तंत्रशिक्षण संचालनालयाच्या डिजिटल परिवर्तन ‘ई-गव्हर्नन्स’ पुस्तिकेचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

    16-Jun-2026
Total Views |
Chandrakant Patil
 
मुंबई : (Chandrakant Patil) राज्यातील तंत्रशिक्षण क्षेत्रातील प्रशासन अधिक पारदर्शक, कार्यक्षम, उत्तरदायी आणि डेटा-आधारित करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या विविध डिजिटल उपक्रमांची माहिती देणाऱ्या डिजिटल परिवर्तन ‘ई-गव्हर्नन्स’ पुस्तिकेचे प्रकाशन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शासकीय निवासस्थान ‘सिंहगड’ येथे करण्यात आले.
 
यावेळी तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, सहसंचालक डॉ. सुनील भामरे तसेच विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
 
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रशिक्षण संचालनालयाने गेल्या तीन वर्षांत व्यापक डिजिटल परिवर्तनाची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. पारंपरिक कागदाधारित प्रशासनातून पूर्णपणे डिजिटल प्रशासनाकडे वाटचाल करत संचालनालयाने अनेक अभिनव ई-गव्हर्नन्स प्रणाली विकसित केल्या असून राज्यातील शासकीय, अनुदानित आणि खासगी तंत्रशिक्षण संस्थांच्या प्रशासनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे.संचालनालयाच्या विविध डिजिटल प्रणालींचा लाभ राज्यातील ६ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी, सुमारे २,२०० संस्था आणि लाखो विद्यार्थ्यांना होत आहे.
 
तंत्रशिक्षण संचालनालयाच्या या डिजिटल परिवर्तनाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने २०२५ मध्ये “१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम” अंतर्गत राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्रदान केला. त्यानंतर “१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स कार्यक्रम” अंतर्गतही तंत्रशिक्षण संचालनालयाला सलग दुसऱ्यांदा राज्यस्तरीय प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. या दोन्ही स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावणारे तंत्रशिक्षण संचालनालय हे राज्यातील एकमेव कार्यालय ठरले आहे.(Chandrakant Patil)