होर्डिंगसाठी झाडांची बेकायदेशीर छाटणी करणाऱ्या कंपनीवर एफआयआर दाखल करा मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

    12-Jun-2026   
Total Views |
Mumbai Illegal Tree Pruning
 
मुंबई (Mumbai Illegal Tree Pruning): अंधेरी पश्चिम येथील न्यू लिंक रोड परिसरात जाहिरात फलकांना स्पष्ट दृश्यता मिळावी यासाठी तब्बल ६३ झाडांची अनधिकृतपणे छाटणी करणाऱ्या होर्डिंग कंपनीवर एफआयआर दाखल करा, असे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी दिले आहेत. स्थानिक नगरसेवक रुपेश सावारकर यांनी लेखी तक्रार करून ही बाब लक्षात आणून दिली.(Mumbai Illegal Tree Pruning)
 
 
 
न्यू लिंक रोड परिसरातील जाहिरात फलकांकरिता झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणात छाटण्यात आल्या, असे उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत नगरसेवक रुपेश सावरकर यांनी सांगितले. याबाबत मंत्री आशिष शेलार यांनी विचारणा केली असता महापालिका अधिकाऱ्यांनी झाडांची छाटणी करण्यात आल्याचे मान्य करत याबाबत आम्ही परिमंडळ कार्यालय आणि आंबोली पोलीस ठाणे यांच्याकडे प्राथमिक तक्रार केल्याचे सांगितले. मात्र, एफआयआर दाखल झालेला नाही ही बाब नगरसेवक रुपेश सावरकर यांनी लक्षात आणून दिली. याची दखल घेत मंत्री आशिष शेलार यांनी संबंधित जाहिरात परवानग्यांची तपासणी करून दोषी जाहिरात कंपनीवर तातडीने एफआयआर दाखल करा, असे निर्देश पोलीसांना दिले.(Mumbai Illegal Tree Pruning)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....