मातोश्रीवरील उबाठाच्या बैठकीस काही खासदार नॉट रिचेबल,तर काही ऑनलाईन,काही ऑफलाईन
14-Jun-2026
Total Views |
मुंबई : (Matoshree Meeting) उध्दव ठाकरेंनी रविवार दि.१४ रोजी आपल्या पक्षाच्या खासदारांसाठीच्या बोलावलेल्या मातोश्रीवरील बैठकीस काही खासदार नॉट रिचेबल,तर काही ऑनलाईन,काही ऑफलाईन उपस्थित तर काही अनुपस्थित होते.या बैठकीस उबाठाचे खासदार संजय जाधव,भाऊसाहेब वाकचौरे हे काही काळ नॉटरीचेबल व बैठकीस अनुपस्थित होते.पण बैठकीस नसलेल्या खासदार संजय जाधव यांनी परभणीच्या धोंडे कार्यक्रमास मात्र उपस्थिती लावली होती.मागील एका बैठकीस देखील जाधव अनुपस्थित होते.ओमराजे निंबाळकर हे आपल्या मुलाच्या तब्येतीच्या कारणाने अनुपस्थित होते.
तर नागेश पाटील अष्टीकर व संजय देशमुख यांनी ऑनलाईन उपस्थिती लावली.तर अनिल देसाई,अरविंद सावंत,राजाभाऊ वाजे व संजय दिना पाटील हे चार खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते.उबाठाचे एकूण नऊ खासदार आहेत.नऊ पैकी किती खासदार उपस्थित राहतात याची जोरदार चर्चा होती.पण ९ पैकी ५ खासदार ऑनलाईन आणि ४ खासदार प्रत्यक्ष बैठकीस उपस्थित होते असा दावा उबाठाने केला आहे.
सध्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर सुरू केले आहे,ज्यानुसार उबाठाचे काही खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत येणार अशी चर्चा असताना आजच्या बैठकीस महत्व प्राप्त झाले होते. बैठकीस वेळाने पोहोचलेले खासदार संजय पाटील माध्यमांसमोर बोलताना म्हणाले की, “काम करताना तक्रार तर असतेच अगदी घरी नवरा बायको मध्ये पण तक्रारी असतात.जे व्हायच आहे ते होईलच.कोण समाधानी आहे की नाही याबाबत मी कस सांगणार.ज्याला तक्रार असेल तो सार्वजनिकरीत्या थोडीच सांगणार.”
पुढील महिन्यात पुन्हा अशी बैठक घेतली जाणार आहे अशी देखील चर्चा आहे.
या बैठकीवर प्रतिक्रीया देताना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले की,"कधी कार्यकर्त्यांसोबत न बोलण कधी त्यांच्या कामाला न येणे ही उद्धव ठाकरेंची खासीयत आहे." (Matoshree Meeting)