महिला प्राध्यापकांच्या नेतृत्व विकासासाठी ‘नारीदृष्टी’ उपक्रम महत्त्वपूर्ण: उच्च शिक्षणात महिलांनी प्रशासकीय व संशोधन क्षेत्रात पुढे यावे - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील
15-Jun-2026
Total Views |
मुंबई : (Chandrakant Dada Patil) "उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांनी आता केवळ अध्यापनापुरते मर्यादित न राहता संशोधन, प्रशासन, शैक्षणिक धोरण निर्मिती आणि संस्थात्मक नेतृत्व या क्षेत्रांतही सक्रिय पुढाकार घेऊन महिलांनी या क्षेत्रात पुढे यावे. ‘नारीदृष्टी’सारखे उपक्रम महिला प्राध्यापकांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यास आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठे परिवर्तन घडविण्यास निश्चितच उपयुक्त ठरतील."असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था , पुणे यांच्या वतीने ‘नारीदृष्टी’ या विशेष पाच दिवसीय निवासी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सोमवार दि.१५ रोजी करण्यात आले.
या कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, सहसचिव संतोष खोरगडे, सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे तसेच विविध क्षेत्रांतील महिला, विद्यार्थी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा : जनतेच्या विश्वासाला आम्ही तसूभरही तडा जाऊ देणार नाही; विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी आ. प्रवीण दरेकरांचे प्रतिपादन
या पाच दिवसीय निवासी कार्यक्रमामध्ये राज्यातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील महिला प्राध्यापक सहभागी झाल्या आहेत. या कालावधीत महिला प्राध्यापकांसाठी खालील महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञांद्वारे विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे.यावेळी'नारीदृष्टी' या महिला नेतृत्व विकास कार्यक्रमासह अजून तीन अध्यापक विकास कार्यक्रमांचे एकाचवेळ उद्घाटन करण्यात आले.(Chandrakant Dada Patil)
यावेळी डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्थेचे कुलपती डॉ. भूषण पटवर्धन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, सी ओ इ पी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा. डॉ. सुनील भिरुड तसेच एच एस एन सी विद्यापीठ, मुंबईच्या कुलगुरू कर्नल प्रा. हेमलता बागला उपस्थित होते.(Chandrakant Dada Patil)