कल्याण : (Kalyan Cricket Tournament) दिवंगत विशाल भोईर 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी तर 12 वर्षांखालील दिवंगत अरविंद धाक्रस स्मृती क्रिकेट स्पर्धेत जितेंद्र आव्हाड क्रिकेट इन्स्टिट्यूट ने विजेतेपद पटकावले.
दोन्ही स्पर्धा अ व ब अशा दोन गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती. गट ‘अ’ मधील दिवंगत विशाल भोईर क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी, कल्याण आणि सनराईज क्रिकेट अकॅडमी, पालघर यांच्यात झाला तर ब गटात दिवंगत अरविंद धाक्रस स्मृती लिटिल चॅम्प्स टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जितेंद्र आव्हाड क्रिकेट इन्स्टिट्यूट, कलवा आणि डिवाइन क्रिकेट अकॅडमी, उल्हासनगर यांच्यात सामना रंगला.(Kalyan Cricket Tournament)
स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कार पुढीलप्रमाणे देण्यात आले :
मॅन ऑफ द मॅच – आरव सिंग(जितेंद्र आव्हाड क्रिकेट इन्स्टिट्यूट)
उत्कृष्ट फलंदाज – कनिष्क साळुंखे (जितेंद्र आव्हाड क्रिकेट इन्स्टिट्यूट)
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – आरव सिंग
मॅन ऑफ द सिरीज – आरव सिंग
पारितोषिक वितरण समारंभास नगरसेवक संकेश भोईर, प्रशिक्षक वीरेश तावडे, उमेश काळे, कामगार सेनेचे राकेश पाटील
अकॅडमीचे सचिव संतोष पाठक आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अकॅडमीचे प्रशिक्षक परेश हिंदुराव, मुकेश चव्हाण, प्रशांत कोरी, मंगेश ब्रीड यांचे मोलाचे योगदान लाभले.(Kalyan Cricket Tournament)