तिथीनुसार शिवराज्याभिषेकासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे : मंत्री भरत गोगावले

    14-Jun-2026   
Total Views |
Shivrajyabhishek Ceremony
 
महाड : (Shivrajyabhishek Ceremony) दुर्गराज रायगडावर २७ जून रोजी तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सज्ज राहून शिवभक्तांना आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश राज्याचे मंत्री भरत (शेठ) गोगावले यांनी दिले.
 
महाड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेत विविध विभागांना आवश्यक सूचना केल्या. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने शिवभक्त रायगडावर दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा, आरोग्य आणि मूलभूत सुविधांवर विशेष भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
 
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मंडप व्यवस्था, भोजन, अखंडित वीजपुरवठा, शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छता तसेच पुरेशा शौचालय सुविधांची वेळेत पूर्तता करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
 
तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी चोवीस तास वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, स्ट्रेचर, आवश्यक औषधसाठा तसेच संभाव्य सर्पदंशाच्या घटनांसाठी आवश्यक उपचार साहित्य रायगड आणि पाचाड परिसरात उपलब्ध ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला.
 
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या नियोजनासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून प्रत्येक कामाचा नियमित आढावा घेतला जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.(Shivrajyabhishek Ceremony)
 
या बैठकीला महाड पंचायत समितीच्या सभापती प्रेरणा सावंत, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे, उपजिल्हाधिकारी डॉ. रविंद्र शेळके यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती रायगड आणि कोकणकडा मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.(Shivrajyabhishek Ceremony)
 
 




सागर देवरे

सागर देवरे, सामाजिक न्याय प्रतिनिधी, दैनिक मुंबई तरुण भारत.
शिक्षण : बी.ए. एल.एल.बी. (अभ्यासक्रम सुरू).
सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून विविध सामाजिक, शैक्षणिक व अन्य चळवळींवर वृत्तांकनाचा अनुभव.
समुदायाधारित प्रश्नांवर सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन.
सामाजिक न्याय, हिंदू बहुजन समाजाचे प्रश्न व विद्यार्थी चळवळींवर विशेष लेखन.