सोमवार दि.१५ रोजी मुंबईभर शाळकरी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव; शिक्षक कार्यकर्त्यांकडून होणार उत्साह, आनंद आणि कृतज्ञतेने साजरा
14-Jun-2026
Total Views |
मुंबई : (Student Motivation) मुंबईत सोमवार दि.१५ रोजी नवीन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ होत असून, महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या अखत्यारितील शाळा सुरू होत आहेत. या निमित्ताने विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे स्वागत करण्यासाठी मुंबईतील शिक्षक कार्यकर्त्यांनी विशेष तयारी केली आहे.
या प्रवेशोत्सवात मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अमीत साटम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शाळांमध्ये शिक्षक कार्यकर्ते विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. त्यांच्या प्रेरणेतूनच या उपक्रमाला व्यापक स्वरूप मिळाले असून, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, चॉकलेट-मिठाई वितरण, तसेच पर्यावरण पदयात्रा यांसारखे उपक्रम राबविले जाणार आहेत.
आ. अमीत साटम यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “शिक्षण हेच समाजाच्या प्रगतीचे खरे साधन आहे. विद्यार्थ्यांना योग्य वातावरण, प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळाले तर ते भविष्यात सक्षम नागरिक बनतील. प्रवेशोत्सवासारखे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी उत्साह निर्माण करतात आणि शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील नाते अधिक दृढ करतात.”(Student Motivation)
मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये हा विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडणार असून, विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिक्षक कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.(Student Motivation)
या कार्यक्रमाला निवडक ठिकाणी ची प्रमुख उपस्थिती लाभलेल्या मुंबई शिक्षक नेते डॉ विशाल कडणे यांनी सांगितले की, “आ. अमीत साटम यांच्या मार्गदर्शनामुळे हा उपक्रम अधिक उत्साहाने व प्रभावीपणे राबविता येत आहे. प्रवेशोत्सव हा केवळ स्वागताचा कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी उत्साह निर्माण करण्याचा आणि शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील नाते अधिक दृढ करण्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.”
सदर कार्यक्रमास सिद्धिविनायक न्यासाचे कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी, शिक्षण समिती अध्यक्षा राजश्री शिरवडकर, नगरसेवक प्रतीक करपे, दैनिक मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. या मान्यवरांचे मार्गदर्शन आणि सहकार्याबद्दल शिक्षक कार्यकर्त्यांकडून मनःपूर्वक आभार मानण्यात येत आहेत.(Student Motivation)