अभिजीत दीपकेला मारहाण, दोन युवकांचा अचानक हल्ला! कोण होते हल्लेखोर? नेमकं काय घडलं?

    15-Jun-2026
Total Views |
Cockroach Janata Party
 
जयपूर : (Cockroach Janata Party) कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यावर अचानक हल्ला झाला. जमावातून दोन युवकांनी येऊन त्यांच्या कानाखाली थप्पड मारली. अभिजीत दीपके हे सध्या नीट पेपरफुटी प्रकरणात देशभर आंदोलने करत आहेत. जयपूरमध्ये त्यांचे आंदोलन सुरू होते, त्यावेळी त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. दीपके यांचे आंदोलन सुरू असताना अचानक त्यांच्यावर झालेल्या या हल्ल्याचा प्रतिकार म्हणून कॉक्रोज जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्लेखोरांना मारहाण केली.
 
 
 
अभिजीत दीपके यांना आपल्या खांद्यावर घेऊन कार्यकर्ते आंदोलकांमध्ये घेऊन जात होते. तेव्हाच दोघांनी त्यांच्या कानाखाली मारली. या प्रकारानंतर दीपके यांनी उपस्थितांना संबोधित केले. मारहाण झाल्यानंतर अचानक उपस्थितांमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला. मारहाण करणाऱ्यांपैकी एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र, दुसऱ्या युवकाला जमावाने पकडले. 
 

pic.twitter.com/ZY8zn70CXu

— Rimjhim Jethani (@RimjhimJethani1) June 15, 2026 "> 

 
जयपूरमध्ये सुरू असलेल्या या आंदोलनात घोषणाबाजी सुरू होती. या प्रकारात पोलीसांना दखल घेत आंदोलकांना शांत करावे लागले. तसेच एकाला अटकही करण्यात आली. गर्दीत अनेकांचे मोबाईल फोनही चोरी झाल्याच्या बातम्या आहेत.
 
 
 
यानंतर मंचावरुन स्वतःच्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. “मला माझ्या देशाबद्दल प्रेम आहे मात्र, भ्रष्टाचार बंद करा. पेपर लीक करणे बंद करा, ” अशी पोस्टरबाजी करण्यात आली.(Cockroach Janata Party)