हिमालयाला छेदणारा अभियांत्रिकी अविष्कार झोजिला बोगदा :काश्मीर-लडाख अखंड जोडणी!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत सीमावर्ती भागांतील पायाभूत विकासाला मिळालेल्या गतीचे झोजिला बोगदा प्रकल्प हे एक ठळक उदाहरण ठरत आहे.
11-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली (Zojila Tunnel Historic Connectivity) : २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाल्यानंतर जम्मू-काश्मीर आणि लडाख या संवेदनशील व सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रदेशांच्या विकासाला अभूतपूर्व गती मिळाली. गेल्या १२ वर्षांत या भागात पायाभूत सुविधा, पर्यटन, दळणवळण, शिक्षण, आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात मोठे बदल घडून आले आहेत. एकेकाळी हवामान, भौगोलिक अडचणी आणि अपुऱ्या सुविधांमुळे विकासापासून दूर राहिलेल्या या प्रदेशात आज आधुनिक भारताचे नवे चित्र दिसत आहे. त्यापैकीच झोजिला बोगदा प्रकल्प हा त्यापैकीच एक महत्वपूर्ण प्रकल्प ठरतो.
जम्मू-काश्मीर आणि लडाख यांच्यामधील झोजिला खिंड ही भारतातील सर्वात आव्हानात्मक पर्वतीय मार्गांपैकी एक मानली जाते. दरवर्षी हिवाळ्यात प्रचंड हिमवृष्टी, हिमस्खलने आणि उणे तापमानामुळे हा मार्ग अनेक महिने बंद राहत असे. परिणामी लडाखचा देशाच्या इतर भागांशी संपर्क तुटत असे. आता मात्र या परिस्थितीत ऐतिहासिक बदल घडवून आणणारा झोजिला बोगदा प्रकल्प निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. (Zojila Tunnel Historic Connectivity)
दि. ९ जून २०२६ रोजी १३.१५३ किलोमीटर लांबीच्या झोजिला बोगद्याचे दोन्ही टोक एकमेकांना जोडण्यात यश आले. अभियांत्रिकी भाषेत याला ‘ब्रेकथ्रू’ असे म्हणतात. हा क्षण केवळ एका बोगद्याच्या खोदकामाची पूर्तता नव्हती, तर हिमालयाच्या कुशीत भारताने साधलेल्या अभियांत्रिकी कौशल्याचा आणि मानवी जिद्दीचा विजय होता.
झोजिला बोगदा हा जगातील सर्वाधिक उंचीवर बांधला जाणारा सर्वात लांब सिंगल-ट्यूब बाय-डायरेक्शनल रस्ता बोगदा ठरणार आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ११,५७८ फूट उंचीवर असलेला हा बोगदा सोनमर्गजवळील बालटाल आणि द्रास-कारगिल परिसरातील मीनामार्ग यांना जोडतो. हा बोगदा ३०.८९४ किलोमीटर लांबीच्या संपूर्ण कॉरिडॉर विकास योजनेचा मुख्य भाग आहे. या योजनेमध्ये जोडरस्ते, पूल, स्नो गॅलरी, कट-अँड-कव्हर संरचना आणि निलग्रार जुळे बोगदे यांचाही समावेश आहे. (Zojila Tunnel Historic Connectivity)
या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कठीण हिमालयीन भूगर्भीय परिस्थितीत केलेले बांधकाम. बोगद्याच्या संपूर्ण लांबीमध्ये खडकांच्या रचनेचे प्रकार तब्बल ६७ वेळा बदलले. अशा परिस्थितीत अभियंत्यांनी ‘न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड’चा वापर केला. ही पद्धत जगभरात डोंगराळ भागातील गुंतागुंतीचे बोगदे खोदण्यासाठी वापरली जाते. खडकांच्या स्थितीनुसार खोदकामाची पद्धत बदलण्याची सुविधा या तंत्रज्ञानात असल्यामुळे झोजिला प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करता आला.
📍जोजिला सुरंग पूर्वी पोर्टल, मीनामार्ग (कारगिल), लदाख
🇮🇳 भारत के 🛣️ इन्फ्रास्ट्रक्चर विकास के इतिहास में ऐतिहासिक दिन!
एशिया की सबसे लंबी सुरंग 'जोजिला टनल' परियोजना आज एक ऐतिहासिक क्षण की साक्षी बनी है। जोजिला के मुख्य सुरंग में आज जम्मू और कश्मीर केंद्र शासित प्रदेश के… pic.twitter.com/LuobDXNGIa
मात्र झोजिला बोगद्याची कहाणी केवळ तंत्रज्ञानाची नाही; ती मानवी धैर्य आणि चिकाटीचीही आहे. गेली सहा वर्षे १,२०० हून अधिक कर्मचारी या प्रकल्पावर कार्यरत होते. यातील सुमारे ८० टक्के कर्मचारी जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील स्थानिक रहिवासी होते. उणे ३० अंश सेल्सिअस तापमान, हिमवादळे आणि हिमस्खलनांचा सामना करत त्यांनी दिवस-रात्र काम सुरू ठेवले. (Zojila Tunnel Historic Connectivity)
जानेवारी २०२३ मध्ये निलग्रार परिसरात मोठ्या हिमस्खलनाच्या घटना घडल्या. एका घटनेत अनेक कामगार अडकले होते. भारतीय लष्कराने बचाव मोहीम राबवून १७० हून अधिक कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवले. या संकटानंतरही कामगारांनी हार मानली नाही. उलट अधिक जोमाने काम सुरू ठेवले आणि अखेर बोगद्याचे खोदकाम पूर्ण केले.
प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याचे परिणाम दूरगामी असणार आहेत. श्रीनगर ते लडाख दरम्यान ३६५ दिवस वाहतूक सुरू राहणार असल्यामुळे कारगिल, लेह आणि द्रास या भागांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आरोग्यसेवा, शिक्षण, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि व्यापार यामध्ये सातत्य राहील. हिवाळ्यातील विलगीकरणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात संपुष्टात येईल. (Zojila Tunnel Historic Connectivity)
— Office of Chief Minister, J&K (@CM_JnK) June 9, 2026
पर्यटन क्षेत्रात क्रांती घडविणारा प्रकल्प
पर्यटन क्षेत्रासाठीही हा प्रकल्प क्रांतिकारी ठरणार आहे. सध्या बर्फवृष्टीमुळे अनेक महिने बंद राहणारे पर्यटन मार्ग वर्षभर खुले राहतील. त्यामुळे काश्मीर, द्रास, कारगिल आणि लडाखमधील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळेल. स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि संपूर्ण प्रदेशाच्या आर्थिक विकासाला वेग मिळेल. (Zojila Tunnel Historic Connectivity)
राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनन्य साधारण महत्व
राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही झोजिला बोगदा अत्यंत महत्त्वाचा आहे. लडाख हा भारताचा संवेदनशील सीमावर्ती प्रदेश आहे. सर्व हवामानात सुरू राहणारा हा मार्ग सैन्यदलांची वाहतूक, रसद पुरवठा आणि धोरणात्मक हालचाली अधिक सुलभ करणार आहे. त्यामुळे भारताची सीमावर्ती भागातील तयारी आणि प्रतिसादक्षमता अधिक मजबूत होईल. (Zojila Tunnel Historic Connectivity)
इतिहासातील एक मैलाचा दगड
झोजिला बोगदा हा केवळ एक पायाभूत सुविधा प्रकल्प नाही. तो आधुनिक भारताच्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. हिमालयाच्या कठीण पर्वतरांगांना छेद देत भारतीय अभियंते, कामगार आणि तंत्रज्ञांनी अशक्य वाटणारे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे. काश्मीर आणि लडाख यांच्यातील अंतर कमी करण्याबरोबरच हा बोगदा विकास, सुरक्षितता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा नवा मार्ग खुला करणार आहे. येत्या काळात झोजिला बोगदा भारताच्या पर्वतीय पायाभूत सुविधा विकासाच्या इतिहासातील एक मैलाचा दगड म्हणून ओळखला जाईल.
हा प्रोजेक्ट फक्त चॅलेजीगच नव्हता तर भारताच्या संरक्षण सिध्दतेसाठी सुध्दा गरजेचा होता. बारामाही कनेक्टिव्हीटी मिळणार अल्यामूळे लेह लडाखच्या लोकांना याचा खुप फायदा होईल. शिवाय प्रवास आता सुरक्षित असेल कारण हिम वादळे आणि अतिशय विषम वातावरणाची झोझीला खींड या पासून आता सुऱक्षित आणि जलद प्रवासाचा अनुभव घेता येईल. (Zojila Tunnel Historic Connectivity)