पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून लूटमार
स्थानिकांकडून लष्करप्रमुख मुनीर यांची जनरल डायरशी तुलना
15-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली : (Pakistan Army) पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, तेथील स्थानिक दुकानांमध्ये आणि घरांमध्ये पाकिस्तानी लष्कराकडून मोठ्या प्रमाणावर लूटमार केली जात आहे. स्वस्त अन्नधान्य, वीज आणि मूलभूत हक्कांची मागणी करणार्या निःशस्त्र नागरिकांवर पाकिस्तानी लष्कर आणि रेंजर्सनी अमानुष अत्याचार सुरू केले आहेत. रावलकोट आणि कोटलीसारख्या प्रमुख शहरांमध्ये पाकिस्तानी सैनिक व्यापार्यांच्या दुकानांमध्ये घुसून सामान लुटत असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. यामुळे स्थानिक आणि व्यापार्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.
वाढत्या महागाईविरोधात ईदगाह मैदानावर शांततेत जमलेल्या सुमारे ६० ते ७० हजार आंदोलकांवर पाकिस्तानी लष्कराने थेट गोळीबार केला. गेल्या काही दिवसांत या दडपशाहीत ५३ हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. पाकिस्तानी रेंजर्सने क्रूरतेची सीमा ओलांडत कोटली येथील रुग्णालयांवर आणि जखमींवर उपचार करणार्या दवाखान्यांवरही गोळीबार केला आहे. या सगळ्या घटनांमुळे पाकिस्तानी सरकार आणि लष्कराविरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.(Pakistan Army)
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या आदेशावरून हा नरसंहार सुरू असल्याने स्थानिकांनी त्यांची तुलना थेट ‘जनरल डायर’शी केली आहे. ‘आवामी अॅक्शन कमिट’ने पाकिस्तान सरकारकडून चर्चेचा प्रस्ताव नाकारल्यानंतर परिस्थिती आणखी चिघळली आहे. आंदोलन दडपण्यासाठी पाकिस्तान सरकारने ‘आवामी अॅक्शन कमिटी’च्या प्रमुख नेत्यांवर एकेक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच संपूर्ण ‘पीओके’मध्ये इंटरनेट आणि मोबाईल सेवा पूर्णपणे खंडित करण्यात आली आहे.(Pakistan Army)