युद्धावर खेळाचा विजय!

    16-Jun-2026
Total Views |
FIFA World Cup
 
सरावातील प्रत्येक मिनिट मला यातनांसारखं वाटलं; पण मी स्वतःला एकच गोष्ट सांगत राहिलो, माघार घेऊ नकोस. आजचा त्रास सहन कर; म्हणजे आयुष्यभर ‌‘चॅम्पियन‌’ म्हणून जगण्याचा मान तुला मिळेल.” (FIFA World Cup)
 
सर्वकालीन सर्वश्रेष्ठ बॉक्सर मोहम्मद अलीच्या या जगप्रसिद्ध उद्गाराची कधी नव्हे, ती इराणच्या फुटबॉलपटूंना गरज आहे. हार-जीतपेक्षाही इराणी खेळाडूंच्या जिद्दीला सलाम ठोकण्यासाठी क्रीडाजगत्‌‍ सज्ज असेल. (FIFA World Cup)
 
अस म्हणतात की, खेळ हा शांततेचे प्रतीक आहे. खेळ राष्ट्रांच्या सीमा विसरायला लावतो. आता हेच पाहा ना, यंदाच्या फुटबॉलमध्ये भारतीय संघ नाही, तरीही कोट्यवधी भारतीय या खेळांचा आनंद लुटत आहेत. सीमारेषा विसरून संघाना पाठिंबा देत आहेत. असं असलं तरी, इराणच्या संघासाठी मंगळवारी होणारा न्यूझीलंडविरुद्धचा उद्घाटन सामना जगातील सर्वाधिक लक्षवेधी सामना ठरणार आहे. कारण इराणच्या या संघाने मैदानावर येण्यापूवच राजकारण, युद्ध, संशय आणि अस्थिरतेच्या अनेक लढाया लढल्या आहेत. (FIFA World Cup)
 
क्वचितच एखादा संघ इतक्या मोठ्या राजकीय ओझ्याखाली विश्वचषकात उतरला असेल. (FIFA World Cup)
 
ज्या अमेरिकेच्या भूमीवर इराणला विश्वचषक खेळायचा आहे, त्याच देशाशी त्याचे युद्ध सुरू आहे. जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या खेळाच्या मैदानावर पाऊल ठेवण्याआधीच खेळाडूंना व्हिसाच्या अडचणी, सुरक्षेच्या चिंता आणि राजकीय तणावाचा सामना करावा लागला. त्यांचा बेसकॅम्पही बदलावा लागला. (FIFA World Cup)
 
ॲरिझोनातील टक्सन सोडून मेक्सिकोच्या सीमेलगतच्या तिजुआना येथे स्थलांतर करावे लागले. नियोजन विस्कळीत झाले, तयारीला धक्का बसला आणि मानसिक ताण वाढला. (FIFA World Cup)
 
इराणच्या खेळाडूंना चेंडूपेक्षा अधिक काळजी सीमारेषांची, व्हिसाची आणि राजकारणाची करावी लागत असेल, तर त्या खेळाचा आनंद कुठे उरतो? (FIFA World Cup)
 
प्रशिक्षक अमीर घालेनोई यांचे शब्दही अंतर्मुख करणारे आहेत. “फुटबॉलने देश आणि संस्कृती जोडल्या पाहिजेत. आनंद निर्माण केला पाहिजे; पण या परिस्थितीने आमच्या लक्ष्यावर परिणाम झाला आहे.” (FIFA World Cup)
  
ही केवळ एका संघाची व्यथा नाही; हा आधुनिक जगाचा आरसाच आहे. विशेष म्हणजे सामना होणार आहे लॉस एंजेलिसमध्ये, ज्याला अनेकजण प्रेमाने ‌‘तेहरानजेलिस‌’ म्हणतात. इराणबाहेरची सर्वांत मोठी इराणी वस्ती येथे आहे. पण ती एकसंध नाही. अनेक निर्वासित, अनेक राजकीय मतभेद, अनेक जखमा आणि अनेक न सांगितलेल्या कहाण्या त्यांच्यासोबत आहेत. (FIFA World Cup)
 
स्टेडियममध्ये काहीजण इराणला पाठिंबा देतील, तर काही त्याच इराणच्या सत्ताधाऱ्यांविरोधात निदर्शने करतील. काहींच्या हातात राष्ट्रध्वज असेल, तर काहींच्या हातात बंदी घातलेला ‌‘लायन ॲण्ड सन‌’ ध्वज असेल. एका सामन्यात फुटबॉलपेक्षा भावना, इतिहास आणि राजकारण अधिक ठळक दिसेल आणि या सगळ्याच्या मध्यभागी उभे असतील, ते फक्त 11 खेळाडू! (FIFA World Cup)
 
संघातील खेळाडू म्हणतात, “आम्ही प्रत्येक इराणीसाठी खेळतो. आम्ही राजकारण करत नाही.” पण त्यांच्या भोवतीचे जग त्यांना राजकारणापासून दूर राहू देत नाही. (FIFA World Cup)
 
खरं तर, खेळाडूच्या जसवर देशाचे नाव असते, सरकारचे नाही. त्यांच्या पायात बूट असतात, बंदुका नाहीत. त्यांच्या हातात चेंडू असतो, तोफगोळा नाही. तरीही, अनेकदा त्यांनाच इतिहासाची किंमत चुकवावी लागते. (FIFA World Cup)
 
या विश्वचषकात इराण जिंकला किंवा हरला, गुणतालिकेत त्याचे स्थान काय राहिले, यापेक्षा एक प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो, ‌‘या खेळाडूंना कधी फक्त ‌‘फुटबॉलपटू‌’ म्हणून जगता येईल का?‌’ (FIFA World Cup)
 
कारण काही वेळा सर्वांत मोठा पराभव मैदानावर होत नाही; तो राजकारणाच्या सावलीत होतो. (FIFA World Cup)
 
आणि काही वेळा सर्वांत मोठा विजय चषक उंचावण्यात नसतो. तो अशा परिस्थितीतही मैदानावर उतरून आपल्या देशातील आणि जगभरातील कोट्यवधी लोकांच्या चेहऱ्यावर काही क्षणांसाठी तरी आनंद आणण्यात असतो. (FIFA World Cup)
 
ऑलिम्पिकचा जनक बॅरेन पिअर द कुबर्तिन म्हणतो तेच खरे, हार-जीतपेक्षाही महत्त्वाचे असते, ती तुम्ही लढत कशी दिली, ते! या कसोटीवर इराणच्या संघाला पैकीच्या पैकी गुण द्यायला काहीच हरकत नाही! (FIFA World Cup)