विद्यार्थी मैत्री उपक्रमांतर्गत गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप; श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचा उपक्रम
14-Jun-2026
Total Views |
मुंबई : (Siddhivinayak Ganapati Temple Trust) श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या वतीने आयोजित “विद्यार्थी मैत्री” उपक्रमांतर्गत गरजवंत विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य व पुस्तकांचे वितरण करण्यात आले. या प्रेरणादायी उपक्रमात ट्रस्टचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी सहभागी होऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
यावेळी न्यासाचे विश्वस्त महेश मुदलियार, मीना कांबळी, कार्यकारी अधिकारी वीणा पाटील तसेच उपकार्यकारी अधिकारी डॉ. संदीप राठोड उपस्थित होते.
या उपक्रमाची माहिती आचार्य पवन त्रिपाठी यांनी आपल्या एक्स हँडलवरून शनिवार दि.१३ रोजी प्रसारित केली आहे.(Siddhivinayak Ganapati Temple Trust)