रोहित पवार यांनी स्टंटबाजी त्याग आंदोलन करावे - नवनाथ बन
13-Jun-2026
Total Views |
मुंबई : (Navnath Ban) "रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलनापेक्षा “स्टंटबाजी त्याग आंदोलन” करावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली असताना, त्यांच स्वागत करण्याऐवजी रोहित पवार प्रसिद्धी मिळवण्यासाठी आंदोलनाचा देखावा करत आहेत."असा टोला भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवार दि.१२ रोजी आपल्या एक्स हँडलवरून लगावला आहे.
"पंढरपुरात आंदोलनाभोवती पडदा लावला असेल, पण रोहित पवारांच्या ‘स्टंटबाजी’वरचा ‘पडदा’महाराष्ट्रातील जनतेने केव्हाच टराटरा फाडला. शेतकऱ्यांना स्टंटबाजी,फोटोसेशन, नौटंकी नाहीतर निर्णय हवे असतात. सरकार निर्णय घेत आहे, तर रोहित पवार ‘स्टंटबाजी’ करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांनी अन्नत्याग आंदोलनापेक्षा “स्टंटबाजी त्याग आंदोलन” करावे." असेही बन यांनी रोहित पवार यांना सुनावले आहे.(Navnath Ban)