मुंबई (Sion Hospital Waste Crisis) : आधुनिक कचरा व्यवस्थापनासाठी बसविण्यात आलेली हायड्रॉलिक कचरापेटी प्रणाली बंद पडल्याने सायन रुग्णालयाच्या कचरा साठवणुकीच्या अडचणीत भर पडली आहे. त्यातच त्यातील कचराडबेही तुटल्याने संपूर्ण यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत सायन रुग्णालय अधिष्ठाता डॉ प्रमोद इंगळे यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.
सायन रुग्णालय परिसरात काही महिन्यांपूर्वी भूमिगत हायड्रॉलिक कचरापेटी प्रणाली बसविण्यात आली होती. या यंत्रणेच्या माध्यमातून भूमिगत डबे हायड्रॉलिक यंत्रणेद्वारे वर उचलून त्यातील कचरा विशेष वाहनात रिकामा करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच या प्रणालीतील डबे आणि त्यांची चाके निकामी झाल्याने संपूर्ण व्यवस्था ठप्प झाली आहे.(Sion Hospital Waste Crisis)
यंत्रणा सुरू झाल्यानंतर सुरुवातीला काही दिवस सुरळीतपणे कार्यरत होती. मात्र त्यानंतर वारंवार बिघाड होऊ लागले. दुरुस्ती केल्यानंतरही दोन ते चार दिवसांत यंत्रणा पुन्हा बंद पडत होती. सध्या हायड्रॉलिक यंत्रणा कार्यक्षम नसून आतील डब्यांची ही स्थिती वापरण्यायोग्य नसल्याने तिचा कोणताही उपयोग होत नसून त्यांची दुरुस्ती होत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.(Sion Hospital Waste Crisis)
यंत्रणा बंद असल्याने सफाई कर्मचाऱ्यांना पर्यायी पद्धतीने कचरा हाताळावा लागत आहे. यंत्रणा बंद पडल्याने त्या डबे ठेवणे शक्य नसल्याने तेथेच घाण टाकली जात आहे. डबे उपलब्ध आहेत मात्र त्यांची ही दुरावस्था झालेली आहे. कचरा साठवणूक आणि त्याची विल्हेवाट लावणे अधिक किचकट बनले आहे. विशेष कचरा वाहतूक वाहनांनाही डबे उचलताना अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले. परिणामी परिसरात कचरा साचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.(Sion Hospital Waste Crisis)
जागा अडवून यंत्रणा निष्क्रिय
सध्या ही व्यवस्था केवळ जागा अडवून ठेवत आहे. डबे निकामी झाल्याने हायड्रॉलिक यंत्रणेचा मूळ उद्देशच फोल ठरला आहे. रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी कचरा व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असताना यंत्रणा बंद पडल्याने स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित यंत्रणेची तातडीने दुरुस्ती करून ती पुन्हा कार्यान्वित करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.(Sion Hospital Waste Crisis)
याबाबत सायन रुग्णालय अधिष्ठाता डॉ प्रमोद इंगळे यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही(Sion Hospital Waste Crisis)