सांस्कृतिक दहशतवाद हा शब्द फक्त जैन व हिंदू समाजाबद्दलच का काढला जातो - नितेश राणे
15-Jun-2026
Total Views |
मुंबई : (Nitesh Rane) "सांस्कृतिक दहशतवाद हा शब्द फक्त जैन व हिंदू समाजाबद्दलच का काढला जातो.गेल्याच महिन्यात बकरी ईद सण झाला तेव्हा रस्त्यावरच्या नमाजावर का आक्षेप घेतला नाही.कधी मनसे व उबाठाच्या लोकांना बैरामपाडा व नळबझार,मुंब्रामध्ये आंदोलन करताना आम्ही तर बघीतलेले नाही.भोंगे बंद करण्याच काम हे महायुतीच्या सरकारने केलेले आहे.कुणाच्या आंदोलनामुळे न्हवे तर हिंदुत्ववादी सरकारच्या विचारांमुळे भोंगे बंद झाले आहेत.
पट्टे काढायची एवढीच हींम्मत असेल तर मोहम्मद अली रोडवरचे हिरवे पट्टे काढा.आमच्या सरकारने रस्त्यावरचे नमाज बंद करून दाखवले.फक्त हिंदूंच्या विरोधात वारंवार कोण आवाज उठवत असेल तर सरकार म्हणून त्याची नोंद घ्यावी लागेल." अशी प्रतिक्रीया मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सोमवार दि.१५ रोजी सिंधुदुर्गात माध्यमांसमोर बोलताना दिली.(Nitesh Rane)
"उबाठाच्या बैठकीस मोजून तीनच खासदार आले होते.
संजय पाटील शेवटच्या पाचंच मिनीटात आले होते.बाकीचे ऑनलाईनच्या नावावर आऊट ऑफ नेटवर्क होते.फक्त तीन खासदारांच्या समोर उबाठा प्रमुखांनी वल्गना करू नये.आता त्यांच्यावर हम दो हमारे दो चीच वेळ आलेली आहे.आम्हाला कुणाला ऑपरेशन टायगर ऑपरेशन लोटस करण्याची गरजच नाही आहे.त्यांच्याच लोकप्रतिनिधींना त्यांच्याजवळ रहायच नसेल,प्रत्येकाला पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस य़ांच्या नेत़ृत्वात काम करायच असेल तर त्यांना तुम्ही बांधून ठेऊ शकत नाही.त्या यादीत संजय राऊत यांचेही नाव आहे असेही माझ्या कानावर आले आहे." असेही राणे म्हणाले.
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगल्या पध्दतीने अर्थ खात सांभाळत आहेत.प्रत्येक विरोधकास पण वाटते की याच व्यक्तीने राज्याचे नेतृत्व पण कराव व अर्थ खाते पण सांभाळावे.रोहित पवारांना खाण्याचा प्रचंड शौक आहे.कदाचित त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना डाएट प्लॅन दिला असेल, म्हणून दोन दिवस झाले तरी ते बारीक होताना दिसत नाहीत.आणि राज्यात आमच्या सरकारने शेतऱकऱ्यांना कर्जमाफी दिलेली आहे." असे प्रतिपादन राणे यांनी केले.(Nitesh Rane)