केडीएमसीतील शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट; टिळकनगर शाळेचा प्रवेशोत्सव

    16-Jun-2026
Total Views |
Tilaknagar Vidya Mandir
 
डोंबिवली : (Tilaknagar Vidya Mandir) नवा वर्ग, नवा‌ बेंच , नवे मित्र यांच्यासह शहरातील शाळांमध्ये सोमवारी पुन्हा किलबिलाट सुरू झाला.
 
१५ जून रोजी शाळा नियमितपणे सुरू झाल्या. शाळेचा पहिला दिवस म्हणजे शाळेचा प्रवेशोत्सवाचा दिवस. या दिवशी टिळकनगर विद्या मंदिरात विद्यार्थ्यांचे औक्षण करून, नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प, शासकीय पुस्तके, शाळेची दिनदर्शिका देण्यात आली.
 
या कार्यक्रमासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण समिती सभापती अभिजीत थरवळ उपस्थित होते. तसेच टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आशीर्वाद बोंद्रे, सदस्य महेश नाईक, आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या पालक प्रतिनिधी पल्लवी पाटील व शाळेचे मुख्याध्यापक नामदेव चौधरी आणि शिक्षक वर्ग उपस्थित होता.
 
हेही वाचा :  ईश्वराच्या कोणत्याही स्वरूपावर श्रद्धा ठेवणारे लोक सांस्कृतिक अर्थाने हिंदूच!; सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन
 
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शाळेचे माजी विद्यार्थी असलेल्या अभिजीत थरवळ यांनी शालेय जीवनातील आठवणीना उजळा दिला आणि विद्यार्थ्यांना पुढील येणाऱ्या वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष आशीर्वाद बोंद्रे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्र संचलन ज्येष्ठ शिक्षिका श्रद्धा जोशी यांनी केले. (Tilaknagar Vidya Mandir)