उत्तर आयर्लंडमध्ये सध्या भयंकर दंगल सुरू आहे. घरांची तोडफोड, आग लावणे, वाहन पेटवणे असा सगळा उत्पात सुरू आहे. या दंगलीचे लोण अगदी लंडनपर्यंत पोहोचले. संपूर्ण युनायटेड किंगडम या आगीत होरपळण्याची चिन्हे आहेत. कारण, उत्तर आयर्लंडमध्ये दि. ८ जून रोजी बेलफास्टमध्ये स्टीफन ओगिल्वी नावाच्या स्थानिक नागरिकावर सुदानच्या हादी अलोदिद (३० वर्षे) या निर्वासिताने चाकूने हल्ला केला. सुदानमधून आलेल्या या मुस्लीम व्यक्तीने स्थानिक श्वेतवर्णीय ख्रिस्ती व्यक्तीवर हल्ला केल्याने या दंगलीला ‘स्थानिक विरुद्ध बाहेरचे’ असे स्वरूप प्राप्त झाले.
असे का झाले असेल? तर, हादी अलोदिदने स्वयंपाक घरात मांस कापण्यासाठी वापरल्या जाणार्या मोठ्या चाकूने स्टीफनवर हल्ला केला. पाठीवर, मानेवर अत्यंत वेगाने हल्ला केल्यानंतर स्टीफन कोसळला. तेव्हा तो स्टीफनच्या छातीवर बसला. हादीने त्याच्या डोळ्यात चाकू खुपसला, मानेवर चाकूने वार केले. त्याचे मन भरले नाही, तर ‘सर तन से जुदा’ पद्धतीने तो स्टीफनचा गळा कापू लागला. आजूबाजूला शेकडो लोक होते. पण, त्याची ती राक्षसी वृत्ती बघून कुणालाही स्टीफनला वाचवण्यासाठी पुढे येण्याचे धैर्य झाले नाही. कारण, हादी सगळ्यांना ओरडून सांगत होता की, जो कुणी मधे येईल, त्याला तो सोडणार नाही. शेकडो लोक भयाने जागच्या जागी थिजले होते. मात्र, एका महिलेने हे दृश्य घरातून पाहिले आणि तिने पोलिसांशी मोबाईलवरून संपर्क साधला. पोलीस आणि बचावकर्मी आले, त्यांनी या हल्लेखोराला पकडले. गंभीर परिस्थितीमध्ये असलेल्या स्टीफनला रुग्णालयात नेले. या कालावधीमध्ये हादी त्याच्या अंगाला लागलेले रक्त चाटत होता. या सगळ्या भयानक घटनेचे कुणीतरी व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वार्याच्या गतीने पसरला.
हल्लेखोर हादी सुदानचा नागरिक होता आणि तो उत्तर आयर्लंडमध्ये काही वर्षांपासून राहतो हे कळताच, स्थानिक नागरिकांचा रोष अनावर झाला. त्यांनी उत्तर आयर्लंड परिसरात राहणार्या निर्वासित लोकांच्या निवासस्थानांवर हल्ले केले. हा हल्ला दहशतवादी होता आणि ख्रिश्चन व्यक्तीला लक्ष्य केले, असे त्यांचे म्हणणे होते. संतापलेल्या नागरिकांनी जाळपोळ, तोडफोड केली. बघता-बघता ही दंगल युनायटेड किंगडमच्या अंतर्गत असलेल्या अन्य तीन देशांमध्ये म्हणजे लंडन, स्कॉटलंड, वेल्समध्येही उसळली. निर्वासित मुस्लीम किंवा जे देशाबाहेरून आलेले लोक होते, त्यांच्यावर इथे हल्ले सुरू झाले.
मागेही अशाच प्रकारची दंगल उत्तरी आयर्लंडमध्ये उसळली होती. दि. २९ जुलै २०२४ रोजी इंग्लंडमधील ‘साऊथपोर्ट’ नावाच्या शहरात लहान मुलांच्या एका डान्स क्लासवर एका १७ वर्षीय मुलाने चाकूने भीषण हल्ला केला होता. या दुर्दैवी हल्ल्यात तीन लहान मुलींचा मृत्यू झाला आणि अनेकजण गंभीर जखमी झाले होते. त्यावेळी हल्लेखोर मुस्लीमच असणार असे ठरवून, तिथल्या लोकांनी दंगली सुरू केल्या. प्रत्यक्षात हल्लेखोर गुन्हेगार हा मुस्लीम नव्हताच. असे का? या प्रश्नाचा मागोवा घेतल्यावर जाणवते की, उत्तर आयर्लंडच नव्हे, तर युरोपभर आणि आशियामधीलही काही देशांमध्ये मुस्लिमांविरोधात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. उत्तर आयर्लंडच नव्हे, तर युरोपमध्ये लोकांच्या मनात हल्लेखोर म्हटले की, तो जिहादी मानसिकतेचा दहशतवादी असेल, असे चित्र उभे राहते. अर्थात, याला कारणीभूतही ‘सर तन से जुदा’ आणि ‘काफिरविरोधी जिहाद म्हणजे पुण्य’ अशी मानसिकता असलेले लोक जबाबदार आहेत. आताही उत्तर आयर्लंडचे शासन, प्रशासन आणि पोलीस दल जनतेला जाहीररीत्या सांगत आहेत की, स्टीफन ओगिल्वीवर हल्ला करणारा हादी अलोदिद याच्याशी कोणत्याही दहशतवादी संघटनेचे संबंध आढळून आलेले नाहीत. तो मानसिक रुग्ण असावा. कारण, त्याला आठवतच नाही की, त्याने कुणावर जीवघेणा हल्ला केला आहे. मात्र, उत्तरी आयर्लंडच्या नागरिकांनी दंगल थांबवली नाही. सगळ्याच निर्वासितांना देशाबाहेर हाकलून लावू, असा पवित्रा त्यांनी घेतला. आमचा देश सुरक्षित ठेवण्यासाठी हे धर्मांध निर्वासित नकोच, असे त्यांचे म्हणणे. यावर काय म्हणणार? मातृभूमीची रक्षा करणे, हे नागरिकांचे कर्तव्यच. उत्तर आयर्लंडच्या नागरिकांची हिंसक दिशा चुकली. पण, देशप्रेमाची भावना तर योग्य आहे, असे म्हणावे का?
९५९४९६९६३८