कार्पोरेट जिहाद प्रकरणात राजकीय रंग गडद आरोपींच्या बचावासठी ‘इस्लाम पार्टी’ने दिला वकील
12-Jun-2026
Total Views |
नाशिक (TCS Nashik Corporate Jihad Case) : ‘कॉर्पोरेट जिहाद’ आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणात राजकीय रंग गडद झाले असून मालेगावमध्ये नव्यानेच जन्माला आलेल्या इस्लाम पार्टीने आरोपींच्या मदतीसाठी वकीलाची नेमणूक केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान, मुख्य संशयित आरोपी निदा खानसह अन्य दोघांच्या जामीन अर्जावर येत्या १९ जून रोजी सुनावणी होणार आहे.
नाशिकरोड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश केदार जोशी यांच्यासमोर शुक्रवार, दि. १२ जून रोजी याप्रकरणी सुनावणी पार पडली. न्यायालयाने आरोपींच्या वकिलांची बाजू ऐकून घेतल्यानंतर शुक्रवार, दि. १९ जून रोजी सरकारी पक्षाची बाजू ऐकल्यानंतर जामीनअर्जावर अंतिम निर्णय दिला जाणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. (TCS Nashik Corporate Jihad Case)
बचाव करताना बरळले शेख
वकील दिल्याचे समर्थन करताना मालेगावमधील इस्लाम पार्टीचे नेते व माजी आमदार आसिफ शेख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना चांगलेच तारे ताडले. टीसीएस प्रकरणाला काही जातीयवादी लोकांनी जाणीवपूर्वक धार्मिक स्वरूप देण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे शेख बरळले. प्रत्यक्षात त्या ठिकाणी सर्वजण एकत्र काम करत होते आणि त्यांच्यात केवळ मैत्रीचे संबंध असल्याचा शोधही त्यांनी लावला. (TCS Nashik Corporate Jihad Case)
दानिशवर शेख यांचे विशेष प्रेम
या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी दानिश शेख याच्या वतीने अॅड. फैज वसीफ यांनी न्यायालयात बाजू मांडली. या सुनावणीदरम्यान सरकारी वकील, फिर्यादीचे वकील आणि इस्लाम पार्टीकडून संयुक्त युक्तिवाद केला. यावेळी दानिशवर विशेष प्रेम असलेल्या इस्लाम पार्टीने दिलेल्या वकिलाने दानिशला अटक केल्यानंतर प्रथम पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याचे मुक्ताफळे उधळली. तसेच दानिश याचा जामीन अर्ज प्रथमच दाखल करण्यात आला असून, तो यापूर्वी फेटाळण्यात आलेला नसल्याचे सांगितले. (TCS Nashik Corporate Jihad Case)
आसिफ शेख यांच्याकडून असा बचाव
संशयित दानिश शेख यांचे कुटुंबीय प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत आमच्याकडे आल्याचे इस्लाम पार्टीचे नेते आसिफ शेख यांनी सांगितले. माझ्या घराची कागदपत्रे सर्व व्यवस्थित असल्याचा व्यवस्थेला दम देण्याचा प्रकार शेख यांच्याकडून सुरु आहे. जर या प्रकरणाला अशाच प्रकारे धार्मिक रंग दिला जात असेल, तर राजकारणी म्हणून आम्ही मदत करत आलो आहोत आणि पुढेही करत राहणार असल्याचे समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य शेख यांच्याकडून करण्यात आले. ही कायदेशीर लढाई नाशिक न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली, तरी आम्ही आणि इस्लाम पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असा न्यायवस्थेला आव्हान देण्याचा प्रकार आसिफ शेख यांच्याकडून सुरु आहे. (TCS Nashik Corporate Jihad Case)