जनतेच्या विश्वासाला आम्ही तसूभरही तडा जाऊ देणार नाही; विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी आ. प्रवीण दरेकरांचे प्रतिपादन
14-Jun-2026
Total Views |
मुंबई : (Mumbai Municipal Corporation) आज मुंबई बदलतेय. अनेक विषय सहजगत्या मार्गी लावत आहोत. याचे कारण जनतेने टाकलेला विश्वास आहे. जनतेने भाजपावर केंद्रात, राज्यात, मुंबई महापालिकेत विश्वास टाकला. त्या विश्वासाला भाजपा व आम्ही तसूभरही तडा जाऊ देणार नाही, असे प्रतिपादन भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले.
केंद्रीय मंत्री व उत्तर मुंबईचे लोकप्रिय खासदार पियुष गोयल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार प्रवीण दरेकर यांच्या विकास निधीतून साकारण्यात आलेल्या वॉर्ड क्रमांक ३ मधील गणू बुवा कंपाऊंड येथील सभामंडप, वॉर्ड क्रमांक ४ मधील चित्रकूट सोसायटी येथील पेवर ब्लॉक बसविणे, वॉर्ड क्रमांक ५ मधील संभाजीनगर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे व शंखेश्वर नगर येथील उद्यानाचे सुशोभीकरण या विकास कामांचे उदघाटन आज पार पडले.
याप्रसंगी प्रभाग समिती अध्यक्ष व नगरसेवक प्रकाश दरेकर, मागाठाणे विधानसभेचे संयोजक कृष्णकांत दरेकर, मंडळ अध्यक्ष अमित उतेकर, मंडळ अध्यक्ष सुमित घाग, महामंत्री संजय घाडी, महिला मोर्चा अध्यक्षा प्रियंका रेडकर, ललित शुक्ला, रवी जुवळे, माजी नगरसेवक अशोक नर, वॉर्ड अध्यक्ष निकेश तळेकर, वॉर्ड अध्यक्ष सुरज नावडकर, महिला वॉर्ड अध्यक्षा मृदुला पवार, सुवर्णा सकपाळ, साजिदा शेख, आदित्य गायकवाड, युवा मोर्चा अध्यक्ष विनायक राजेशिर्के, युवा मोर्चा वॉर्ड अध्यक्ष तेजस माने, मंडळ महामंत्री छाया कोळबे, मंडळ उपाध्यक्षा मीरा वाघेला, गणू बुवा कंपाऊंडचे अध्यक्ष गणेश चिंदरकर, सचिव साजिद मुजावर, दिनेश देसाई, प्रवीण कांबळे, सल्लागार बाबुराव दहिभाते, विवेक राऊत, दीपक कदम, सुरेश कदम, चित्रकूट सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र कोंडुस्कर, सचिव प्रशांत महाडिक, संतोष दळवी, पंकज रावराणे, पंढरीनाथ पालकर, अविनाश पाठक, सरपंच जयेश नर, वैभव नर, संभाजीनगर येथील शांताराम सावंत, सोपान मरे, दिनेश लखमते, किरण जाधव, केशव नारकर, परशुराम घाडी, योगेश सोनावणे, गणेश आव्हाड, आनंद मोरे, तुषार घाडी, तिलक यादव, शंखेश्वर नगर येथील अध्यक्ष साळवी, सचिव रमेश घाडीगावकर, नितीन भोसले, राजू कलपकर, कुपेकर यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. (Mumbai Municipal Corporation)
गणू बुवा कंपाऊंड येथे सभा मंडपाचे उद्घाटन केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना आमदार दरेकर म्हणाले की, कंपाऊड माझ्यासाठी मी कधीच विसरणार नाही. ज्यावेळी मनसेची स्थापना झाली त्यावेळी सर्वाधिक पाठबळ देणारे गणू बुवा कंपाऊंड होते. विधानसभा निवडणुकीतही जास्तीचे मतदान गणू बुवा कंपाउंड मधून झाले होते. दिवसापासून या- ना त्या कारणाने ही सर्व लोकं माझ्याशी जोडली गेली आहेत.
त्यांच्याच आशीर्वादाने मी आमदार झालो आणि इथपर्यंत प्रवास केला. पुन्हा एकदा या केतकीपाड्याला महानगरपालिकेच्या माध्यमातून आणखी चांगले वैभवाचे दिवस आले पाहिजेत ही भूमिका घेऊन प्रकाश दरेकर यांनी प्रभाग क्रमांक ५ मध्ये काम केले होते. त्यांना प्रभाग क्रमांक ५ मधून निवडणूक ही लढवायची होती. परंतु नियतीच्या मनात असेल की एखादा चांगला माणूस देऊन आमची सेवा करावी म्हणून ते या प्रभाग क्रमांक ३ चे नगरसेवक झाले. कामाची चिंता करू नका.
महानगरपालिका, राज्य सरकार आपले आहे. केंद्रात खासदार पियुष गोयल मंत्री आहेत. त्यामुळे जास्तीचा निधी, जास्तीची कामे आपण झोपडपट्टी विभागातच करणार आहोत त्यात प्राधान्याने केतकी पाडा, गणू बुवा कंपाउंडही असेल, असा विश्वास दरेकरांनी व्यक्त केला. (Mumbai Municipal Corporation)
दरेकर पुढे म्हणाले की, भाजपाचा सेवा हाच धर्म आहे. खासदार पियुष गोयल यांच्या वाढदिवसानिमित्त जनतेला विकास कामे द्यावी, त्याचा लोकांना उपयोग व्हावा या भावनेतून आजचा लोकार्पणाचा कार्यक्रम होत आहे. कारण या राज्यातील, देशातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवला. पियुष गोयल यांना खासदार केले. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवला व सरकार आले.
मोठ्या प्रमाणावर निधी आणून आपण कामे करतोय. महानगरपालिकेतही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महापालिका ही मुंबईकरांनी महायुतीच्या ताब्यात दिली. त्यामुळे जनतेची सेवा करणे हे आमचे कर्तव्य आहे. येथील एसआरएचा प्रकल्प का थांबलाय, त्याची काय स्थिती आहे याबाबत स्थानिकांनी माहिती द्यावी. एसआरएचा प्रकल्प लवकर मार्गी कसा लागेल यासाठी प्रयत्न करू, असेही दरेकरांनी यावेळी आश्वस्थ केले.
पंतप्रधान मोदींनी देशाची अर्थव्यवस्था संतुलित ठेवली
दरेकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या कार्यकाळात देशाला बारा वर्षात प्रगतिकडे नेले. जे गेली ४०-५० वर्षात झाली नाही ते बारा वर्षाच्या कालावधीत पंतप्रधान मोदींच्या माध्यमातून झाले. आज आपला देश जगात अर्थव्यवस्थेत चौथ्या क्रमांकावर आहे. युद्धामुळे जगातील सर्व देशांची अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे. परंतु आपल्या देशाची अर्थव्यवस्था संतुलित ठेवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. अशा प्रकारचा नेता आज बारा वर्षे पूर्ण करत असल्याचे दरेकर म्हणाले. (Mumbai Municipal Corporation)