक ते स्वामी विवेकानंद मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.(Goregaon West)