खासदार-संपादक संजय राऊतांवर मोदी-दीपकेचा फोटो डिलीट करण्याची वेळ का आली?

    11-Jun-2026
Total Views |



Sanjay Raut Deletes Modi Post
 
मुंबई (Sanjay Raut Deletes Modi Post) : ‘व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी’च्या अजेंड्यावर विश्वास ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँक्रोज जनता पक्षाचा संस्थापक अभिजीत दीपकेची भेट झाल्याचा दावा करणाऱ्या संजय राऊतांवर अवघ्या काही तासांत केलेली एक्सपोस्ट डिलीट करण्याची नामुष्की ओढावली आहे. खासदार संजय राऊत मोठ्या तावातावात अभिजीत दीपके आणि मोदींची भेट झाल्याच्या वल्गना सकाळपासून करत होते. परिणामी राऊतांच्या या पोस्टनंतर आंदोलकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
 
राऊतांनी छातीठोकपणे मोदींच्या भेटीचा दावा केला आणि आंदोलक व समर्थकांना धक्काच बसला आहे. खासदार राऊतांच्या या वक्तव्याची चर्चा माध्यमांमध्ये ‘ब्रेकींग न्यूज’ म्हणून झाली. सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या कॉक्रोज जनता पार्टीतील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पसरू लागल्याचे लक्षात येताच कॉक्रोज जनता पार्टीकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न झाला. अभिजीत दीपकेने तो फोटो एआय असावा, अशी शक्यता व्यक्त केली. परिणामी, राऊतांच्याही चूक लक्षात आली. त्यामुळे अखेर संजय राऊतांनी तो फोटो डिलीट करत आपल्या चूकांचे प्रायश्चित्त म्हणून कॉक्रोज जनता पक्षाच्या समर्थनार्थ पोस्ट लिहीली. (Sanjay Raut Deletes Modi Post)
 
 
आपल्या पोस्टमध्ये राऊत म्हणतात...
 
“कॉक्रोच जनता पार्टी हा भारतीय तरुणांचा संताप आणि चीड आहे. या तरुणांची फसगत होता कामा नये उलट. तो संताप अधिक प्रभावी आणि नियोजित मार्गाने व्यक्त होणे गरजेचे आहे,असे माझे मत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी तरुणांचे आंदोलन यशस्वी होण्याबाबत शुभेच्छा दिल्या. तरुणांना न्याय आणि दिशा हवी आहे. (Sanjay Raut Deletes Modi Post)
 
युवराजांनी कानपिचक्या दिल्या का?
 
शिवसेना उबाठा पक्षाचे युवराज हे मुळात कॉक्रोज जनता पक्षाचे प्रचंड ‘फॅन’. त्यामुळे आपल्याच पक्षातून अशी संभ्रमाची भूमिका ते मुळात खपवून घेणारे नाहीत. संजय राऊतांच्या या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी ज्ञानाचा चांगलाच समाचार युवराजांनी घेतला असावा. त्यामुळेच एक स्वतः संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार असलेल्या आणि खासदार असलेल्या व्यक्तीवर आपणच केलेले ट्विट काढून टाकण्याची वेळ येते. (Sanjay Raut Deletes Modi Post)